ती पाहताच बाला, संगणक दौडविताना…

Wed, Jun 24, 2009

Clone, Fantastic 5

ती पाहताच बाला, संगणक दौडविताना…

प्रसंग १ः
बॉस परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची सेक्रेटरी विनिता आज जरा निवांत होती. तिथल्या अपॉईंटमेंट्स, हॉटेल बुकिंग, एअर बुकिंग, व्हिसा आदी भानगडींमुळे गेले पंधरा दिवस प्रचंड धावपळीत गेले होते आणि या साऱ्या गडबडीत तिचा सखा, साथीदार - म्हणजे तिचा कॉम्प्युटर तिला सारखा दगा देत होता. मध्येच हँग काय व्हायचा, प्रिंट देताना प्रॉब्लेम काय व्हायचा, साधं ‘वर्ड’ ओपन करायला पाच मिनिटं काय घ्यायचा…अशा अनंत अडचणींना गेल्या पंधरा दिवसात तिला तोंड द्यावं लागलं होतं. आज बॉसची गडबड नसल्याने तिने मेन्टेनन्स डिपार्टमेंटमधील शरदला फोन केला. तो म्हणाला दुपारनंतर येऊन जाईन.

लंचनंतर शरद आला. त्याने काहीतरी खुडबूड करत कॉम्प्युटर चेक केलं आणि उसासा टाकत म्हणाला, “सिरियस प्रॉब्लेम दिसतोय. बहुतेक फॉरमॅट करावा लागेल पीसी. तुमच्याकडे बॅक-अप आहे का?”
विनिता एकदम ब्लँक होती. शरदला आपली चूक लक्षात आली. तो म्हणाला, “काळजी करू नका. तुमचा सगळा डेटा मी दुसऱ्या हार्ड डिस्कवर घेऊन ठेवतो. कॉम्प्युटर फॉरमॅट करून आणून देतो. पण किमान तीन-चार तास लागतील. चालेल का?” विनिताने होकार दिल्यावर त्याने कनेक्शन्स काढली व सीपीयू घेऊन तो चालू लागला.
ते पाहून मॉनिटरकडे बोट दाखवत विनिता म्हणाली, “शरद, चाललाच आहेस तर हे पण घेऊन जा आणि फॉरमॅट करून आण. नाहीतरी आज मला फारसं काही काम नाहीये.”

यावर हसावं की रडावं हे शरदला सुचत नव्हतं…

प्रसंग २ः
नीलिमाचा कॉम्प्युटर प्रचंड स्लो झाला होता. साधी-साधी अॅप्लिकेशन्स ओपन व्हायलादेखील खूप वेळ लागत होता. कामाच्या घाईत असं काही झालं की, प्रचंड मनस्ताप होतो. त्यामुळे आज कॉम्प्युटर नीट करून घेऊयात, असे ठरवून तिने मेन्टेनन्सच्या शरदला बोलावलं. (बिच्चारा) शरद आला. त्याने तिच्या कॉम्प्युटरचा ताबा घेत सर्व ड्राईव्ह्ज चेक केले. त्याच्या लक्षात अालं की ‘सी’ ड्राईव्हवर खूप कमी स्पेस राहिलीय. त्यामुळे त्याने गरज नसलेल्या फाईल्स उडवायला सुरवात केली. महत्त्वाच्या फाईल्स तो नीलिमाला विचारत इतर ड्राईव्हवर ट्रान्स्फर करत होता. रेग्युलर क्लीन-अप करत तो डेस्कटॉपवर आला आणि रिसायकल बिनवर जाऊन त्याने ‘एम्प्टी रिसायकल बिन’वर क्लिक केलं. ते पाहून नीलिमा जोरात किंचाळली.

“शरद…काय केलं हे? अरे, त्या फोल्डरमध्ये मी सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स आणि काही डॉक्युमेंट्सचा बॅक-अप ठेवला होता…तो तू चक्क डिलीट केलास. मला न विचारता? आता काय करू मी?”

शरद रडवेला झाला होता. चूक त्याचीच होती ना…रिसायकल बिन साफ करू की नको, हे त्याने विचारायला हवं होतं… :-)

प्रसंग ३ः
“प्रवीण, अरे मला एक ब्लॉग सुरू करायचाय. मला मदत कर ना,” प्राजक्ता म्हणाली.
बायकोने केलेला हट्ट पुरवला नाही तर आपण बाराच्या भावात जाऊ शकतो, याची प्रवीणला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्याने मुकाट्याने ब्लॉग सुरू केला. थीम कोणती ठेवायची यावर दोघांची दोन दिवस चर्चा झाली. रंग या विषयाचा प्रवीणला काहीही गंध नसल्याने ती थीम सिलेक्शन त्याने प्राजक्तावर सोपवले. पण दोघांचे एकमत काही होईना. शेवटी प्रवीणनेच एक टेम्प्लेट निवडून ब्लॉग लाईव्ह केला. एकदा ब्लॉग पाहा, असा फोन त्याने प्राजक्ताला केला. प्राजक्ताने तो पाहिला; पण प्रवीणने सिलेक्ट केलेली थीम तिला आवडली नाही. तिने फोन करून त्याला तसे सांगितले. यावर हीच थीम कशी चांगली अाहे, हे तिला समजावून सांगण्याचा व्यर्थ प्रयत्नही प्रवीणने केला. दरम्यान, त्याच्या ब्लॉगर अकाऊंटमधून त्याने प्राजक्ताला या ब्लॉगवर लििहण्यास इन्व्हाईट केले होते. तिकडे प्राजक्ता प्रचंड भडकली होती. तेवढ्यात तिला ब्लॉगरकडून आलेली ई-मेल दिसली. Pravin Invites you to contribute for his blog…असं काहीसं त्यात लिहिलं होतं. मला थीम आवडलेली नसतानाही प्रवीण अशी मेल कशी काय पाठवू शकतो, असे तिला वाटले आणि रागाच्या भरात तिने त्या ई-मेलला रिप्लाय पाठवलाः YOU ONLY CONTRIBUTE TO YOUR BLOG…अर्थात, पुढच्याच सेकंदाला ती मेल बाऊन्स झाली.

संध्याकाळी तिने प्रवीणला हा किस्सा सांगितला तोवर तिला कळाले नव्हते की ती ई-मेल ब्लॉगरकडून आली होती. तिने केलेल्या ‘सरदार’गिरीवर दोघेही खो-खो हसत सुटले.

Update: प्रसंग ४ः
अस्मिताच्या बॉसने तिला एक महत्त्वाचा रिपोर्ट तयार करायला सांगितला होता. त्यासाठी तिला १५ ब्रँच अॉफिसेसमधील मॅनेजर्सकडून त्या-त्या ठिकाणचे रिपोर्ट मागवायला लागणार होते. उद्या दुपारपर्यंत रिपोर्ट पाठवा, अशी ई-मेल तिने सगळ्यांना पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून रिपोर्ट यायला लागले. वर्ड किंवा एक्सेल फाईलमध्ये ही मंडळी रिपोर्ट पाठवत होती. बेंगलोरहून आलेला रिपोर्ट तिच्याकडे ओपन होत नव्हता. तेवढ्यात तिचे लक्ष फाईलनेमकडे गेले आणि, ‘काय बिनडोक असतात ही लोकं…मॅनेजर म्हणवतात स्वतःला आणि साधी एक्सेल फाईल नीट पाठवता येत नाही,’ असं म्हणत तिने बेंगलोरला फोन लावला.
मॅनेजरः नमस्कार मॅडम, बोला. रिपोर्ट पाठवला अात्ताच.
अस्मिताः हो. मेल मिळाली तुमची. पण तो रिपोर्ट ओपन होत नाहीये. त्या…
मॅनेजरः एक मिनिट हं…मी चेक करतो.
अस्मिताः त्या फाईलचं नाव तुम्ही चुकवलंय.
मॅनेजरः म्हणजे? Bangalore Report असं नाव आहे. यात काय चुकलं?
अस्मिताः नाही. ते बरोबर आहे. पण पुढे xls असं असतं ना…त्यात एक x जास्त पडलाय. त्याचं xlsx असं झालंय…

मॅनेजरला आपली चूक लक्षात आली. अस्मिताही तिच्या जागी बरोबर होती. खरी चूक मायक्रोसॉफ्टचीच होती. अॉफिस २००७ मधील सर्वच अॅप्लिकेशनमध्ये एक x चुकून जास्तंच पडलाय. ः-)

या चारही प्रसंगात एक समान धागा आहे - तो म्हणजे मुली आणि त्यांचे कॉम्प्युटर ज्ञान! ‘आयटी’ आणि इतर संबंधित क्षेत्रातील तमाम मैत्रिणींची माफी मागून सांगतो की, गाडी चालवणाऱ्या आणि कॉम्प्युटर वापरणाऱ्या मुली सर्वांत धोकादायक! उजवीकडचे इंडिकेटर देऊन डावीकडे वळू शकतात, रिसायकल बिनमध्ये बॅक-अप ठेऊ शकतात…काहीही करू शकतात त्या. एकूणच काय, तर जपून राहा. गाडी चालवताना आणि कॉम्प्युटरच्या बाबतीतही! नाहीतर होतं काय, आपण जायचो मदत करायला आणि… असो, मुद्दा एवढाच होता. तो समस्त मुलींची क्षमा मागून मांडण्याचं धाडस केलं. त्यावर वाद-विवाद, क्रिया-प्रतिक्रिया येतीलच…

जाता जाता एकच…

ती पाहताच बाला
संगणक दौडविताना ।
हाय रे दैवा हाय
हा बंड्याच खलास का नाही झाला…? ।।

(इथे उल्लेख केलेले प्रसंग शंभर टक्के खरे असून त्यातील व्यक्तींची नावे तेवढी बदलण्यात आली आहेत. यातील शरद या व्यक्तीची कीव येऊन याचं शीर्षक ‘शरदाचं चांदणं’ द्यावं की काय, असाही एक विचार मनात येऊन गेला. शेवटच्या चार ओळींसाठी सुडोकूरावांना धन्यवाद.)

No related posts.

, , , ,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

4 Comments For This Post

  1. navat kay ahe Says:

    , रिसायकल बिनमध्ये बॅक-अप ….lol

  2. Subhash Says:

    अहो, बरोबरच आहे..तुमचच चुकलय.. टोपलीच्या आकाराचं काही दिसलं ती त्यात काहीतरी साठवलंच पाहीजे ना…. आणि जर सीपीयू फॉर्मॅट होऊ शकतो तर मॉनीटर का नाही.. शेवटी दोन्ही इलेक्ट्रीसीटीवरच चालतं ना….

    खो,,, खो.. खो…….

  3. sameer Says:

    Girls and technical things are antonyms… Ata 'niragas' vagere mhanun loka eikun ghetat, pan muL mudda rahatoch… Ya dantakathancha ek pustak nighala pahije ;)

  4. Clone Says:

    :-)

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro