आरोग्य सांभाळण्यासाठी अॉनलाईन टूल्स (Lists)

Thu, May 7, 2009

Fantastic Lists

सध्याच्या मंदीच्या वातावरणात प्रत्येकालाच ताण-तणावाला सामोरं जावं लागत आहे. संसारातील जबाबदाऱ्या आणि नोकरी, व्यवसायातील व्यावधानं सांभाळता-सांभाळता प्रचंड ओढाताण होते. प्रचंड कष्टाने जोपासलेली नोकरी एका फटक्यात जाऊ शकते, याचे भान ठेवत नोकरी टिकवण्यासाठी अंगावर पडेल ते काम करताना शरीराची होणारी झीजही दुर्लक्षित होऊ शकते. पण एक लक्षात ठेवा, शरीराकडे कधीही दुर्लक्ष करू नका. मंदी असो वा चांदी - मन आणि शरीर धडधाकट ठेवलंच पाहिजे! अनेक वेळा शरीर आपल्याला ‘सिग्नल’ देत असतं, ‘बाबा रे, माझ्याकडे दुर्लक्ष होतंय. जरा डॉक्टरकडे चल.’ हा ‘सिग्नल’ जर तुम्हाला कळाला नाही, तर त्याचे मोठे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे शरीराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शरीर व्यवस्थित आहे की नाही, हे तरी किमान तुम्ही तपासू शकता ना? या गोष्टी बसल्या-बसल्यादेखील तपासता येऊ शकतात. त्यात काही ‘विचित्र’ गोष्ट आढळली तर मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

  • सिम्प्टम चेकरः स्त्री, पुरूष आणि लहान मुलांमधील विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे तपासण्यासाठी तुम्ही वेब एमडी या साईवरील सिम्प्टम चेकर या टूलचा वापर करू शकता. तुमचे लिंग आणि शरीरातील नेमका अवयव यांच्या आधारे तुम्ही विशिष्ट रोगाची लक्षणे तपासू शकता.
  • बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेटरः शरीरात साचत जाणारे फॅट्स अत्यंत धोकादायक असतात. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगांना आमंत्रण देणाऱ्या या फॅट्सना दूर ठेवलेलेच बरे. तुमची उंची आणि वजन यांच्यातील संबंध दर्शविणारा घटक म्हणजे ‘बॉडी मास इंडेक्स’ किंवा ‘बीएमआय’. तुमचा ‘बीएमआय’ २५ च्या वर असेल तर तुम्ही ओव्हरवेट आहात, हे लक्षात घ्या. ‘हेल्थ कॅल्सी’ या साईटवर ‘बॉडी मास इंडेक्स’सह इतर अनेक ‘हेल्थ कॅल्क्युलेटर्स’ उपलब्ध आहेत.
  • स्ट्रेस लेव्हल इंडिकेटरः आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे कधी आपल्यावरील ताण कमी होतो, तर कधी वाढत असतो. ताणाचे प्रमाण अधिक असेल तर त्याचे परिवर्तन विविध आजारांमध्ये होऊ शकते. त्यामुळे ताणाची पातळी तपासणे आवश्यक होते. ‘हेल्दी इंडिया’ या साईटवर तुम्ही ताणाची पातळी तपासू शकता. त्यात काही गंभीर आढळल्यास डॉक्टरांकडे अवश्य जा. या चाचणीचे अमेरिकन व्हर्जनही तुम्ही ट्राय करू शकता.
  • न्यूट्रिशन कॅल्क्युलेटरः आपल्या प्रकृतीनुसार आपला आहार ठरवला गेला पाहिजे. शिवाय शरीरास लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांचेही ठराविक प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. इतकं कॅल्शियम, एवढे प्रोटिन्स असं रोज मोजून खाणं अशक्य आहे; पण किमान आपल्या शरीरास नेमके किती प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर इ. लागतात याची माहिती करून घेणं तरी गरजेचं आहे. ‘हेल्थ फाईंडर’न्यूट्रिशन कॅल्क्युलेटरसह इतर अनेक बाबींची माहिती मिळू शकते.
  • स्मोकिंग कॅल्क्युलेटरः धूम्रपान करणे शरीरासाठी अत्यंत घातक असते, हे माहित असूनही अनेक लोक धूम्रपान करताना आढळून येतात. तुम्ही धूम्रपान करत असाल तर आतापर्यंत तुम्ही आयुष्यातील किती दिवस आणि किती पैसे वाया घालवले आहेत, याचा अंदाज देणारे ‘स्मोकिंग कॅल्क्युलेटर’ भारत सरकारच्या ‘हेल्दी इंडिया’ या साईटवर उपलब्ध आहे. उत्तम आरोग्यासाठी धूम्रपान सोडा, हाच संदेश यातून घ्या.

    Related posts:

    1. अॉनलाईन आयडेंटिटी…
    2. घरबसल्या आनंद देणारे व्हर्च्युअल टूर्स (Lists)
    3. जागो ग्राहक जागो (Lists)
    4. उन्हाळ्याच्या सुटीतील ‘अॉनलाईन’ टाईमपास (Lists)
    5. अशाही मार्केटिंग कॅम्पेन्स…(Lists, Share)

    , ,

    This post was written by:

    Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


    Contact the author

    1 Comments For This Post

    1. आदिती Says:

      ही तर फ़ारच उपयुक्त माहिती सांगितलीत तुम्ही!

    Leave a Reply

    Powered By Indic IME
    This site is protected by WP-CopyRightPro