Fantastic Five » Fantastic Lists

बाधित
“सर, ती जागा घेऊ नका. बाधित आहे ती.”

“छे छे… मी नाही असल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवत. आणि असल्या भाकड गोष्टींवर विश्‍वास ठेवून इतक्‍या कमी रेटमध्ये हाती पडणारी मोक्‍याची जागा काही मी घालवणार नाही.’

“रागावू नका. पण आमचं सांगायचं काम होतं, ते आम्ही केलं. नंतर म्हणू नका, की यांनी असली जागा आमच्या गळ्यात मारली.’

“काही म्हणणार नाही मी. तुम्ही व्यवहार पूर्ण करून टाका. कधी एकदा त्या फ्लॅटमध्ये राहायला जातोय, असं झालंय मला.’

“ठीक आहे. जशी तुमची इच्छा.’

प्रसाद आणि एजंटमध्ये चर्चा सुरू होती. प्रसादला तो पॉश एरियातला पॉश फ्लॅट मनापासून आवडला होता. चौथ्या मजल्यावरचा ड्युप्लेक्‍स फ्लॅट. टेरेस. अगदी मस्त, हवेशीर आणि पॉश! त्याच्या टेरेसमधून मस्त रात्र, गार हवा आणि चंद्र अनुभवता येणार होता. मित्रांचा अड्डा जमवता येणार होता. मुख्य म्हणजे फ्लॅट उगवतीच्या दिशेला नव्हता. त्यामुळे घरात थेट सूर्यकिरणंही येत नव्हती आणि उजेडामुळे झोपमोड होणार नव्हती. थोडक्‍यात, तो फ्लॅट त्याला हवा तसा होता आणि किंमतही कमी होती. त्यामुळे मालकाचं मन बदलण्याआधी व्यवहार पूर्ण करण्याची त्याला घाई झाली होती आणि एजंट ही नसती खुसपटं काढत होता. काय तर म्हणे बाधीत जागा. खरंतर जागा वगैरे काही बाधित नव्हती, तो मालकच सरकलेला आहे, असं प्रसादला वाटत होतं. काय त्याचे डोळे, काय त्याचे केस… सगळं जरा विचित्रच होतं. त्या मालकाला मानसोपचारांची गरज होती; पण जाऊ दे. घराचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांना हे शहाणपण सुचू दे. आधीच सुचलं, तर फ्लॅट हातचा जायचा, त्याच्या मनात स्वार्थी विचार डोकावला.

प्रसाद बॅचलर होता आणि साताऱ्याला असणारे आई-बाबा लग्नासाठी त्याच्या मागे लागले होते. आज ना उद्या ते करायचंच होतं. त्यामुळेच त्यानं फ्लॅट शोध मोहीम हाती घेतली होती आणि अचानकच हा उत्तम फ्लॅट त्याच्या हाती लागला होता. तो, आई आणि बाबा असं छोटंसं कुटुंब. घरची परिस्थिती ठीकठाक; पण उपजतच हुशार असलेला प्रसाद शहराकडे वळला आणि एक एक पायरी मोठ्या कष्टानं पार करत पुढे चालला होता. असो, तर प्रसादनं तेच घर घेण्याचं निश्‍चित केलं. विशेष म्हणजे त्या घराच्या मालकानंही प्रसादशी बोलण्याचा प्रयत्न केला होता; पण प्रसादनं त्यांनाही उडवून लावलं.

त्यानं सारा व्यवहार पूर्ण केला आणि तो त्या फ्लॅटमध्ये राहायलाही गेला. अगदी आनंदात होता तो. घरी आई-बाबांनाही कळवलं. तेही लवकरच त्याचं नवं घर पाहायला, काही दिवस राहायला येणार होते. नव्या घराची मित्रांना पार्टीही देऊन झाली. एक आठवडा झाला. सगळं काही मस्त चाललं होतं. प्रसाद त्या जुन्या घर मालकाला आणि एजंटला मनातल्या मनात हसत होता. पुढच्या वेळी तो एजंट भेटल्यास, त्या मालकाला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्याचा सल्लाही तो देणार होता. अर्थात त्या घरात राहायला आल्यापासून प्रसादला स्वतःमध्ये काही बदल घडत असल्याचं जाणवत होतं; पण ते खूप पॉझिटिव्ह होते. पॉश वस्तीतल्या पॉश घरात राहायला लागल्यानंतर घडतील तेवढे! तो आता स्वतःची नीट काळजी घेऊ लागला होता. कपड्यांबाबत चुझी झाला होता. वागण्यात थोडा आखडूपणा आणि थोडा डौल आला होता. शनिवार रविवारी एकदम फॅशनेबल कपडे घालू लागला होता. पण हे बदल आज ना उद्या होणारच होते. तरुण लग्नाळू होता तो! ते बाधित वगैरे म्हणतात, त्यातलं त्याला काही जाणवलंही नव्हतं.

होता होता महिना सरला. आणि तो एजंट अचानकच अवतरला. रविवारचा दिवस होता तो. रात्रभर धिंगाणा घालून प्रसाद दिवसभर डाराडूर झोपला होता. त्याला उशीरानं जाग आली. अंधार पडला होता. तसा तो अजूनही आळसावलेलाच होता; पण उठून आवरावं, जरा भटकून यावं, थोडी पोटपूजाही करावी, असा विचार करून तो पलंगावरून उठला. बेसिनसमोर दात घासत उभा राहिला आणि बेल वाजली. त्यानं दार उघडलं, तर समोर एजंट उभा होता. एजंट प्रसादला पाहून आणि प्रसाद त्या एजंटला पाहून दचकलाच.

“”तुम्ही? आत्ता? काय विशेष?” प्रसादनं विचारलं.

“”काही नाही. म्हटलं, तुमचं कसं चाललंय ते पाहावं…”

“”त्यात काय पाहायचं ? मस्त चाललंय माझं. या आत या.”

“”पण तुम्ही हे काय करताय आत्ता ?”

“”काय म्हणजे ? दिसत नाही, दात घासतोय… थांबा जरा. आलोच तोंड धुवून…”

प्रसाद आत गेला आणि एजंट अचंब्यानं घर पाहू लागला.

“”बोला, काय म्हणताय ? कसं चाललंय तुमचं काम ?”

“”आमचं चालूच आहे ? काल तुम्ही दिसला नाही पालखीला…”

“”पालखी ? हां… जाऊ द्या हो. नाही जमलं मला…. शनिवार होता काल…”

“”आहो पण पालखी चुकवलीत?”

“”जाऊ द्या हो… किती वेळ तुम्ही तेच ते विचारणार आहात. काल शनिवार होता आणि आमची मस्त पार्टी होती. ती एंजॉय करायची, की तुमच्या त्या पालखीबिलखीला यायचं? असल्या भाकड गोष्टींवर विश्‍वास नाही ठेवत मी…’”

“”प्रसादराव… काय बोलताय काय तुम्ही… आहो…”

“”तुम्ही कशाला घाबरता. मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. जरा डोळे उघडून पाहा आजूबाजूला, जग कुठे चाललंय आणि आपण कुठे आहोत…”

“”म्हणजे तुम्ही कोणतीच गोष्ट मानत नाही…”

“”जे मला पटतं, तेच मी मानतो. शनिवारची रात्र धिंगाणा घालायची असते, तो मी घालतो. उगाचच या पालखी वगैरे भाकड गोष्टींमध्ये वेळ कशाला घालवायचा ?”

“”काय बोलताय काय तुम्ही ? आहो आपण कोण आहोत, याचा तरी विचार करा…”

“”काही गरज नाही विचार करण्याची. त्या सुद्धा भाकड कथाच आहेत शेवटी…”

“”काय ? तुम्ही आपलं अस्तित्वही नाकारता आहात…”

“”नाहीतर काय ? उगाचच अस्तित्वात नसलेल्या गोष्टी का स्वीकारयच्या ?”

“”तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही काय बोलताय ते ?”

“”न यायला काय झालंय… तुमचं बोलणं झालं असेल, तर सांगा. मला अजून आवरायचं आहे. मस्त शॉवर घ्यायचा आहे… आज क्‍लबवर जायचं ठरलंय आम्हा मित्रांचं.”

“”आंघोळ ? मी आलो तेव्हा तुम्ही दात घासत होता…”

“”आता यात काही चुकीचं आहे का ? दात घासणं आणि आंघोळ करणं यात वावगं काय आहे ? उगाच चारचौघात बोलाल, तर लोक वेड्यात काढतील तुम्हाला…”

“”वावगं नाही ? आपला संबंध काय या गोष्टींशी ?”

“”तुमचा नसेल संबंध स्वच्छतेशी; पण माझा आहे आणि प्रियाला भेटायला जाताना मला नाही आवडत असं पारोसं जायला…”

“”प्रिया ? कोण ही प्रिया ?”

“”तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी ? तो माझा खासगी प्रश्‍न आहे. तुम्ही टळा पाहू आता… मला उशीर होतोय…”

प्रसादनं एजंटला बाहेर काढलं; पण एजंट मात्र त्याच्या मागावरच राहिला. दोन रात्रीत त्यानं साऱ्या गोष्टी टिपल्या आणि त्याची खात्रीच झाली, की प्रसादला त्या घरानं झपाटलं आहे…

आता मात्र तो थांबला नाही. त्यानंच निर्णय घेतले आणि प्रसादच्या आई-बाबांना बोलावून घेतलं. सोबत चार-पाच जणांनाही घेऊन यायला सांगितलं.

“”काय हो, झालं काय असं ?” प्रसादच्या बाबांनी विचारलं

“”तुम्हीच पाहा आणि खात्री करा…”

त्यानुसार प्रसादचे आई-बाबाही लगेच आले. ते प्रसादच्या घरी राहिले आणि दुसऱ्याच दिवशी घाबरेघुबरे होऊन एजंटकडे धावले…

“”आहो, हा असा काय वागतोय ? आमच्यासमोर दात घासत होता. आंघोळीला जातो म्हणाला. रात्री कुठला क्‍लब की काय तिकडे गेला. आणि आज त्याच्या प्रिया नावाच्या मैत्रिणीला घेऊन येणार आहे… आहो, ती मनुष्य आहे हो… भुतानं कधी मनुष्याशी लग्न केलं आहे का ? सगळंच विपरीत. आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहायची समाजात. तरी मी सांगत होते, त्याला शहरात नका पाठवू. बिघडला ना आता तो… आपण भूत आहोत, हेही विसरून गेलाय. नाहीतर दात घासणं, आंघोळी करणं, कसले कसले स्प्रे फवारणं याचा काही उपयोग असतो का आपल्याला. ज्यांना शरीर आहे, त्यांना ठीक आहे ते… आपल्याला काय ? पाणीही भिंतीवर पडणार आणि स्प्रेचा फवाराही भिंतीवरच उडणार… आणि त्या मुलीला कसा भेटतो, ते वेताळच जाणे.”

“”वेताळ काय जाणे… परवा तो पालखीलाही आला नव्हता वेताळाच्या…” एजंट म्हणाला.

“”काय सांगता… आता काय करायचं हो. तुम्हीच सांगा काहीतरी. मार्ग काढायलाच हवा आता…”

“”माझ्या ओळखीचा एक मांत्रिक आहे इथं. वेताळबाबांचा साक्षात्कार झालाय त्याला. त्यांच्या मंदिराचाच पुजारी आहे तो. तेच काहीतरी मार्ग काढतील. तुम्ही फक्त तुमच्या चिरंजीवांना तिथपर्यंत न्यायची व्यवस्था करा…”

“”ते करतो आम्ही; पण हे असं कसं झालं हो… त्याला इतक्‍या चांगल्या हडळी सांगून येत होत्या… आता ही बातमी पसरली तर… पुढचं अवघडच होईल हो. आम्हाला एक मुलगीही आहे. तिचं कसं जुळावं… मनुष्याच्या नादी लागलेल्या भावाच्या बहिणीला कोण पत्करेल…”

“”तुम्ही नका काळजी करू. ही गोष्ट आपल्या बाहेर जाणार नाही. तुम्ही फक्त आज रात्री वेताळबाबांच्या मंदिरात या.”

प्रसादच्या आई-बाबांनी मग त्याची समजूत काढून, लग्नाचा मुहूर्त शोधण्याच्या आमिषानं आणि लग्न आपल्याच पद्धतीनं लागेल या अटीवर त्याला तयार केलं, त्याची समजूत काढली आणि वेताळबाबांच्या मंदिराचा रस्ता धरला.

“”पुजारीबुवा, तुम्हाला यांनी साऱ्या गोष्टी सांगितल्याच असतील. आता तुम्हीच मार्ग काढा…”

“”हं… एकंदर अवघड दिसतंय सगळं. हा ज्या घरात राहात होता, ते घर आहे एका कट्टर नास्तिकाचं. त्यांचा त्यांच्या देवावर विश्‍वास नसतो, तर आपल्यावर कसा असेल ? त्यांनीच झपाटलंय याला. आता त्याचा स्वतःवरच विश्‍वास नाही. त्याला माणूस व्हायचंय आता…”

अखेरीस सुमारे चार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर प्रसाद पुन्हा एकदा माणसात, आपलं भुतांत आला… त्याचं एका हडळीशी लग्नही झालं आणि एक भूत मार्गी लागलं…

“”सच्या… कसल्या गोष्टी सांगतोस रे…”

सचिन, राहूल, अम्या, मंद्या आणि दीपक मस्त अड्डा जमवून बसले होती. भुतांच्या गोष्टीचा विषय निघाल्यावर सच्यानं त्यांना ही मजेशीर गोष्ट सांगवून गप्पांतली रंगत वाढवली…

“”नाहीतर काय… दरवेळी तुमचं तेच काहीतरी भितीदायक, म्हटलं जरा बदल करावा.”

“”बरोबर आहे. मजा आली…” साऱ्यांनी एका सुरात अनुमोदन दिलं…

“”मग… चला यावर होऊन जाऊ दे एक एक…”

“”अम्या… चल रे उठ…”

“”अम्या, अरे अम्या… अम्या कुठे गेला रे ?”

“”इथं तर होता. असेल बघ. नाहीतर टॉयलेटला गेला असेल.”

“”अबे, बराच वेळ झाला. पडला बिडला नाही ना… मंद्या त्याला पाहून ये जरा…”

“”अरे इथं नाहीये…”

“”गेलाय कुठं?”

“”मित्रांनो… मी आहे. इथंच आहे. सच्या, थॅंक्‍यू. तुझ्या त्या कथेमुळे माझे डोळे उघडले. जे आपलं नाही, त्याला मोह धरू नये आणि आपलं जपून ठेवावं हे समजलं… इतके दिवस मी तुमच्यात राहिलो. तुम्हीही मला आपलं मानलंत. धन्यवाद ! सच्या तुझ्या गोष्टीतल्या प्रसादसारखीच माझी गत झाली होती. माणूस नसताना मी स्वतःला माणूस समजून बसलो होतो. स्वतःची भूतयोनीच विसरून गेलो होतो. घाबरू नका. मी मित्रच आहे तुमचा. यापुढे कधी गरज भासली, तर हाक मारा मी आहेच…”

कथेला भलतंच वळण मिळालं होतं. त्या कथेमुळे एकाला दिशा सापडली होती आणि इतरांची दशा बिघडली होती…

No related posts.

बाप ज्ञानेश्वर
नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा झाला. त्यानिमित्तानं ही शब्दांजली…

खरंतर त्या शब्दप्रभूला या अोळी वाहणं म्हणजे सोन्याच्या राशीवर मातिची चिमूट उधळणं. पण मातीची का असेना, त्यामागे भावना स्वच्छ आहेत, ही त्यातल्या त्यात अभिमानाची गोष्ट…

श्री ज्ञानदेवार्पणमस्तु…

जाहला अंधार, लोपला दिनकर

रात्र ही भयाण दाटूनी आली

मन हे व्याकूळ सापडेना सूर

करावे काय आकळेना

भेटलास दू, दिले आत्मभान

पाहूनी प्रकाश शांतावलो

समाधी बैसोनि श्रांतविसी देवा

मनासी देसी आत्मप्रबोध

मनाचे भेद केलेस दूर

द्वैतातुनी अद्वैती नेलेस बा

कसा होऊ तुझा बापा उतराई

माऊली झालास ज्ञानदेवा

उधळीशी प्रेम, देसी साक्षात्कार

मज पामराला दावी प्रकाश

किती गाऊ आता, वर्णू किती गुण

मती तोकडी ती पडते आहे…

No related posts.

अॉनलाईन आयडेंटिटी…
कॉलेजच्या शेवटच्या सेमेस्टरमधली ती प्रचंड धावपळ अजूनही अाठवतेय. प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करण्यापूर्वीची ती घाई-गडबड, रिपोर्टमधले दोन सेक्शन्स माझ्याकडे आणि इतर सेक्शन्स पार्टनरकडे असल्याने प्रिंट्स काढताना प्रचंड गोंधळ उडाला होता. अख्खा प्रोजेक्ट रिपोर्ट एका फ्लॉपीवर बसत नव्हता म्हणून त्याचे दोन भाग करण्याचा हा उद्योग करावा लागला होता. प्रिंटरकडे गेल्यानंतर एकाच फ्लॉपीतील फाईल ओपन होत होती. दुसरी फ्लॉपी करप्ट झाल्याचा मेसेज येत होता. पुन्हा रूमवर जाणं आलं. शेवटी चिडून दहा फ्लॉपीचा एक बॉक्स विकत घेतला. सगळ्या फ्लॉपीवर तीच फाईल कॉपी केली आणि प्रिंटरकडे आलो. म्हटलं, घ्या आता. पाहा यातली कोणती फ्लॉपी चालतेय ती. फ्लॉपी हा प्रकार म्हणजे असून अडचण नसून खोळंबा होता. पण गेल्या चार-पाच वर्षांत हे सारं बदलून गेलंय. दीड एमबीच्या फ्लॉपीपासून आठ जीबींच्या पेनड्राईव्हपर्यंत आणि सातशे एमबींच्या सीडीपासून एक टेराबाईटच्या एक्स्टर्नल हार्ड डिस्कपर्यंतचा हा प्रवास खरंच उल्लेखनीय आहे. फ्लॉपी (हा जीवघेणा प्रकार) आज नावलाही सापडणार नाही. अनेक गोष्टी तर अॉनलाईनच एकडून-तिकडे पाठवता येतात. त्यासाठी पेनड्राईव्ह किंवा हार्डडिस्कचीदेखील गरज उरलेली नाही.

बायोडेटा किंवा रिझ्युमच्या बाबतीतही असाच प्रकार घडायचा. मला आठवतंय - कॉलेज संपल्यानंतर नोकरी शोधण्यासाठी मी आणि माझ्या एका मित्राने थेट मुंबई गाठली होती. सोबत रिझ्युमच्या काही प्रिंट-आऊट्स आणि फ्लॉपीज होत्या. पहिल्या दोन-तीन दिवसांतच आम्ही सात-आठ एचआर कन्सल्टन्सीमध्ये जाऊन रिझ्युम देऊन आलो. प्रिंट आऊट्स संपल्या तरी फ्लॉपीवर त्याच्या कॉपीज होत्या, म्हणून आम्ही निर्धास्त होतो. पण दुसऱ्याच दिवशी फ्लॉपीने आपला रंग दाखवला. फ्लॉपी करप्ट झाल्याचा मेसेज आला आणि आमच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. आता काहीही करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे अगोदर ज्या कन्सल्टन्सीमध्ये रिझ्युम दिला होता तिथून फोटोकॉपीज करण्यासाठी तो परत घ्यावा लागला. आम्हाला फोटोकॉपीज काढण्यापुरता रिझ्युम परत हवा आहे, हे समजल्यावर तिथल्या मुलीने ‘न जाने कहाँ-कहाँ से चले आते है,’ अशा आशयाचे जे एक्स्प्रेशन्स दिले ते मी अाजही विसरू शकत नाही. जाम खजील व्हायला झालं होतं. त्यानंतर मेलबॉक्समध्ये रिझ्युम ठेवण्याची पद्धत मी अवलंबली. त्यामुळे असा प्रसंग पुन्हा कधी आला नाही.

आता काळ खूप पुढे गेलाय. आज अॉनलाईन विश्वात जगताना प्रिंट आऊट्सचा कमीत-कमी वापर करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. प्रत्येकाने स्वतःची पक्की अॉनलाईन ओळखही निर्माण केली आहे. अॉरकुट, फेसबुक, लिंक्ड-इनसारख्या सेवांचा वापर करून तुमच्या बद्दलची प्राथमिक माहिती एखाद्या व्यक्तीस मिळू शकते. यासह काही विशेष सेवांचा वापर करूनही तुम्ही तुमची अॉनलाईन ओळख आणखी पक्की करू शकता. अशाच पाच अॉनलाईन प्रोफाईलिंग सेवांची माहिती आज तुमच्यासाठी देतोय.

गुगल प्रोफाईल्सः

तुम्ही ‘गुगल’चे फॅन असाल असाल आणि गुगलच्या बऱ्याचशा सेवा वापरत असाल तर गुगल प्रोफाईल ही सेवा वापरून स्वतःचे छोटे प्रोफाईलही तयार करू शकता. http://www.google.com/profiles/your google username या पत्त्यावर कोणीही तुमचे प्रोफाईल अॅक्सेस करू शकेल. यात नाव, पत्ता, पद, कंपनी, शिक्षण आदींसह तुम्ही स्वतःबद्दल थोडक्यात माहिती लिहू शकता. तुमच्या ब्लॉग्जसह इतर सोशल मीडिया प्रोफाईलच्या लिंक्सही तुम्ही येथे देऊ शकता. या प्रोफाईलची लिंक तुम्ही ई-मेल किंवा इतर सेवांच्या माध्यमातून इतरांशी शेअर करू शकता.

श्मॅप मीः

एखाद्या नवख्या शहरात फिरताना कुठे रहावे, काय पाहावे, कुठे खावे आदी प्राथमिक गोष्टींची माहिती आपल्याला सतत लागत असते. याचा कितीही पूर्वाभ्यास केला तरी ऐनवेळी गोंधळायला होतं. अशा वेळी श्मॅपचे डेस्कटॉप आणि मोबाईल गाईड्स तुमच्या उपयोगास येऊ शकतात. या मूळ संकल्पनेला पुढे नेत श्मॅपने ‘श्मॅप मी’ नावाची पर्सनल प्रोफाईलिंग सेवाही सुरू केली. http//www.schmap.me/yourname या पत्त्यावर तुमचे प्रोफाईल अॅक्सेस करता येऊ शकते. यात तुम्ही नाव, घर किंवा अॉफिसचा पत्ता, ई-मेल, फोनसह तुमची थोडक्यात माहिती लिहू शकता. घर किंवा अॉफिसच्या पत्त्यावरून शेजारी गुगल मॅपवर तुमचे लोकेशनही दाखवले जाते. Schmap.me वरील प्रोफाईल मोबाईलवरही डिस्प्ले होतात. अॉनलाईन बिझनेस कार्ड म्हणून तुम्ही या सेवेचा वापर करू शकाल.

रिटॅगर

तुमच्या सर्व सोशल मीडिया साईट्सचे महाद्वार म्हणून तुम्ही रिटॅगरचा वापर करू शकता. वेब २.० बिझनेस कार्ड म्हणूनही ही सेवा प्रचलित आहे. इतर कोणत्याही प्रोफाईलिंग सेवेच्या तुलनेत रिटॅगर एक पाऊल पुढे असल्याचे आढळून येते. प्रोफाईल कार्ड, प्रोफाईल पेज, प्रोफाईल विजेट, स्टेटस मेसेज इमेज, इमेज टॅगिंग, ई-मेल सिग्नेचर, बॅजेस असे अनेक फीचर्स यात तुम्हाला आढळतील. http://www.retaggr.com/page/yourname या पत्त्यावर तुमचे प्रोफाईल पेज आणि http://www.retaggr.com/card/yourname या पत्त्यावर तुमचे बिझनेस कार्ड अॅक्सेस करता येऊ शकते.

लिंक्ड-इन

तुमच्यापैकी अनेक जण लिंक्ड-इन या नेटवर्किंग सेवेचा नक्कीच वापर करत असतील. यावरील तुमचे पब्लिक प्रोफाईल http://www.linkedin.com/in/yourname या पत्त्यावर अॅक्सेस करता येऊ शकते. लिंक्ड-इनच्या Account & Settings > Public Profile मध्ये जाऊन तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही पब्लिक प्रोफाईलमध्ये दाखवू शकता.

व्हिज्युअल सीव्हीः

यापूर्वीच्या चार सेवा तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती देणाऱ्या होत्या. पण याहीपुढे जाऊन तुम्ही तुमचा अख्खा रिझ्युमही अॉनलाईन तयार करून इतरांशी शेअर करू शकता. व्हिज्युअल सीव्ही ही सेवा वापरून तुम्ही http://www.visualcv.com/yourname या पत्त्यावर तुमचा मल्टिमीडिया रिझ्युम अॅक्सेस करू शकता. व्हिज्युअल सीव्ही वापरून रिझ्युम तयार करणे केवळ काही मिनिटांचे काम आहे. यात नाव, गाव, पत्त्यासह तुमचा अनुभव, कौशल्य, प्रशिक्षण, तुम्ही केलेले कामही (उदा. एखादे प्रेझेंटेशन, एखादा व्हीडिओ, इ.) इथे दाखवता येते. याखेरीजही यात अनेक नावीन्यपूर्ण सुविधा आहेत. त्यांचाही फायदा तुम्ही घेऊ शकता.

बोनस - फेसबुक व्हॅनिटी यूआरएल:

फेसबुकवर असणाऱ्यांनी व्हॅनिटी यूअारएल अर्थात तुमच्या पब्लिक प्रोफाईलची खास लिंक अगोदरंच सेट केलेली असेल. तुम्ही अद्याप तुमच्या फेसबुक पब्लिक प्रोफाईलची लिंक सेट केली नसल्यास http://www.facebook.com/username/ या लिंकवर जाऊन सेट करू शकता.

अॉनलाईन जगात जगायचे असेल तर सेल्फ प्रमोशनचे असे अाधुनिक पर्याय वापरायलाच हवे. तुम्हाला काय वाटतं? यासारख्या आणखी काही सेवा तुम्हाला माहित असतील तर त्याही जरूर शेअर करा.

No related posts.

घरबसल्या आनंद देणारे व्हर्च्युअल टूर्स (Lists)
जगातली सात आश्चर्ये म्हणा किंवा रिओ दि जानेरो सारखे नयनरम्य शहर म्हणा - या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जाऊन यावे असं तुम्हा-आम्हा सर्वांनाच वाटत असतं. पण ते शक्य होतंच असं नाही. अनेक ठिकाणी आपण जाऊन येतो; पण तरीही आणखी एखादा दिवस असता तर हे ही पाहून झालं असतं, अशी हुरहूर लागून राहते. बऱ्याच वेळा एखाद्या ठिकाणी जाण्याअगोदर अापण इंटरनेटवर भरपूर रिसर्च केलेला असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी जायचेय तिथला कानाकोपरा आपल्याला अगोदरंच माहित झालेला असतो. यासाठी कामाला येतात ते अशा जगप्रसिद्ध स्थळांचे व्हर्च्युअल टूर्स! अशाच काही प्रसिद्ध स्थळांच्या व्हर्च्युअल टूर्सची ही यादी. जाण्यापूर्वी पाहून अभ्यास करू शकता, जाऊन आल्यानंतर पुन्हा एकदा पाहून आठवणी ताज्या करू शकता किंवा जाण्याचं राहिलं तर घरबसल्या पाहून आनंद घेऊ शकता…

जगातील सात आश्चर्येः नव्याने जाहीर झालेल्या सात आश्चर्यांचे व्हर्च्युअल टूर्स

चांद्रमोहिमः अपोलो ११, १२ आणि १७ या यानांच्या साह्याने चंदावरील सफरीचा हा मनमोहक अनुभव अराऊंडर डॉट कॉम या साईटने तयार केला आहे. या साईटवर जगातल्या अनेक प्रमुख शहरांचे व्हर्च्युअल टूर्स उपलब्ध आहेत.

लूव्र म्युझियमः पॅरिसमधील जगप्रसिद्ध लूव्र म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव

रेअर बुक रूमः मला भयंकर आवडलेली ही साईट. शेक्सपियर, गॅलिलिओसारख्या महान व्यक्तींची पुस्तकं तुम्ही इथे वाचू शकता. त्यांच्या मूळ पुस्तकांचे स्कॅन्स या साईटवर जसेच्या तसे पाहता आणि वाचता येतात.

रिओ दि जानेरोः जगातील सर्वांत सुंदर शहर म्हणून ख्याती असलेल्या रिओ दि जानेरोचा 3D Aerial व्हर्चुअल टूर.

No related posts.

जागो ग्राहक जागो (Lists)
एखादी नवी वस्तू घेताना आपण चारचौघांकडे त्या वस्तूची विचारणा करतो. कोणत्या कंपनीची वस्तू चांगली आहे, वॉरंटी/गॅरंटी किती आहे, वस्तू कशी आहे आदी गोष्टींची चौकशी करतो. आजकाल अनेक जण इंटरनेटवर थोडासा रिसर्च करून ठरवतात आणि मगच ती वस्तू घ्यायला जातात. यावरून ग्राहक जरा जागरूक होण्यास सुरवात झालीये, असे म्हणावयास हरकत नाही. केवळ जाहिरात बघून एखादी वस्तू घ्यायला गेल्यास फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यापुढे जाऊन त्या वस्तूची सविस्तर माहिती घेणे, संबंधित वस्तूची लोकांनी लिहिलेली परीक्षणे वाचणे, त्यावरील प्रतिक्रिया जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

उदा. खाली दिलेल्या स्कीनशॉटवरील मजकूर वाचत जा. तुम्ही जर ही वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर हे वाचून तुम्ही तो निर्णय बदलून दुसऱ्या उत्पादनाचा विचार कराल. (इमेज सेव्ह करून वाचा किंवा Ctrl + करा)

वस्तू खरेदी केल्यानंतर त्यात काही बिघाड झाल्यास किंवा एखाद्या कंपनीच्या सेवेबद्दल किंवा ग्राहक सेवेबद्दल तुमच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही त्या खालील साईटच्या माध्यमातून सदर कंपनीपर्यंत पोचवू शकता किंवा तुमचे वैयक्तिक अनुभव (बरे/वाईट) या साईट्सवर पोस्ट करू शकता.

१. माऊथशट डॉट कॉम

२. कन्झ्युमर कम्प्लेन्ट्स डॉट इन

३. कन्झ्युमर ग्रीव्हन्स डॉट कॉम

४. कम्प्लेन्ट्स बोर्ड डॉट कॉम

५. माय वूज डॉट कॉम

No related posts.

मोठ्यांमधील लहानांसाठी 5 अॅनिमेशनपट आणि एक बोनस! (Lists)
सध्या मी एका विशिष्ट मानसिक अवस्थेतून जात आहे. म्हणजे कसे की अशावेळी नेहमी चमचमीत आवडणारा मी तुमीभा म्हणजे तुप-मीठ-भात खातो; तब्येत आणि मन अशावेळी थोडं हळुवार असतं म्हणून मग धाडधाड रॉक सोडून ईगल्सचं ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ किंवा रहमानचं ‘तू ही रे’ ऐकतो. तर कधी-कधी मूड असा असतो की रात्री उशीरा एखादा मस्त हॉलीवुड किंवा स्टायलीश कोरियन सिनेमा बघण्याऐवजी मी चक्क लवकर झोपतो! थोडक्यात काय तर मी एकदम एक शहाणं बाळ असतो. म्हणजे आईला वाटावं की एकतर चिरंजीव वेडे तरी झाले आहेत किंवा देव तरी पावला.

मला खात्री आहे की आपण सर्वच जण असा मूड कधी कधी एकदम एन्जॉय करतो. चला मग…आज आपण आपल्यातल्या बाळाला मस्त ट्रीट देऊ.

5. वॉल-ई

पिक्सार म्हणजे क्वालिटी! त्यामुळे त्यांचा वॉल-ई हा चित्रपट त्यांच्या दर्जाला अगदी साजेसा झाला आहे. सर्व-विनाशानंतरच्या पृथ्वीवर प्रामुख्याने घडलेली ही कथा. उदास-भकास असणारे आकाश, कायम नजरेच्या टप्प्यात असणारे क्षितिज, सर्वत्र पसरलेले आणि युद्धभूमिची जाणिव करून देणारे लोखंडी भंगार – ही या कथेची सेटींग. या अशा सेटींगमध्ये आशेचे किरण दोन – एक म्हणजे 700 वर्षे अविरतपणे भंगार-कॉम्प्रेसिंगचे काम करणारा आपला नायक वॉल-ई आणि अजूनही तग धरून असलेले एक हिरवे रोपटे. माणसे सगळी BnL (बाय अॅन्ड लार्ज) या कंपनीच्या एका स्पेसशिपवर आपला इतिहास विसरून जीवन कंठत असतात. हालचाल काहीच नसल्याने म्हणा किंवा त्याची गरज नसल्याने माणसे सगळी फिरत्या खुर्च्यांना खिळलेली…अगदी संवादसुद्धा व्हिडीओ मेसेजिंगद्वारे! स्पेसशिप पुर्णपणे रोबोट-नियंत्रित. अशा वेळी ईव्ह नावाची एक रोबोट पृथ्वीवर जीवनाच्या खाणाखुणा शोधायला पाठवण्यात येते. 700 वर्षांमध्ये माणसांसारख्या भावभावना निर्माण झालेला आपला वॉल-ई या अनाहूत ईव्हच्या प्रेमात पडतो, त्याच्या ईव्हवरील प्रेमामुळे घडत जाणाऱ्या घटनांमुळे माणसांना पुन्हा पृथ्वीचा ‘शोध’ लागतो आणि ते पृथ्वीवर परततात – अशी ही कथा. सुंदर कथा!

4. रॅटॅटुई [Ratatouille]

पिक्सारचाच अजून एक नितांतसुंदर सिनेमा म्हणजे रॅटॅटुई. रॅटॅटुई म्हणजे एक फ्रेंच पदार्थ…याच्या रेसिपीमध्ये रस असणाऱ्यांसाठी ही लिंक.

या चित्रपटाचा नायक आहे एक उंदीर! या मुषकमहोदयांना उष्टे अन्न आवडत नाही, यांना चवीचे ज्ञान अगाध. बल्लवांची राजधानी असलेल्या पॅरीसला जाऊन यांना वेगवेगळ्या रेसिपी बनवायच्या आहेत…मग त्याचं पॅरीसला येणं, सगळ्यात प्रसिद्ध रेस्तरॉंमध्ये एका पोऱ्याच्या टोपीत बसून पदार्थ तयार करणं वगैरे सगळ्या साहसांची भन्नाट कथा म्हणजे ‘रॅटॅटुई’.

3. मॉन्स्टर्स

या सिनेमात सगळ्यात भारी काय आहे तर याची कल्पना. आपल्या लहानपणी रात्री स्वप्नात वगैरे येऊन आपल्याला घाबरवणारी राक्षसमंडळी (गब्बर, पोलीसमामा वगैरे मंडळी तिकडे नाहीत) यांच्या दुनियेभोवती ही कथा फिरते. या मॉन्स्टरांच्या जगातले इंधन म्हणजे लहानग्यांनी यांना घाबरून फोडलेल्या किंकाळ्या! या किंकाळ्या बाटलीत बंद करून त्यापासून वीज निर्मिती केली जाते. अशा या जगात किंकाळ्या बाटलीत भरून आणणाऱ्यांची एक वेगळी फौजच असते. या फौजेमध्ये सुलीव्हन-माईक जोडगोळी म्हणजे स्टार परफॉर्मर. सुलीव्हनसोबत चुकून एक गोड मुलगी यांच्या जगात येते आणि मग धमाल चालू होते.  सुलीव्हन-माईकला लक्षात येते की छोट्यांच्या किंकाळ्यांपेक्षा त्यांच्या हास्यामध्ये वीजनिर्मिती जास्त होते. शिवाय त्यांच्या बॉसने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यापासून कसलाही जंतुसंसर्ग होत नाही. उलट ही मुलगी सुली-माईकला असा काही लळा लावते की तिला वाचवण्यासाठी आणि तिला पुन्हा तिच्या घरी पोचवण्यासाठी या जोडगोळीची धडपड चालू होते. या धडपडीची कथा म्हणजे हा चित्रपट.

2. आईस-एज

आपल्या मंडळींपासून दुरावलेले एक बाळ, त्याचा फडशा पाडायचाच असा विडा उचलेला वाघ, बाळाला त्याच्या बाबांकडे पोचवायची जबाबदारी गळ्यात पडलेली मॅनी हत्ती आणि सिड स्लोथ यांची जोडगोळी, त्यांना रस्ता दाखवायच्या आमिषाने वाघांच्या जाळ्याकडे घेऊन जाणारा दिएगो वाघ, आणि यांच्या पार्श्वभुमीवर आईस-एजच्या भीतीने दक्षिणेकडे स्थलांतर करणारे समस्त प्राणी – ही थोडक्यात या चित्रपटाची कथा. मनात कपट असणारा दिएगो वाघ बाळाच्या निर्व्याज प्रेमाने हळूहळु माणसाळतो आणि वाघांच्या जाळ्यातून आपल्या नविन मित्रांना वाचवायला मदत करतो. या साऱ्या गदारोळात आपल्या एकमेव ओक-नटला वाचवायचा जीवापाड प्रयत्न करणारी खार ‘सत्या’मधल्या भिकुसारखा भाव खाऊन जाते.

1. मादागास्कर 1, 2

न्युयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातून पळून जाऊन थेट मादागास्करला पोचलेले मार्टी झेब्रा, अॅलेक्स सिंह, मेलमन जिराफ आणि ग्लोरीया पाणघोडी हे या चित्रपटाचे नायक. याशिवाय अंटार्क्टिकेला चक्क जहाज हायजॅक करून निघालेले चार अफलातून पेंग्विन आणि लेमुरांचा राजा ज्युलीयन या चित्रपटाची खरी शान आहेत. पहील्या भागात मादागास्करला पोचलेले तिघे, अंटार्क्टिकेहून भ्रमनिरास होऊन परत आलेल्या पेंग्विन आणि ज्युलीयनसमवेत अफ्रिकेत क्रॅश लॅन्डींग करतात. तिथे अॅलेक्सला त्याचे आई-वडील भेटतात, मार्टी, मेलमन आणि ग्लोरीयाला त्यांचे भाऊबंद भेटतात वगैरे वगैरे…या सगळ्यांत पेंग्विन आणि ज्युलीयन यांचे दुसऱ्या भागातले संवाद म्हणजे भन्नाट!

बोनस: ‘स्पिरिटेड अवे’

जपानमध्ये एकुणच कॉमिक्स आणि अॅनिमेशनपट तंत्र आणि हाताळलेल्या विषयांचे वैविध्य यात खूपच प्रगत आहेत. आजकाल  जपानी ‘मंगा’ आणि ‘अॅनिम’आपल्याकडेही सगळ्यांना भुरळ घालत आहेत. जपानमध्ये उत्पन्नाच्याबाबतीत ‘टायटॅनिक’ला मागे टाकणारा, Best Animated Feature चे ऑस्कर मिळवणारा आणि जगभरातील आबालवृद्धांवर मोहिनी घालणारा हा चित्रपट म्हणजे नितांतसुंदर असा कलाविष्कार आहे. रेटींगच द्यायचे असेल तर याला 5 पैकी 7 रेटींग मी आनंदाने देईन.

तुमच्या-आमच्या बालपणी आपल्याला भुरळ पाडणाऱ्या सगळ्या गोष्टी यात आहेत. वाट चुकल्याने आई-वडीलांसोबत एका अद्भुत प्रदेशात पोचलेली शाळकरी शिहीरो, तिथे तिच्या आई-वडीलांना डुकराचे रूप दिल्याने त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी तिने हाकू या मुलाच्या मदतीने केलेले प्रयत्न, तिथे असलेले चित्र-विचित्र प्राणी, आत्मे, चेटकीणी, या साऱ्यांमध्ये वावरतांना दिसलेली तिची परिपक्वता या सगळ्या गोष्टी अॅनिमेटर-दिग्दर्शक मियाझाकीने अशा काही खुबीने मांडल्या आहेत की ‘मी आधी हा सिनेमा का पाहिला नाही?’ अशी भावना हा चित्रपट बघितल्यावर होते.

जपानी असल्याने हा चित्रपट कदाचित तुम्हाला कुठे मिळणार नाही…पण नाराज होऊ नका – यत्र युट्युब, तत्र नो चिंता, नो टेंशन!

या लिंकवर क्लिक करा आणि 10-10 मिनीटांच्या 12 भागात असलेल्या या वन ईन मिलीयन्स सिनेमाचा आनंद घ्या!

