स्लमडॉग मिलेनिअर (Book Review)

Mon, Apr 6, 2009

Books, Fantastic Reviews

q-a

पुस्तकाचे नाव : स्लमडॉग मिलेनिअर
लेखक : विकास स्वरूप
अनुवाद : वंदना अत्रे
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस
किंमत : 200 रुपये.
का वाचावे? ःआधुनिक भारताच्या सामाजिक पार्श्‍वभूमीवरील ही कथा सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधील संघर्षाचे दर्शन घडवितेच; पण जगण्याखेरीज दुसरा पर्यायच नसलेल्या मुलापुढे आयुष्य काय वाढून ठेवते तेही प्रभावीपणे दाखविते…

‘हू विल विन ए बिलियन’ या क्वीझ शोमधील बाराही प्रश्‍नांची उत्तरे अचूक दिल्यानंतर राम महम्मद थॉमस याला अटक करण्यात आली आहे. कधीही शाळेचे तोंड न बघितलेला किंवा वृत्तपत्र हातीही न धरणारा एक दरिद्री, अनाथ मुलगा सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रहाचे किंवा शेक्‍सपिअरच्या नाटकाचे नाव लबाडी केल्याशिवाय सांगूच शकणार नाही. क्वीझ शोचे चित्रीकरण पुन्हा बघताना तो आपण कसे जिंकलो याचे वर्णन करू लागतो आणि वाचकाला घेऊन जातो त्याच्या आयुष्याच्या अद्‌भुत सफरीवर!

कचराकुंडीवर सुरू झालेल्या त्याच्या आयुष्यात कधी त्याची गाठ पडते सुरक्षेचे अति वेड असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्नलशी, तर कधी तो “ताजमहाल’चा गाइड म्हणून काम करतो. रामची जीवनेच्छा चिवट आहे! रस्त्यावरील जीवन जगताना मिळालेल्या शहाणपणातून, क्षुल्लक गोष्टींच्या भांडारातून तो क्विझमधील प्रश्‍नांची उत्तरे देत लाखो प्रेक्षकांना अक्षरश: स्तंभित करतोच; पण आयुष्याच्या कोड्याचीही उत्तरे मिळवितो.

आधुनिक भारताच्या सामाजिक पार्श्‍वभूमीवरील ही कथा सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधील संघर्षाचे दर्शन घडवितेच; पण जगण्याखेरीज दुसरा पर्यायच नसलेल्या मुलापुढे आयुष्य काय वाढून ठेवते तेही प्रभावीपणे दाखविते…

No related posts.

,

This post was written by:

Sudoku - who has written 45 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro