‘फॉरवर्डस्’मधले कित्येक ई मेल आपण “डिलिट’ करून टाकतो. ते उघडून बघतही नसतो. गंमत म्हणजे तरीही ई मेलचा इन-बॉक्स तरीही अशा मेलनी रोजच्या रोज भरून जात असतो !
‘फॉरवर्डस्’मधला एखादा मेल उघडला, वाचला आणि मनापासून तो आणखी चार लोकांना पाठवावासा वाटला, असा प्रकार क्वचितच घडतो. परवा आलेला मेल या दुर्मिळ प्रकारातला. फक्त वाचून तो फॉरवर्ड करावा वाटला नाही. मुळचा इंग्लिश ई मेल मराठीत करून पाठवावासा वाटला.
***
जगभरातले सगळे प्रसिद्ध चर्च पाहून त्यावर पुस्तक लिहायचं एका अमेरिकन अभ्यासकानं ठरवलं.
त्यानं चीनचं तिकीट काढलं आणि तिथं गेला.
पहिल्याच दिवशी चर्चमध्ये फिरताना आणि फोटो काढताना त्याला दिसला एक सोनेरी टेलिफोन. भिंतीत ठेवलेल्या या फोनखाली नोटीस होती…’दहा हजार डॉलर्स प्रति कॉल’
एका कॉलचा दर इतका महाग?…चक्रावून गेलेल्या अमेरिकन अभ्यासकाने पाद्री गाठला आणि त्यांना विचारले की कशासाठी इतका महागडा टेलिफोन वापरला जातोय?
पाद्री उत्तरले, ‘ही स्वर्गाशी जोडलेली डायरेक्ट लाईन आहे आणि दहा हजार डॉलर्समध्ये तुम्ही देवाशी थेट बोलू शकता…’
आभार मानून अभ्यासक पुढे चालू लागला…
अभ्यासकाचा पुढचा मुक्काम होता जपानमध्ये. तिथल्या भव्य कॅथेड्रिलमध्ये त्याला तोच सोनेरी टेलिफोन पुन्हा दिसला. चीनमध्ये दिसलेला टेलिफोन तो हाच का, या कुतुहलापोटी शेजारच्या ननला त्याने फोनचा उद्देश विचारला.
तिने सांगितले, ही स्वर्गाशी बोलण्याची डायरेक्ट लाईन आहे आणि दहा हजार डॉलर्समध्ये तुम्ही थेट देवाशी बोलू शकता.
‘धन्यवाद…’, एवढे बोलून अभ्यासक पुढे चालला….
अमेरिकन अभ्यासकाने नंतर पाकिस्तान, श्रीलंका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सला भेटी दिल्या.
प्रत्येक चर्चमध्ये त्याला तोच सोनेरी टेलिफोन दिसला आणि प्रतिकॉल दहा हजार डॉलर्सचा दरही.
आता परतीच्या प्रवासापूर्वी भारतात जाऊन तिथले चर्च आणि भारतीयांकडेही तोच टेलिफोन आहे हे पहावे, असे अभ्यासकाने ठरवले.
अमेरिकन अभ्यासक भारतात आला आणि पहिल्याच चर्चमध्ये त्याला तो सोनेरी टेलिफोन दिसला…! फरक इतकाच होता, की त्याखालच्या नोटीसीत म्हटलं होतं, “एक रुपया प्रतिकॉल…!’
जग फिरलेला अमेरिकन थक्क झाला…त्याने तिथल्या फादरना विचारले, ‘फादर, मी सगळीकडे फिरलोय. हा सोनेरी टेलिफोन सगळीकडे आहे. ही स्वर्गाशी बोलण्याची डायरेक्ट लाईन असल्याचे सगळ्या ठिकाणी मला सांगण्यात आले…पण, सगळीकडे एका कॉलचा दर दहा हजार डॉलर्स आहे…मग फक्त भारतातच इतका स्वस्त दर कसा?…’
***
वाचकांनो, आता तुमची वेळ आहे. उत्तर वाचण्यापूर्वी तुम्हीही थोडा विचार कराल?
***
फादर स्मितहास्य करीत म्हणाले, “मुला, तू आता भारतात आहेस…आणि म्हणून हा ‘लोकल कॉल’ दर आहे…’
जगाचे हेच तर स्वर्ग आहे…
No related posts.


May 5th, 2009 at 6:01 pm
सही!!!