बाप ज्ञानेश्वर

बाप ज्ञानेश्वर

नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा झाला. त्यानिमित्तानं ही शब्दांजली…
खरंतर त्या शब्दप्रभूला या अोळी वाहणं म्हणजे सोन्याच्या राशीवर मातिची चिमूट उधळणं. पण मातीची का असेना, त्यामागे भावना स्वच्छ आहेत, ही त्यातल्या त्यात अभिमानाची गोष्ट…
श्री ज्ञानदेवार्पणमस्तु…

जाहला अंधार, लोपला दिनकर
रात्र ही भयाण दाटूनी आली
मन हे व्याकूळ सापडेना सूर
करावे काय आकळेना
भेटलास दू, दिले आत्मभान
पाहूनी प्रकाश शांतावलो
समाधी बैसोनि श्रांतविसी देवा
मनासी देसी आत्मप्रबोध
मनाचे भेद केलेस दूर
द्वैतातुनी अद्वैती नेलेस बा
कसा होऊ तुझा बापा उतराई
माऊली झालास ज्ञानदेवा
उधळीशी प्रेम, देसी साक्षात्कार
मज पामराला दावी प्रकाश
किती गाऊ आता, वर्णू किती गुण
मती तोकडी ती पडते आहे…

No related posts.

This post was written by:

Sudoku - who has written 39 posts on Fantastic Five.


Contact the author

2 Comments For This Post

  1. bhaanasa Says:

    Sudoku अतिशय सुंदर काव्य. चाल लावायचा प्रयत्न करायला हवा. खरेच गेयता आहे आणि राजस-भक्तीरस झरतो आहे असेच वाटते. आवडले.

  2. Vinayak Pachalag Says:

    Hi,
    Nice one
    I seek help from FFIVe team
    I am the administrator of the site
    http://www.rangkarmi.com
    I want to know what template you have used So I can impliment
    Please help
    waiting

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro