वेदना

Tue, Dec 29, 2009

Fantastic 5, Fantastic Tips, Sudoku

प्रत्येकाच्या उरात असतो
एक बाण रुतलेला,
प्रत्येकाच्या मनात असते
ठसठसणारी वेदना…

वेदनेचा पार नाही,
बाणाची धार नाही,
दुखावलेला असतो पण
एक हळवा कोपरा…

कुणी शोधू जाते वेदनांचा उपाय
कुणी गाठू पाहते त्या वेदनांचा गाव
कुणी जाऊ पाहते दूर दूर पण
अडकून राहती मनीच्या तळवटात…

असेच असते साऱ्यांचे
परी वाटते एकट्याचे
घावाचे वारकरी ते
बुडूनी जाती डोहात…

डोहात बुडाल्या साऱ्यांना
पाव्याचे लागे पिसे
सुरलयीवर झुलता झुलता
कृष्णसखा तो निर्मळ हसे…

सांगे मग कृष्ण तो,
माया डोहाची अपार
बुडालो की थांबलो
न लागे कोणास थांग…

वेदना हा शाप नाही
वेदना वरदान नाही
जगणेच असते वेदना
दुसरे तिसरे काही नाही…

No related posts.

,

This post was written by:

Sudoku - who has written 39 posts on Fantastic Five.


Contact the author

1 Comments For This Post

  1. savi Says:

    vedana vichar karayala pravrut karat aahe………..
    vedana shaap ki vardan mahit nahi pan ti jagayala jarur shikavate…..
    vedanetun jo kharokhari jivan jagato to khara manus nahitar hadamasache bhoot……….

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro