कोण बरोबर? कुणाला वाचवायचं?

Thu, Jun 4, 2009

Fantastic 5, Grid

कोण बरोबर? कुणाला वाचवायचं?

नमस्कार मित्रहो…

नुकतंच एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघण्यात आलं - ‘मॅनेजरियल टास्क्स’ या विषयावरचं. आजकाल बहुतांश लोक कॉर्पोरेट कल्चरमध्ये वावरत असतात. समोर सगळं काही छान चाललेलं आपल्याला दिसत असतं; पण त्यामागे त्या कंपनीत काम करणाऱ्या असंख्य अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन कौशल्य पणाला लागत असतं. तुम्ही म्हणाल, यात नवल ते काय? प्रश्न सर्वांपुढेच उभे राहतात. यात विशेष ते काय? पण कंपनी व्यवस्थापनापुढे उभे राहणारे प्रश्न किती गंभीर असू शकतात, याबद्दलचे विवेचन त्या प्रेझेंटेशनमध्ये होते. त्यातली एक स्लाईड बघून अंतर्मुख व्हायला झालं. त्यात एक प्रश्न विचारला होता - कोण बरोबर? कुणाला वाचवायचं?

त्यामगची गोष्ट अशीः
एक रेल्वेलाईन आहे. एका ठिकाणी तिच्या ट्रॅकला दोन फाटे फुटलेले आहेत. एक ट्रॅक बंद आहे आणि दुसरा सुरू आहे. सुरू असलेल्या ट्रॅकवरून रेल्वे जाणार आहे. थोड्यावेळात रेल्वेचा आवाज येऊ लागतो. प्रचंड वेगात रेल्वे या ठिकाणाकडे येऊ लागते. पण जिथं ट्रॅकला फाटे फुटलेले आहेत तिथं पोचायच्या थोडं आधी मोटरमनच्या लक्षात येतं की, ज्या ट्रॅकवरून रेल्वे जाणार आहे त्या ठिकाणी १०-१२ मुलं खेळत आहेत. मोटरमन लांबून रेल्वेचा हॉर्न वाजवून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करतो. पण मुलं आपल्या खेळण्यात इतकी दंग असतात की त्यांचं हॉर्नकडे लक्षंच जात नाही. मोटरमनपुढे धर्मसंकट उभे राहते. आता मोटरमनपुढे तीन पर्याय आहेतः

  1. रेल्वे ब्रेक लावून थांबवायची. पण यामुळे गाडीचे सगळे डबे घसरतील आणि रेल्वेतल्या हजारेक प्रवाशांचे जीव धोक्यात येतील.
  2. त्या खेळणाऱ्या मुलांना उडवून पुढे जाणे. म्हणजे १०-१२ मुलांच्या जीवांच्या बदल्यात शेकडो प्रवाशांचे प्राण वाचतील.
  3. कंट्रोल रूमला सांगून बंद असलेल्या ट्रॅकवर गाडी वळवणे आणि हळूहळू थांबवणे.
    पण तेवढ्यात बंद असलेल्या ट्रॅकवरदेखील एक मुलगा खेळाताना त्याला दिसतो. अशा परिस्थितीत या ट्रॅकवर रेल्वे वळवली तर त्या निर्दोष मुलाचे प्राण जातील; पण रेल्वेतले प्रवासी आणि खेळणारी १०-१२ मुलं यांचे प्राण वाचतील…

आता त्या मोटरमनने काय करावं..?

  • या ट्रॅकवरून रेल्वे जाते, ही खेळायची जागा नाही; तरीसुद्धा त्यावर खेळणाऱ्या मुलांचा बळी देऊन रेल्वेतल्या प्रवाशांना वाचवावं; की
  • शेजारच्या ट्रॅकवरून रेल्वे जात असल्याने तिथं खेळणं धोक्याचं आहे, हे माहित असल्यामुळे बंद ट्रॅकवर खेळणाऱ्या निर्दोष मुलाचा बळी देऊन इतर १०-१२ मुलांना आणि गाडीतल्या प्रवाशांना वाचवावं; की
  • जोरात ब्रेक लावून गाडीतल्या प्रवाशांचे प्राण धोक्यात घालावेत?

सर्वसाधारणपणे कंपनी व्यवस्थापनाच्या पुढे जे प्रश्न उभे राहतात, ते या प्रकारचे असतात. त्यामुळे योग्य निर्णय न घेतल्यास कंपनीचेही नुकसान होऊ शकते किंवा कधी-कधी निर्दोष कर्मचाऱ्यांचे बळीही जाऊ शकतात. हीच बाब या गोष्टीतून अधोरेखित करायची आहे.

मी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय; पण अजूनही संभ्रमातच आहे. तुमच्यापुढे असा प्रसंग आला तर काय कराल??? कॉमेंटद्वारे कळवा.

No related posts.

, ,

This post was written by:

Grid - who has written 29 posts on Fantastic Five.


Contact the author

27 Comments For This Post

  1. hero Says:

    यात अवघड अस काय आहे? तुम्हाला चूक कोणाची आहे हे चांगल माहिती आहे.
    १) गाडीतल्या लोकांची चूक नाही त्यामुळे त्यांना त्रास होता कामा नये.
    २) बंद असलेल्या ट्रॅकवर खेळनार्‍या मुलाचाही काही दोष नाही त्यामुळे त्याला वाचवणे ही पण प्रायोरिटी आहे.
    ३) चुकीच्या ट्रॅक वर खेळत असलेल्या मुलांची चूक आहे त्यामुळे ती मिनिमम प्रायोरिटी वर आहेत. त्यांना वाचवता आला तर चांगलच पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सगळ्यात शेवटी करायचा.

  2. Scorpioking Says:

    I am in agreement with Hero.

  3. नम्रता Says:

    मान्य आहे की दोष 12 मुलांचा आहे , पण शेवटी ती हाडामासाची जिवंत माणसंच आहेत ना. अशा वेळी एका मुलासाठी बारा जणांचा बळी देणं कितपत योग्य आहे.

  4. Sunil Says:

    I am Agree with Hero..

  5. नारायण Says:

    अरे पण ती खेळणारी सगळी मुलं आंधळी आणि बहिरी असल्याचं का समजतोय आपण? एवढी मोठी गाडी धडधडत येताना त्यांना दिसणार नाही का? मुळात खेळात कितीही दंग असली तरी रेल्वेचा आवाज आणि हाॅर्न ऐकू येणार नाही, ही शक्यताच नाही… कानठळ्या बसतात त्या आवाजानी. उगाच काहीतरी अशक्यतेतल्या अटी घालायच्या आणि डोकं खाजवायला लावायचं याला काही अर्थ आहे का?

  6. hero Says:

    मी वर सुचवलेला उपाय हा कंपनी जर एथिक्स पाळणारी असेल तरच लागू पडतो. अदरवाइज़ बिजनेस वाइज कदाचित कंपनी त्या १० मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करेल
    आणि त्या एका मुलाचा बळी दिला जाईल.

  7. Shraddha Says:

    I agree with Hero, I personaly believe in karo aur bharo, jhachi chuk ahe tyala shiksha jhalich pahije…
    pan jyanchi chuk ahe tyanna ekhada chance milayla hava chuk sudharnyacha
    pan in case of such incidence jithe chance dyaycha paryay nasto tevha band aslelya track var gadi nene yogya…. karan jya khabardarine to ek mulga band track var khelat hota tya khabardarine to yenarya gadi kade hi lakshya deil ani to kadachit vachelhi… :)

  8. hero Says:

    well said shraddha..!

  9. Prasad Says:

    Agree with shraddha!!

  10. Zuben Says:

    First of all sorry for writing in English.. I can read Marathi but can't express in Marathi…

    Most people might choose to divert the course of the train, and sacrifice only one child. You might think the same way, I guess. Exactly, to save most of the children at the expense of only one child was rational decision most people would make, morally and emotionally. But, have you ever thought that the child choosing to play on the disused track had in fact made the right decision to play at a safe place?

    Nevertheless, he had to be sacrificed because of his ignorant friends who chose to play where the danger was. This kind of dilemma happens around us everyday. In the office, community, in politics and especially in a democratic society, the minority is often sacrificed for the interest of the majority, no matter how foolish or ignorant the majority are, and how farsighted and knowledgeable the minority are. The child who chose not to play with the rest on the operational track was sidelined. And in the case he was sacrificed, no one would shed a tear for him.

  11. Shri-rang Says:

    रेल वे आणि कंपनी च्या उदाहरणात एकाच साम्य आहे.
    बाकी सगळे विरोधाभास
    मोटर मन ला माणसाना वाचवायचे आहे…कहि मॅनेजर्स ना संधीचा फायदा घेऊन लोकणा काढायचे असते.
    काही वेळा चूक मॅनेजमेंट ची असते. पण बळी जातो वेगळ्याच लोकांचा.
    मोठ्या पदावरच्या लोकाना काढण्याच्या घटना फारच कमी घडतात.
    काही वेळेला प्रॉब्लेम काहीच नसतो…. आहे असे दाखवून लोकांचे पगार कमी केले जातात, किंवा त्यात अधिकाधिक कामे करून घेतली जतत….याचा रेलवे शी कसा संबंध लावायचा…

    लेखकाच्या भावना समजल्या … ज्याची चूक त्याला काढा म्हणाव

    आणि सगळेच बरोबर असतील तर सगळ्यानी मिळून संकटातून मार्ग काढा…. कोणालाही बाहेर घालवू नका….

  12. KEDS Says:

    SAVE THE CHILDREN THEY ARE OUR FUTURE……..

  13. KEDS Says:

    SAVE THE CHILDREN THEY ARE OUR FUTURE……..

  14. Westsweappeft Says:

    Hi, Congratulations to the site owner for this marvelous work you’ve done. It has lots of useful and interesting data.

  15. Karna Says:

    वा.. मस्त विषय आहे. उत्तर म्हणाल तर मी श्रद्धाशी सहमत आहे. सगळ्यांना वाचवण्याचा प्रय़त्न व्हायलाच हवा. अर्थात तेवढी रिस्क घेण्याची मॅनेजमेंटची तयारी हवी.

  16. SQueen Says:

    I agree with Shraddha.
    Sarvana tyanchi chuk sudharaycha ek tari chance milala pahije…
    Tarihi ya paristhith moterman train banda track warun neun.. sharthichya prayatnane tya mulala horn wajvun bajula honnyas sangun.. gadi thambvu shakto..

  17. Bhaanasa Says:

    hero व श्रध्दा दोघांचेही म्हणणे पटते. गाडीतल्या प्रवाशांचा ह्यात काहीच दोष नाही तेव्हा गाडीला अचानक ब्रेक लावून त्यांना धोक्यात टाकणे सर्वस्वी चुकीचे ठरेल. दहा-बारा मुले जाणूनबुजून तिथे खेळत आहेत. आपल्याला तरीही धोका नाही हे त्यांनी गृहीतच धरलेय. हे असे गृहीत धरणे ह्याच प्रसंगापुरते नाही तर संपूर्ण आयुष्यात ते अशाच प्रकारे वागणार आहेत ह्याचे द्योतक आहे. त्यांना वाचवायला हवे कारण जीव कुठल्याही स्थितीत वाचवावा. परंतु ज्या मुलाने समजून उमजून मित्रांबरोबर न जाता स्वत:ला तसेच ट्रेन मधील लोकांना सुरक्षित ठेवण्याचा मार्ग निवडला त्याला केवळ तो संख्याबळात एकटा आहे म्हणून बळी देणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. Indirectly केअरलेस वृत्तीला बढावा दिल्यासारखेच आहे हे.

  18. Neha Says:

    I Agree with Shraddha and Hero….

  19. Subhash Says:

    Well said Zuben…

  20. Baji Says:

    भोंगा वाजवा ..पोरे घाबरून बाजूला होतील

  21. nilam Says:

    jyaarthi to track band ahe mhanje tyamadhye kahi tari problem asnarach, mag tithun train nelyavar pravashache pran kase vachnar??

    Jo mulga band track var kheltoy, to trainchya avajakade laksh denarach nahi, karat tyala mahit ahe ki to track band ahe mhanun train tithun jau shakat nahi.

    Tyamule mala vatat, suru aslelya track varunach railway nyayala havi, karan ji mule thithe kheltat tyana tar mahitach asnar ki to track suru ahe, mag train chya avajane te bajula hou shaktat.

  22. Subhash Says:

    Hmmmm…. I think Nilam has point… but Shraddha & hero are also right….

  23. Charudatta Says:

    ट्रेन चा ब्रेक लावल्याने डबे कसेकाय घसरतील?

  24. rahul Says:

    the consept of prefrence is much more useful in such conditions the management allways think about the final results they r not bother about the midtime happnings if they want to reach the goal in time then they shoud go through most easy way.so i think the 12 chinderns life is not matters a lot for the moterman.if company is highly profesional.

  25. Kiran Says:

    मला तरी वाटत की, (नोकरी) कामावरुन काढून टाकने आणि जिव घेणे यात खुप फरक आहे ..
    नोकरी गेलेल्या माणसाला दूसरी नोकरी मिलू शकते पण जिवानिशी गेलेल्याच काय त्यामुले ह्या दोन गोष्टी वरुण एक निर्णय घेणे योग्य नाही असे मला वाटते आणि मनेगेमेंट (कंपनी) नेहमी स्वताचः फायदा बघते त्यामुले ते निरपराध माणसाचा बळी द्यायला मागे पुढे बघणार नाही .

  26. Rajaram Says:

    यात अवघड अस काय आहे? तुम्हाला चूक कोणाची आहे हे चांगल माहिती आहे.
    १) गाडीतल्या लोकांची चूक नाही त्यामुळे त्यांना त्रास होता कामा नये.
    २) बंद असलेल्या ट्रॅकवर खेळनार्‍या मुलाचाही काही दोष नाही त्यामुळे त्याला वाचवणे ही पण प्रायोरिटी आहे.
    ३) चुकीच्या ट्रॅक वर खेळत असलेल्या मुलांची चूक आहे त्यामुळे ती मिनिमम प्रायोरिटी वर आहेत. त्यांना वाचवता आला तर चांगलच पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सगळ्यात शेवटी करायचा.
    मला तरी वाटत की, (नोकरी) कामावरुन काढून टाकने आणि जिव घेणे यात खुप फरक आहे ..
    नोकरी गेलेल्या माणसाला दूसरी नोकरी मिलू शकते पण जिवानिशी गेलेल्याच काय त्यामुले ह्या दोन गोष्टी वरुण एक निर्णय घेणे योग्य नाही असे मला वाटते आणि मनेगेमेंट (कंपनी) नेहमी स्वताचः फायदा बघते त्यामुले ते निरपराध माणसाचा बळी द्यायला मागे पुढे बघणार नाही .

  27. savi Says:

    mala vatate, motorman ne shevat paryanta horn vajawat rahava. speed shakyatitake kami karave. khelanarya mulanpeki ekache tari lakshya nakki jail. to oradel an mule track pasun bajula jatil, nakkich. maza asa vishwas aahe.
    jithe jithe dangerous sthiti aahe ashya thikani board lawavet je board mulananhi kalatil, mhanaje apaghat honar nahit.

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro