कॉलेजच्या शेवटच्या सेमेस्टरमधली ती प्रचंड धावपळ अजूनही अाठवतेय. प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करण्यापूर्वीची ती घाई-गडबड, रिपोर्टमधले दोन सेक्शन्स माझ्याकडे आणि इतर सेक्शन्स पार्टनरकडे असल्याने प्रिंट्स काढताना प्रचंड गोंधळ उडाला होता. अख्खा प्रोजेक्ट रिपोर्ट एका फ्लॉपीवर बसत नव्हता म्हणून त्याचे दोन भाग करण्याचा हा उद्योग करावा लागला होता. प्रिंटरकडे गेल्यानंतर एकाच फ्लॉपीतील फाईल ओपन होत होती. दुसरी [...]
Continue reading...Saturday, July 4, 2009
हे ‘ट्विटर’ नेमकं वापरायचं कसं रे, असा प्रश्न एका कंपनीच्या मालकाने मला विचारला. मी म्हटलं, सोप्पंय. ‘ट्विटर डॉट कॉम’ या साईटवर जाऊन रजिस्टर व्हा आणि तुम्हाला आता, या क्षणी काय वाटतंय किंवा तुम्ही काय करताय हे १४० शब्दांत इतरांशी शेअर करा. ते ठीक आहे रे, पण याचा माझ्या व्यवसायासाठी काय फायदा होईल? त्यांचा प्रतिप्रश्न. मी म्हटलं, तुमच्या नव्या [...]
Continue reading...Thursday, May 28, 2009
This entry is part 8 of 9 in the series Pioneers२००३ः हार्वर्डमधील हॉस्टेल रूममध्ये मार्क आणि ख्रिस एकत्र राहत होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटरनेटवर आपले अस्तित्त्व निर्माण करण्याकरता आणि आपापल्या आवडी-निवडीनुसार समूह तयार करता यावेत यासाठी एखादी साईट तयार करण्याचे विचार मार्कच्या डोक्यात घोळत होते. मार्क तांत्रिक बाजूने त्याच्या विचारांना आकार देत होता. पण विद्यार्थी अशा [...]
Continue reading...Tuesday, May 12, 2009
जगभरातील सुमारे २० कोटी लोकांचे नेटवर्क असणारे फेसबुक भारतातही वेगाने पसरतेय. आतापर्यंत अॉर्कुटवर रमणारे आता फेसबुकवर सापडतात. ज्यांना अॉर्कुट अावडत नव्हतं, ते आधीपासूनच फेसबुकवर होते. आता त्यांच्या फेसबुकवरील मित्रांच्या संख्येतही वाढ झाली आणि त्यामुळे शेअरिंगचे प्रमाणही वाढलेय. सोशल नेटवर्किंग साईट्सवर वावर असणं ही काळाची गरज असली तरी त्याचा अतिरेक होता कामा नये. सकाळी उठल्यापासून रात्री [...]
Continue reading...
Wednesday, July 22, 2009
0 Comments