असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठीचे रंग (Tips)

Thu, Apr 30, 2009

Fantastic Tips

कल्पना करा.. रणरणतं उन…घामाच्या धारा… तहान लागलेली आणि तुमच्या समोरून पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे कपडे घातलेली माणसं येताहेत… कसं वाटेल तुम्हाला.. विचारही नको. मात्र आता अशा वेळी निळ्याशार रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती तुमच्या समोर आली तर किती बरं वाटेल… नुसत्या रंगाच्या वापरानेही आपण हा उन्हाळा सुसह्य करू शकतो. त्यासाठी या फॅन्टास्टिक फाईव्ह टिप्स

  • कडक उन्हात जाताना शक्यतो पांढरा किंवा लाईट कलरच्या कपड्यांचा वापर करा. पांढरा रंग हा सगळ्यात जास्त सूर्यकिरणे म्हणजेच उष्णता परावर्तित करतो.
  • काळा रंग हा सूर्यकिरणे शोषून घेत असल्याने या रंगाच्या कपड्यांचा वापर उन्हाळ्यात शक्यतो टाळा. मात्र दिवशी भरपूर वारा असेल त्यादिवशी काळ्या रंगाचे सैलसर कपडे घालायला हरकत नाही. कारण काळा रंग ज्या वेगाने उष्णता शोषून घेतो त्यापेक्षा अधिक वेगाने वाऱ्यामुळे ती नाहिशी होते.
  • लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग उत्तेजक रंग आहेत. शुद्ध मराठीत सांगायचे तर या रंगांकडे बघितल्यावर रक्त खवळते. म्हणजेच हे उष्ण रंग आहेत. काही जणांचा रक्तदाबही लाल रंगाकडे सतत बघितल्याने वाढतो. अशा रंगाचे कपडे शक्यतो टाळावेत.
  • भर उन्हाळ्यात तुम्हाला थंडगार निळ्याशार पाण्यात डुंबायला मिळालं तर…? निळा रंग हा शांततेचं प्रतिक आहे. या रंगाकडे बघितल्यावर मन शांत होतं. त्यामुळे उन्हाळ्यात या रंगाचे कपडे अवश्य घालावेत.
  • आता थंडगार वाळ्याचं सरबत डोळ्यापुढे आणा. साधारणपणे उन्हाळ्यात असं आढळते की आपण ऑरेंज सरबतापेक्षा वाळ्याचं सरबत अधिक पसंत करतो. यात थंडपणा हा वाळ्याचा गुणधर्म मानला तरी हिरव्या रंगाचाही त्यात तेवढाच वाटा आहे. हिरवा रंग हा निसर्गात जागोजागी आढळणारा रंग आहे. हा रंग शांत रंग आहे आणि चैतन्याचं प्रतिक मानलेला आहे. आणि या रंगामुळेही मन शांत होते…त्यामुळे या रंगाचा वापरही उन्हाळ्यात करायला हरकत नाही.

No related posts.

, ,

This post was written by:

Grid - who has written 29 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro