- काऊंटडाऊनः मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स…
- सुंदर, संपन्न जगाचे ध्येय…
- भूक, गरीबी आणि प्राथमिक शिक्षण
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांच्या कारकीर्दीत ‘सहस्त्रक विकास उद्दीष्टां’चा प्रकल्प सुरू झाला. आज उद्दीष्ट्ये ठरविली आणि उद्यापासून काम सुरू, असे जागतिक प्रकल्पांच्या बाबतीत शक्य असत नाही. या उद्दीष्ट्यांची रचना, त्यांचा क्रम, त्यांची विभागणी, त्यासाठी समित्या, तज्ज्ञांची मदत, जागतिक पातळीवर घ्यावयाचे सामुहिक निर्णय, जागतिक पातळीवर या उद्दीष्टांच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख यंत्रणा उभी करणे या गोष्टी ठरविण्यासाठी वेळ लागतो. सन दोन हजार पंधरा हे उद्दीष्ट्ये साध्य करण्याचे वर्ष ठरवून काम सुरू केले गेले. पहिल्या दोन वर्षांमध्ये या सर्व गोष्टी उभ्या करण्यात आल्या. साधारणतः सन २००२-०३ मध्ये सहस्त्रक विकास उद्दीष्टांच्या प्रत्यक्ष अमलबजावणीला जगभरात सुरूवात झाली.
प्रत्यक्ष अमलबजावणी करताना उद्दीष्टांमध्ये आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याच्या यंत्रणांमध्ये सुधारणांची आवश्यकता संयुक्त राष्ट्रसंघाला वाटली. सन २००५ मध्ये भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत सर्व जगाने एकमताने या विषयाला मान्यता दिली आणि उद्दीष्ट्ये गाठण्यासाठी ठरविलेल्या लक्ष्यांमध्ये आणखी वाढ करण्यात आली. अन्नान यांनी यासंदर्भात सादर केलेला अहवाल आमसभेने स्विकारला. त्यानंतर `सहस्त्रक विकास उद्दीष्ट्ये` अधिक स्पष्ट झाली. सुंदर, संपन्न जगाचे ध्येय गाठण्यासाठी छोटी छोटी पावले टाकण्यास सुरूवात झाली.
सन २००५ मध्ये आमसभेने मंजूर केलेला आराखडा असा-
१. जगातून भीषण दारिद्र्य आणि भूक नष्ट करणे- सन १९९० ते सन २०१५ या दरम्यान जगात ज्यांचे उत्पन्न दिवसाला एक डॉलरपेक्षा कमी आहे, अशा नागरीकांची संख्या निम्म्यावर आणणे. त्यासाठी सर्वांना रोजगार आणि महिला-तरुणाईला योग्य काम देणे. सन १९९० ते सन २०१५ या दरम्यान भुकेल्या नागरीकांची संख्या निम्म्यावर आणणे. त्यासाठी पाच वर्षे वयाच्या आतील मुलांना पोषण आहाराची व्यवस्था करणे.
२. सर्व मुला-मुलींना प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करणे- सन २०१५ पर्यंत प्रत्येक मुला-मुलीला प्राथमिक शिक्षण देण्याची व्यवस्था करणे. त्यासाठी शाळांमधील हजेरी पत्रक, पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱया आणि प्राथमिक शाळेतील शेवटच्या इयत्तेपर्यंत पोहोचवण्याऱया मुला-मुलींची संख्या आणि वय वर्षे पंधरा ते चोवीस यामधील साक्षरतेचे प्रमाण या तीन गोष्टींवर लक्ष देणे.
३. लिंगसमभाव प्रस्थापित करणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे- सन २०१५ पूर्वी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील लिंगभेद पूर्णतः नष्ट करणे. सर्वांना समान शिक्षण प्रस्थिपत करणे.
४. बालमृत्यूदर रोखणे- सन १९९० ते २०१५ दरम्यानचा बालमृत्यूदर दोन तृतियांशाने कमी करणे. (यामध्ये पाच वर्षे वयाच्या आतील मुला-मुलींचा विचार केला आहे.) त्यासाठी लसीकरण मोहिम तीव्र करणे.
५. माता आरोग्य सदृढ राखणे- सन २०१५ पर्यंत माता-मृत्यूदराचे प्रमाण कमी करणे. त्यासाठी बालविवाह प्रतिबंध, गर्भनिरोधक साधनांची व्यवस्था, प्रशिक्षित दायांची व्यवस्था, कुटुंबनियोजनावर भर देणे.
६. मलेरिया, एचआयव्ही-एडसॆ आणि इतर रोगांचा मुकाबला करणे- सन २०१५ पर्यंत या रोगांची लागण झालेल्यांची संख्या निम्म्यावर आणणे आणि त्यानंतर ती आणखी कमी करण्याच्या दिशेने जाणे. त्यासाठी एचआयव्ही-एड्सची लागण झालेल्या प्रत्येकाला उपचार मिळेल, अशी व्यवस्था सन २०१० पर्यंत उभी करणे.
७. पर्यावरण शाश्वत राखणे- सन २०१० पर्यंत जैववैविधतेचा ऱहास पूर्णतः रोखणे. त्यासाठी जंगलाचे प्रमाण संतुलित राखणे, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण रोखणे, सागरी जीवांचा समतोल राखणे आणि नष्ट होत चाललेल्या जीवांना वाचविणे. ज्या लोकसंख्येला स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, अशांची संख्या सन २०१५ पर्यंत निम्म्यावर आणणे. सन २०२० पर्यंत किमान शंभर दशलक्ष (दहा कोटी) झोपडपट्टीवासीयांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा करणे.
८. विकासासाठी वैश्विक भागीदारी निश्चित करणे- राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये पारदर्शी आणि समन्यायी व्यापार आणि अर्थव्यवहार वाढविणे. अविकसित राष्ट्रांसाठी कररचना, त्यांना कोटा पद्धतीनुसार व्यापारात भागीदार करणे. कर्जबाजारी देशांना त्यातून बाहेर काढणे.
No related posts.


April 14th, 2009 at 10:56 am
Thnx. Changali mahiti dilis. Baryach goshti aaplya paryant yetach nahit.