उत्तम ‘लोगो’ तयार करण्यासाठी टिप्स (Tips)

Fri, Apr 10, 2009

Fantastic Tips

लोगो तयार करायचा म्हणजे तुम्ही ग्राफिक डिझायनरच पाहिजे असं नाही. कदाचित तुम्ही एखाद्या डिझायनर कडून तुमच्या कंपनीचा लोगो तयार करून घ्याल किंवा घेतला असेल. त्यामुळे उत्तम लोगो तयार करण्यासाठी काय केले पाहिजे हे जितके डिझायनरला माहित पाहिजे तितकेच तुम्हालाही.

लोगो हा कंपनीची आयडेंटीटी असतो. जेव्हा हा लोगो इतरांच्या लक्षात राहातो तेव्हा तो तुमच्या कंपनीचा ब्रॅंड म्हणून काम करतो. पण बऱ्याच वेळा लोगो हे लक्षात रहात नाहीत कारण ते तयार करण्यामागे काहीच विचार केलेला नसतो, असते ते फक्त डिझाईन. आणि विचाराशिवाय केलेले डिझाईन मग तो लोगो असो किंवा इतर काही, ते कधीच टिकत नाही. त्यामुळे लोगो डिझाईन करताना ज्याला फाईव्ह गोल्डन रूल्स असं म्हणतात ते कोणते ते आपण बघू.

१. तुमचा लोगो हा सुटसुटीतच असला पाहिजे. किचकट डिझाईन असू नये. अगदी लहान आकारापासून ते प्रचंड मोठ्या आकाराच्या तसंच वेगवेगळ्या आकाराच्या डिझाईन करता तो सारख्याच ताकदीने वापरता यायला हवा. अनेक वेळा लोगो डिझाईन करताना त्यात बऱ्याच लोकांचा सहभाग असतो. आणि त्यापैकी प्रत्येकाची ही स्वतःची मतं असतात त्यामुळे प्रत्येकाला त्यात एखादे डिझाईन एलिमेंट वाढवायचं असतं. त्यामागे त्या कंपनीचा पूर्ण इतिहास, कंपनी काय करते, काय करू इच्छिते, कंपनीची धोरणे काय इत्यादी अनेक गोष्टी या लोगो बघून कळाल्या पाहिजेत असा अट्टाहास असतो. पण इथे लक्षात घेतलं पाहिजे की लोगो हा या गोष्टी सांगण्यासाठी नसून या सगळ्या गोष्टींचा प्रातिनिधीक सिम्बॉल आहे. हे तुम्हाला या सर्वांना समजावून सांगितले पाहिजे.

२. तुमचा लोगो हा फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगांतही किंवा फक्त एका रंगातही आकर्षक दिसायला हवा. लोगो डिझाईन करताना अशा प्रकारे लोगो वापरण्याची वेळही येणार हे लक्षात घेऊन डिझाईन करा. खरं तर तुम्ही जे काही ऑप्शन्स तयार कराल ते सगळे फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगात तयार करा. आणि असा लोगो फायनल होईपर्यंत रंगाचा वापर करू नका. तुम्हाला लोगोमधून जे काही साधायचं आहे ते तुम्हा काळ्या पांढऱ्या रंगातून साधू शकला नाहीत तर रंगीत लोगोतून ते कधीच साधणार नाही.

३. प्रचलित असलेल्या गोष्टींचा तुमच्या लोगोमध्ये कधीच वापर करून नका. तुमची कंपनी मुंबईत आहे…. मग गेट वे ऑफ इंडिया किंवा एलिफंटा केव्ह्जचा सिम्बॉल म्हणून वापर करू नका.. किंवा कंपनीचा बिझनेस महाराष्ट्रभर आहे म्हणून महाराष्ट्राच्या नकाशाची आऊटलाईन वापरू नका. याच प्रकारे ज्या गोष्टी किंवा सिम्बॉल हे प्रचलित आहेत उदाहरणार्थ.. पृथ्वीचा गोल, न्यायदेवता इत्यादी. जर तुमच्या व्यवसायातील इतर लोक हे सिम्बॉल वापरत असतील तर तुम्ही या प्रचलित गोष्टींचा अजिबात वापर लोगोसाठी करू नका. विचार करा हेअर कटींग सलून आहे म्हणून त्याच्या लोगोत कात्री दाखवलीच पाहिजे काय?

तुमच्या कंपनीची ओळख प्रस्थापित करण्याचे काम लोगो करतो. जेव्हा हा लोगो इतरांच्या लक्षात राहातो तेव्हा तो तुमच्या कंपनीचा ब्रॅंड म्हणून काम करतो.

तुमच्या कंपनीची ओळख प्रस्थापित करण्याचे काम लोगो करतो. जेव्हा हा लोगो इतरांच्या लक्षात राहातो तेव्हा तो तुमच्या कंपनीचा ब्रॅंड म्हणून काम करतो.

४. रंगांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करा. रंगांच्या अक्षरशः हजारो शेड्स आपण पाहतो. कलरकार्डचा वापर करा. असाच रंग निवडा की जो मेसेज तुम्ही लोगोतून देऊ इच्छिता तो सांगण्यासाठी त्या रंगाची मदत मिळेल. रंग हे बोलके असतात आणि प्रत्येक रंगाचा विशिष्ठ स्वभाव असतो. प्रत्येक रंग हा काहीतरी सांगतो. असं व्हायला नको की तुम्हाला सांगायचं आहे एक पण केवळ रंगामुळे चुकीचा मेसेज जातोय. (उदाहरणार्थ स्क्युबा डायव्हिंग शिकवणाऱ्या कंपनीचा लोगो हा निळा किंवा सी ग्रिन कलरचाच हवा. तो पिवळा किंवा ऑरेंज कलरचा असला तर…???

५. लोगो डिझाईन करताना त्याचा वापर खूप मोठ्या काळासाठी असणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे खूप ट्रेंडी फॉन्ट्स आणि रंगांचा वापर टाळा. याचा अर्थ नेहमीचे फॉन्टच वापरा असाही नाही तर तुम्ही केलेला लोगो हा अधिक जास्त काळासाठी लोकांच्या लक्षात राहणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या. काळानुसार डिझाईनच्या ट्रेंड्स मध्ये होणारे संभाव्य बदलांचाही विचर कला. लोगो बघितल्यावर काहीतरी चांगली.. आनंददायी गोष्ट आपण बघितली आहे असा फिल लोगो बघणाऱ्याला वाटलं तरच हा लोगो लक्षात राहिल.

Related posts:

  1. चित्रकला शिकण्यासाठी पाच बेसिक टिप्स (Tips)
  2. ‘फेसबुक’वरील प्रायव्हसी राखण्यासाठी ५ टिप्स (Tips)
  3. एअर कंडीशनरचं बिल कमी करण्यासाठी…(Tips)
  4. अक्षर सुधारण्यासाठी…(Tips)
  5. घरासाठी रंगसंगती ठरवताना…(Tips)

This post was written by:

Grid - who has written 29 posts on Fantastic Five.


Contact the author

11 Comments For This Post

  1. pran Says:

    Very good job……………………….

  2. आदिती Says:

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. उत्साहाच्या भरात नेमकं हेच विसरायला होऊ शकतं. तुमची वेबसाईट डिझाईन छान आहे.

  3. Pradeep Says:

    Very good tips; particularly the suggestion of using black & white colors at the development stage is really smart!

  4. Pradeep Says:

    Very good tips…particularly the suggestion of usage of black & white at development stage is a smart idea!

  5. Nachiket Says:

    Apratim… farach sundar lihilay.. thanks for enlighten us with this very infomative tips… cheers! keep on writing…. & Pl ask Mr. Sudoku to post the forth part of the story..

  6. Sneha Pitre Says:

    Nice & Usefull Article… Keep on writing….

  7. Sudeshna Says:

    i am agree with Adity.. We always forgot basic rules in excitment…. congratulations for opening a wonderful topic…

  8. A.S.Deodhar Says:

    ultimate……no words….

  9. Harshal Says:

    khup chan mahiti dilit. mi kahi artist nahi, pan malahi aavadali hi mahiti… thnx

  10. veerendra Says:

    Nice informations about logo but few words from me .. i am logo designer and working as freelance for last 3 years. In my opinion Google is not good logo design .. its just worst design that ran market successfully ..
    logo ha lakshat yenara, wegala, sahaj lakshat rahila asa ani eksandh asava. evadhich apeksha asate. colors ani fonts he tyatle ghatak ahet . tya peksha hi war concept navachi gost yete. tya madhoon companichya wyawasayabaddal nature baddal kalate. kamit kami goshtitoon te wyakt zalyas logo uttam hoto ..

    mi mazya kadun kahi mat wyakt kele ahe. dhanyawad

  11. Grid Says:

    Yes Virendra ……
    i totally agree with you…. As per designers view google's logo is not a stand alone design… … but now this logo has become a biggest brand…. simplycity is the key… the way the google team make simple changes to logo with the concept without loosing his identity is a great thing….

    Thanks again… keep sharing

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro