एक ‘वेगळे’ पाऊस गाणे (Reader Contribution)

Mon, Jun 15, 2009

Fantastic 5, Sudoku

एक ‘वेगळे’ पाऊस गाणे (Reader Contribution)

मित्रांनो,
‘फँटास्टिक फाईव्ह’ या आमच्या साईटला तुमचा उदंड (म्हणजे किती ते विचारू नका) प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद. साईटचे हिट्स, फ्रेंड्स वरचेवर वाढत आहेतंच; पण FFive वर आम्हालाही लिहिता येईल का, अशा ई-मेल्सही येत आहेत. तुम्हाला FFive वर काही लिहायचं असल्यास आम्हाला ffive.in@gmail.com वर जरूर ई-मेल करा. पाऊस हरवल्याच्या सुडोकूच्या कवितेचं (पाऊस गाणे) FFive चे वाचक मृत्युंजय यांनी केलेलं विडंबन येथे देत आहे.
(वैधानिक इशाराः दारू पिणे आरोग्यास घातक असते)

व्हिस्कीच्या पहिल्या पेगनं सुखावले सारे
डाळ शेव फुटाणे शोधू लागले सारे

उडाली धांदल खणखणले ग्लास उधाणता वारे। व्हिस्कीचे।।
व्हिस्कीही अवली।
ओतितो बाटली ।
बेसावध जन। पीतापीता।।

काही आनंदी।
काही कष्टी।
काही ताशीर। जनांमध्ये।।

मॅनेजर ही खूष।
वेटर नाखूष।
टेबलक्लॉथ ओले। वाळता वाळेना।।

ग्लासही ओला।
कस्टमर ओले।
त्यातही फाटलेले। सोफ्याचे कुशन।।

ग्लासही झुके।
बाटलीही झुके।
समोरचाही झुके। बोलताना।।

खुर्च्याही फुल्ल।
कोचही फुल्ल।
खोळंबती जन। दारुच्या आशेने।।

बाटली फोडताना।
ग्लास भरताना।
अवचित घाला। विज मंडळाचा।।

झाला खोळंबा।
झाली पंचाईत।
तरीही आनंदी। मद्यलोक।।

कुणा आठवे गेलेले बालपण।
कोणी रमे त्या रम्य आठवणीत।
कुणी शोधू पाहे लपलेले सूर्यबिंब।
कोणी लकी प्रेमिक आतूनही चिंब अन बाहेरूनी चिंब।।

एका छोट्या मदिरभक्ताचा।
हा पहिला पेग।
चिंता उधाणून वाहे। याच्या चेहऱ्यावरून।।

जीव्हाही तृप्त।
मनही तृप्त।
आयुष्य तृप्त। भक्ताचे।।

चला चला उठा झणी।
करा पार्टीची तयारी।
दारेही उघडलेली। वाईन शॉपची।।

मदिरेच्या धुंदीत।
गेली संध्याकाळ।
घरोघरी चकणा तळण। कांदाभजीचे।।

उजाडता दिस।
मेंदु सुन्न सुन्न।
घ्या की हो उतारा। उतरावावया।|

पिण्याच्या गडबडीत।
श्री बोले श्रीमतींना।
येत्या रविवारी गाठ तु। माहेरचा मळा।।

आपण खूष।
मित्र खूष।
बायकोही खूष। मिळाले माहेरी जावया।।

अवली दारुड्याला।
भेटे त्याची बाटली।
तो ना सोडे आता। तिचा पदर।।

त्याची तिची भेट।
फक्त एका रात्रीची।
तीही सोसूनी कळ। ९८ रुपड्यांची।।

तुम्ही जन लकी।
रोज ४ पेग मुखी।
पुन्हा उतावीळ तुम्ही। फुकटची प्यावया।।

चला काढा थोडी हाल्फ।
पेग मारता येते बळ।
तुम्ही साकारलेल्या। कॉकटेलने।।

निर्व्यसनी त्या जनांना।
ना कळे मदिराभक्ताची व्यथा।
कैसी ही माया। मदिरेची।।

आपण प्रेमिक।
घेउन मिठीत।
रंग उडवू। मदिरेचे।।

आहो भाऊ राया।
मान्य तुमची माया।
परंतु आता थोडे । भुकेकडे बघा।।

दारुने टिंग।
आतून बाहेरून।
चकणेही सारे। विखुरलेले।।

तुम्ही म्हणालात।
पितान मधेच।
तुमचे पाकिट। लाटले चोराने।।

जाहलो दुःखी।
हातही कापे।
कसे भरु देवा। बिल हे सगळे ।।

आता करा त्वरा।
वेटरही आला।
सुरू झाल्या हाका। मॅनेजरच्या।।

तुम्ही फार थोर।
लावुनिया घोर।
बेरकी नजरा। चश्म्यातुनी।।

मालक पुढ्यात।
वेटर पुढ्यात।
धराहे बिल। पेमेंट टाका।।

मिळून निसटावे।
कहितरी घडावे।
हाउ दे खेळ चालु । विज मंडळाचा।।

पुर्व संचित जोडून।
दोन्ही करही जोडून।
करितो विनंती। आता तरी गुल्ल व्हा।।

आता तरी गुल्ल व्हा।
अंधारात गायब होउ द्या।
नाहीतर नशीबी पिउन। ग्लास प्लेट विसळणे।।

ही रडकथा नसे।
वा नसे बतावणी।
आहे ही आर्तता। तुमच्या मृत्युंजयाची।।

Related posts:

  1. मुपिकर

, , ,

This post was written by:

Sudoku - who has written 45 posts on Fantastic Five.


Contact the author

4 Comments For This Post

  1. Baji Says:

    तो पाहताच प्याला कलेजा आणी भेजा खल्लास झाला
    तोडलात मृत्युंजयराव
    नाद खुला तुमचा
    तुमचा मित्र
    बाजी

  2. Vikramsinh Says:

    विडंबन वाचून एकदम झिंगल्यासारखेच वाटत आहे
    अप्रतिम दुसर काय

  3. Abhijit Thite Says:

    मृत्युंजय राव… मस्तच… मुक्तपीठला तुमचा अभिमान वाटतो…

  4. Sanjay Vaidya Says:

    मृत्युंजय

    एकदम भारी !! त्यातल्या त्यात

    "निर्व्यसनी त्या जनांना।
    ना कळे मदिराभक्ताची व्यथा।
    कैसी ही माया। मदिरेची।।

    हे तर एकदम वास्तव…. धुंद झालो वाचतांना !!

2 Trackbacks For This Post

  1. पाऊस गाणे | Fantastic Five Says:

    [...] ही धमकी नसे। वा नसे चेतावणी। आहे ही आर्तता। तुमच्या सुडोकूची।। आमचे वाचक मृत्युंजय यांनी या गाण्याचे केलेले विडंबनः एक ‘वेगळे’ पाऊस गाणे [...]

  2. आला आला पाऊस आला… | Fantastic Five Says:

    [...] तर पाऊस गेल्यानंतरच्या कवितेचं विडंबनही करून पाठवलं होतं. एकूण काय तर [...]

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro