- नॅनोटेक्नॉलॉजी आणि नॅरोमाईंडेडनेस (Eric Drexler)
- व्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #2)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #3)
- प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न (Paul Buchheit)
- लाँग लिव्ह ‘वेब’! (Tim Berners-Lee)
- एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)
- इन्स्पायर्ड बाय पीपल (Axel Meyer)
मागील भागातः ‘अॅपल’चा पुनरुद्धार
‘आयपॉड’ क्रांती ः
‘आयमॅक’च्या यशानंतर स्टीव्हच्या डोक्यात अजून एक विचार घोळत होता. तरुण पिढीला आकर्षित करून ‘अॅपल’चे पक्के ग्राहक बनवण्यासाठी संगीताचा धागा पकडता येईल का, याचा तो विचार करत होता. त्याच्या विचारांनी कल्पनेचे रूप घेतले आणि ‘पोर्टेबल डिजिटल म्युझिक प्लेयर’ बाजारात आणण्याचा घाट त्याने घातला.
दरम्यान, टोनी फॅडेल नावाच्या एका हार्डवेअर इंजिनिअरने स्टीव्हच्या कल्पनेतील ‘म्युझिक प्लेयर’ तयार केला होता. टोनी त्यावेळी ‘फिलिप्स’च्या ‘मोबाईल डिव्हिजन’मध्ये काम करत होता. त्याने नोकरी सोडून आपल्या कल्पनेस प्रत्यक्षात उतरवण्यास कोण मदत करेल, याचा अंदाज घेण्यास सुरवात केली. ‘अॅपल’ वगळता इतर सर्व कंपन्यांनी टोनीच्या कल्पनेस फोल ठरवले. टोनीने तयार केलेले ‘म्युझिक प्लेयर’चे प्रोटोटाईप अगदीच सुमार होते; पण त्याच्या कल्पनेत दम होता. म्हणून स्टीव्हने टोनीच्या नेतृत्त्वाखाली ३० जणांची स्वतंत्र टीम स्थापून या प्रोजेक्टवर काम करण्यास सांगितले.

२००१ मध्ये सादर केलेला आयपॉड क्लासिक. मुठीत मावणाऱ्या या इवल्याशा यंत्राने अख्ख्या जगाला भुरळ घातली.
‘डिजिटल म्युझिक प्लेयर’ तयार करणे हे काम ‘अॅपल’च्या पठडीतले नव्हते. त्यामुळेच स्टीव्हने ‘पोर्टल प्लेयर’ नावाच्या एका कंपनीशी करार केला. ‘पोर्टल प्लेयर’नेदेखील या कल्पनेवर थोडे काम अगोदर केले होते. आपल्या कल्पनेतील ‘म्युझिक प्लेयर’ तयार करण्यासाठी स्टीव्हने ‘पोर्टल प्लेयर’, टोनी फॅडेल आणि जोनाथन ईव्ह यांना एका वर्षाची मुदत दिली. ‘पोर्टल प्लेयर’ने आपले सर्व २०० कर्मचारी आणि भारतातील ८० इंजिनिअर्सना या प्रोजेक्टवर काम करण्यास सांगितले.
या प्रोजेक्टमध्ये स्टीव्ह पहिल्या दिवसापासून सहभागी झाला होता. पुढे-पुढे त्याचा सहभाग अधिक वाढला. तो दररोजच्या मिटींगलादेखील हजेरी लावू लागला. पण त्याच्या या सहभागामुळे ‘आयपॉड’च्या डिझाईन आणि परफॉर्मन्समध्ये प्रचंड ‘परफेक्शन’ आले. याचा आवाज जरा कमी वाटतोय, केवळ तीन क्लिकमध्ये गाणं सुरू झालं पाहिजे, डिस्प्ले अजून आकर्षक हवा, अशा सूचनांमुळे ‘आयपॉड’ अजून आकर्षक आणि युजर-फ्रेंडली होत गेला. २३ अॉक्टोबर २००१ ला स्टीव्हने ‘आयपॉड’ जगासमोर सादर केला आणि त्यानंतर या उत्पादनाने इतिहास रचला. स्टीव्ह आणि जोनाथनच्या जोडगोळीने ‘अॅपल’ला एका उंचीवर नेऊन ठेवले. ‘सोनी’चा ‘वॉकमन’ वापरणारी पिढी खिशात हजारो गाणी घेऊन फिरू लागली. ‘अायपॉड’ने एक ‘स्टाईल स्टेटमेंट’ तयार केले. आज तुम्ही तुमच्या आवडी-निवडीनुसार आणि गरजेनुसार तुमचा ‘अायपॉड’ निवडू शकता. ‘आयपॉड’चे अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. एप्रिल २००८ पर्यंत जगभरात १५ कोटींच्यावर ‘आयपॉड’ची विक्री झाल्याचे आकडेवारी सांगते. थँक्स स्टीव्ह. थँक्स जोनाथन!
(क्रमशः)
(पुढील भागातः ‘आयफोन’ नावाची जादू)
No related posts.



0 Comments For This Post
2 Trackbacks For This Post
April 7th, 2009 at 11:58 am
[...] मिळालेली पावतीच म्हणावी लागेल… (पुढील भागातः ‘अायपॉड’ क्रांती) pioneers, [...]
April 8th, 2009 at 1:35 pm
[...] भागांतः ‘अॅपल’चा पुनरुद्धार आणि ‘अायपॉड’ क्रांती ‘आयफोन’ नावाची जादू ः २००१ मध्ये [...]
Leave a Reply