घरबसल्या आनंद देणारे व्हर्च्युअल टूर्स (Lists)

Tue, Jul 7, 2009

Fantastic Lists

जगातली सात आश्चर्ये म्हणा किंवा रिओ दि जानेरो सारखे नयनरम्य शहर म्हणा - या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जाऊन यावे असं तुम्हा-आम्हा सर्वांनाच वाटत असतं. पण ते शक्य होतंच असं नाही. अनेक ठिकाणी आपण जाऊन येतो; पण तरीही आणखी एखादा दिवस असता तर हे ही पाहून झालं असतं, अशी हुरहूर लागून राहते. बऱ्याच वेळा एखाद्या ठिकाणी जाण्याअगोदर अापण इंटरनेटवर भरपूर रिसर्च केलेला असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी जायचेय तिथला कानाकोपरा आपल्याला अगोदरंच माहित झालेला असतो. यासाठी कामाला येतात ते अशा जगप्रसिद्ध स्थळांचे व्हर्च्युअल टूर्स! अशाच काही प्रसिद्ध स्थळांच्या व्हर्च्युअल टूर्सची ही यादी. जाण्यापूर्वी पाहून अभ्यास करू शकता, जाऊन आल्यानंतर पुन्हा एकदा पाहून आठवणी ताज्या करू शकता किंवा जाण्याचं राहिलं तर घरबसल्या पाहून आनंद घेऊ शकता…

  • जगातील सात आश्चर्येः नव्याने जाहीर झालेल्या सात आश्चर्यांचे व्हर्च्युअल टूर्स
  • चांद्रमोहिमः अपोलो ११, १२ आणि १७ या यानांच्या साह्याने चंदावरील सफरीचा हा मनमोहक अनुभव अराऊंडर डॉट कॉम या साईटने तयार केला आहे. या साईटवर जगातल्या अनेक प्रमुख शहरांचे व्हर्च्युअल टूर्स उपलब्ध आहेत.
  • लूव्र म्युझियमः पॅरिसमधील जगप्रसिद्ध लूव्र म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव
  • रेअर बुक रूमः मला भयंकर आवडलेली ही साईट. शेक्सपियर, गॅलिलिओसारख्या महान व्यक्तींची पुस्तकं तुम्ही इथे वाचू शकता. त्यांच्या मूळ पुस्तकांचे स्कॅन्स या साईटवर जसेच्या तसे पाहता आणि वाचता येतात.
  • रिओ दि जानेरोः जगातील सर्वांत सुंदर शहर म्हणून ख्याती असलेल्या रिओ दि जानेरोचा 3D Aerial व्हर्चुअल टूर.

No related posts.

, , , , , ,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

2 Comments For This Post

  1. bhaanasa Says:

    सगळ्याच साईट चांगल्या आहेत. पण विशेष आभार रेअर बुक रूम बद्दल.

  2. Clone Says:

    धन्यवाद भानसा. रेअर बुक रूम ही माझी पण फेवरिट साईट आहे.

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro