एखादी नवी वस्तू घेताना आपण चारचौघांकडे त्या वस्तूची विचारणा करतो. कोणत्या कंपनीची वस्तू चांगली आहे, वॉरंटी/गॅरंटी किती आहे, वस्तू कशी आहे आदी गोष्टींची चौकशी करतो. आजकाल अनेक जण इंटरनेटवर थोडासा रिसर्च करून ठरवतात आणि मगच ती वस्तू घ्यायला जातात. यावरून ग्राहक जरा जागरूक होण्यास सुरवात झालीये, असे म्हणावयास हरकत नाही. केवळ जाहिरात बघून एखादी वस्तू घ्यायला गेल्यास फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यापुढे जाऊन त्या वस्तूची सविस्तर माहिती घेणे, संबंधित वस्तूची लोकांनी लिहिलेली परीक्षणे वाचणे, त्यावरील प्रतिक्रिया जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.
उदा. खाली दिलेल्या स्कीनशॉटवरील मजकूर वाचत जा. तुम्ही जर ही वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर हे वाचून तुम्ही तो निर्णय बदलून दुसऱ्या उत्पादनाचा विचार कराल. (इमेज सेव्ह करून वाचा किंवा Ctrl + करा)
वस्तू खरेदी केल्यानंतर त्यात काही बिघाड झाल्यास किंवा एखाद्या कंपनीच्या सेवेबद्दल किंवा ग्राहक सेवेबद्दल तुमच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही त्या खालील साईटच्या माध्यमातून सदर कंपनीपर्यंत पोचवू शकता किंवा तुमचे वैयक्तिक अनुभव (बरे/वाईट) या साईट्सवर पोस्ट करू शकता.
१. माऊथशट डॉट कॉम
२. कन्झ्युमर कम्प्लेन्ट्स डॉट इन
३. कन्झ्युमर ग्रीव्हन्स डॉट कॉम
४. कम्प्लेन्ट्स बोर्ड डॉट कॉम
५. माय वूज डॉट कॉम
Related posts:



Leave a Reply