‘अॉर्कुट’चा वापर करून आपल्याकडे अनेक गुन्हे घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांची ‘मोडस अॉपरेंडी’ जाणून घेणं प्रचंड आव्हानात्मक आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईलमधील माहितीचा किंवा तिच्या स्टेटस मेसेजेसचा गुन्हेगार कसा वापर करेल, याचा अंदाज लावणं अत्यंत कठीण आहे. आपल्याकडे आता ‘फेसबुक’चाही वापर हळू-हळू वाढत आहे. कोणतीही सोशल नेटवर्किंग सेवा वापरताना स्वतःला काही मर्यादा घालून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आपण शेअर करत असलेली माहिती एखाद्या गुन्हेगाराच्या हाती लागू नये, यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी. तुम्ही ‘फेसबुक’ वापरत असाल तर पुढे दिलेल्या पाच महत्त्वाच्या प्रायव्हसी टिप्स फॉलो कराः
१. सर्च सेटिंग्ज
‘फेसबुक’च्या फ्रेंड सर्चमधून तुमचे मित्र तुम्हाला शोधू शकतात. अर्थात, तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्याशिवाय त्यांना तुमची संपूर्ण माहिती पाहायला मिळणार नाही; पण तुम्हाला कोणी शोधू नये याकरता तुम्ही ‘फेसबुक’च्या फ्रेंड सर्च फीचरमधून गायब होऊ शकता. Search Privacy Settings Page वर जाऊन ‘सर्च व्हिजिबिलिटी’ मधील तुम्हाला पाहिजे तो अॉप्शन (एव्हरीवन, अोन्ली फ्रेंड्स, इ.) सिलेक्ट करून सेव्ह चेंजेसवर क्लिक करा.
तुमचे ‘फेसबुक’ प्रोफाईल विविध सर्च इंजिनमधून देखील सर्च करता येऊ शकते. तुम्हाला ही सुविधा नको असल्यास याच पेजवरील Public Search Listing सेटिंग ‘अनचेक’ करा. तुमची प्रायव्हसी राखण्यासाठी तुम्ही या सेटिंगचा वापर करू शकता.
२. फोटो प्रायव्हसीः
‘फेसबुक’वर तुम्ही अपलोड केलेले सर्वच्या सर्व फोटो सगळ्यांनीच पाहावे असे नसतात. काही क्षण तुम्हाला तुमच्या अगदी जवळच्या मित्रांसोबतच शेअर करायचे असतात. यासाठी Photos Privacy Page वर जाऊन तुम्ही अपलोड केलेल्या विविध अल्बमसाठी या सेटिंग्ज बदलू शकता. उदा. एखादा अल्मब सर्वांसाठी असेल; तर एखादा अल्बम तुमच्या फ्रेंड लिस्टमधील मित्र किंवा अगदी तुम्ही म्हणाल तेच मित्र पाहू शकतील. केवळ एखाद्या मित्रापासून हे क्षण लपवायचे असतील तरीदेखील लपवता येतील.
३. प्रोफाईल आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनः
तुम्ही बिझनेस वाढवण्यासाठी किंवा कॉन्टॅक्ट्स वाढवण्यासाठी ‘फेसबुक’चा वापर करत असला तरी घराचा पत्ता किंवा मोबाईल नंबर वगैरेंसारखी महत्त्वाची माहिती ‘फेसबुक’वर असणाऱ्या सर्वांना देण्याच्या फंदात पडू नका. अशा माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे Profile Privacy Page वर जाऊन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनवर क्लिक करा. इथे तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीच्या सेटिंग्ज बदलू शकता.

४. फ्रेंड्स व्हिजिबिलिटीः
तुमच्या फ्रेंडलिस्टमधील काही मित्रांना इतरांसोबत त्यांची आयडेंटिटी शेअर करण्याची इच्छा नसू शकते; किंवा तुम्हाला फ्रेंड म्हणून अॅड करणाऱ्यांना कदाचित तुमच्या फ्रेंड लिस्टमधील काही निवडक मित्र-मैत्रिणींचं काय चाललंय, हे जाणून घेण्याचीच अधिक इच्छा असू शकते. अशा मित्र-मैत्रिणींची प्रायव्हसी राखण्यासाठी Profile Privacy Page वरील बेसिक सेटिंग्जमध्ये जाऊन फ्रेंड्सवर क्लिक करा. तुमची फ्रेंड लिस्ट कोण-कोण पाहू शकतं, याच्या सेटिंग्ज तुम्ही येथून बदलू शकता.
५. अॅप्लिकेशन प्रायव्हसीः
तुम्ही अनेक फेसबुक अॅप्लिकेशन वापरत असाल. अॅप्लिकेशन वापरून केलेल्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीचा अपडेट तुमच्या फ्रेंडलिस्टमधील सगळ्या मित्रांना जातो. उदा. Have sex! नावाच्या अॅप्लिकेशनचा अपडेट असा जातोः
XYZ is having Sex! Click here to see more or try it yourself!
Have Sex! हे अॅप्लिकेशन गमतीसाठी असलं तरी असा मेसेज जाणं म्हणजे जरा…
असो. तर एखादं अॅप्लिकेशन वापरल्यानंतर त्याचे अपडेट्स पाठवायचे किंवा नाही याच्या सेटिंग्ज तुम्ही Applications page वर जाऊन बदलू शकता.
Related posts:





Leave a Reply