अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे आयुष्य जगणाऱ्या आणि नाकासमोर चालणाऱ्या मंदार देशपांडेला एके दिवशी एक पत्रं येतं आणि त्याचं आयुष्याला कलाटणी मिळते. त्याच्या जीवश्च-कंठश्च मित्रांच्या मदतीने त्या पत्ररूपी संकटाचा सामना करायला तो निघतो. पत्रातील संदेश, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती, त्यातून मिळत गेलेली गुप्त माहिती, त्याचे लावलेले अर्थ, जीवावर बेतणाऱ्या प्रसंग आणि मानिसक थकवा आणणाऱ्या या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार. आपला मंदार आणि त्याची मित्रमंडळी आता अंतिम टप्प्यात पोचले आहेत. पण पांडुरंगाचे वैर मंदारच्या पूर्वजांशी असल्यामुळे खरा लढा मंदारलाच द्यायचाय. बळवंतरावांना जे जमले नाही ते मंदारला जमेल? स्वामीजींकडून मिळालेल्या थोड्या-थोडक्या मार्गदर्शनाचा मंदारला फायदा होईल? मंदार पांडुरंगाला खरंच शह देऊ शकेल की पांडुरंग विजयी होऊन मुक्ती मिळवेल? या साऱ्या गोष्टी आज अंतिम लढाईनंतर स्पष्ट होतील. या अत्यंत रोमांचकारी कथेचा आजचा हा पंचविसावा आणि अंतिम भाग…
Download our first Fantastic Story-Mukti from here.
No related posts.


August 20th, 2009 at 7:31 am
kahi open hot nahi buwa….