ता.क.: पाचांच्या लिस्टची आपली पद्धत असल्याने कुंग फू पांडा, श्रेक, इनक्रेडीबल्स, फाईंडींग नेमो सारखे सिनेमे यांत आले नाहीत. ते मला आवडत नाहीत असा याचा कुणीही अर्थ काढू नये!

No related posts.

आरोग्य सांभाळण्यासाठी अॉनलाईन टूल्स (Lists)
सध्याच्या मंदीच्या वातावरणात प्रत्येकालाच ताण-तणावाला सामोरं जावं लागत आहे. संसारातील जबाबदाऱ्या आणि नोकरी, व्यवसायातील व्यावधानं सांभाळता-सांभाळता प्रचंड ओढाताण होते. प्रचंड कष्टाने जोपासलेली नोकरी एका फटक्यात जाऊ शकते, याचे भान ठेवत नोकरी टिकवण्यासाठी अंगावर पडेल ते काम करताना शरीराची होणारी झीजही दुर्लक्षित होऊ शकते. पण एक लक्षात ठेवा, शरीराकडे कधीही दुर्लक्ष करू नका. मंदी असो वा चांदी - मन आणि शरीर धडधाकट ठेवलंच पाहिजे! अनेक वेळा शरीर आपल्याला ‘सिग्नल’ देत असतं, ‘बाबा रे, माझ्याकडे दुर्लक्ष होतंय. जरा डॉक्टरकडे चल.’ हा ‘सिग्नल’ जर तुम्हाला कळाला नाही, तर त्याचे मोठे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे शरीराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शरीर व्यवस्थित आहे की नाही, हे तरी किमान तुम्ही तपासू शकता ना? या गोष्टी बसल्या-बसल्यादेखील तपासता येऊ शकतात. त्यात काही ‘विचित्र’ गोष्ट आढळली तर मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

सिम्प्टम चेकरः स्त्री, पुरूष आणि लहान मुलांमधील विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे तपासण्यासाठी तुम्ही वेब एमडी या साईवरील सिम्प्टम चेकर या टूलचा वापर करू शकता. तुमचे लिंग आणि शरीरातील नेमका अवयव यांच्या आधारे तुम्ही विशिष्ट रोगाची लक्षणे तपासू शकता.

बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेटरः शरीरात साचत जाणारे फॅट्स अत्यंत धोकादायक असतात. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगांना आमंत्रण देणाऱ्या या फॅट्सना दूर ठेवलेलेच बरे. तुमची उंची आणि वजन यांच्यातील संबंध दर्शविणारा घटक म्हणजे ‘बॉडी मास इंडेक्स’ किंवा ‘बीएमआय’. तुमचा ‘बीएमआय’ २५ च्या वर असेल तर तुम्ही ओव्हरवेट आहात, हे लक्षात घ्या. ‘हेल्थ कॅल्सी’ या साईटवर ‘बॉडी मास इंडेक्स’सह इतर अनेक ‘हेल्थ कॅल्क्युलेटर्स’ उपलब्ध आहेत.

स्ट्रेस लेव्हल इंडिकेटरः आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे कधी आपल्यावरील ताण कमी होतो, तर कधी वाढत असतो. ताणाचे प्रमाण अधिक असेल तर त्याचे परिवर्तन विविध आजारांमध्ये होऊ शकते. त्यामुळे ताणाची पातळी तपासणे आवश्यक होते. ‘हेल्दी इंडिया’ या साईटवर तुम्ही ताणाची पातळी तपासू शकता. त्यात काही गंभीर आढळल्यास डॉक्टरांकडे अवश्य जा. या चाचणीचे अमेरिकन व्हर्जनही तुम्ही ट्राय करू शकता.

न्यूट्रिशन कॅल्क्युलेटरः आपल्या प्रकृतीनुसार आपला आहार ठरवला गेला पाहिजे. शिवाय शरीरास लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांचेही ठराविक प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. इतकं कॅल्शियम, एवढे प्रोटिन्स असं रोज मोजून खाणं अशक्य आहे; पण किमान आपल्या शरीरास नेमके किती प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर इ. लागतात याची माहिती करून घेणं तरी गरजेचं आहे. ‘हेल्थ फाईंडर’न्यूट्रिशन कॅल्क्युलेटरसह इतर अनेक बाबींची माहिती मिळू शकते.

स्मोकिंग कॅल्क्युलेटरः धूम्रपान करणे शरीरासाठी अत्यंत घातक असते, हे माहित असूनही अनेक लोक धूम्रपान करताना आढळून येतात. तुम्ही धूम्रपान करत असाल तर आतापर्यंत तुम्ही आयुष्यातील किती दिवस आणि किती पैसे वाया घालवले आहेत, याचा अंदाज देणारे ‘स्मोकिंग कॅल्क्युलेटर’ भारत सरकारच्या ‘हेल्दी इंडिया’ या साईटवर उपलब्ध आहे. उत्तम आरोग्यासाठी धूम्रपान सोडा, हाच संदेश यातून घ्या.

No related posts.

ग्लोबल वॉर्मिंग आणि भयानक विषाणू (Lists)
मेक्सिकोतून जगभर पसरत चाललेल्या ‘स्वाईन फ्लू’ने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह सर्वांचीच झोप उडवली आहे. ‘एव्हियन फ्लू’ किंवा ‘बर्ड फ्लू’ पसरवणाऱ्या H5N1 गटातील H1N1 विषाणू ‘स्वाईन फ्लू’ पसरवतात. १९१८ मध्येही जगभरात H1N1 या विषाणूंचा प्रसार झाल्याची नोंद आढळते. या विषाणूंमुळे पसरणाऱ्या रोगावर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार करता येत नाहीत, असे स्पष्टीकरण खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच दिले आहे. त्यामुळे हा रोग पसरू नये यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय योजने, एवढेच आपल्या हातात आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे या विषाणूंच्या संसर्गात आणखी वाढ होण्याचीच लक्षणे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात एवढी प्रगती होऊनही काही पुढील विषाणूंवर विजय मिळवणे मानवाला शक्य झालेले नाही.

एव्हियन फ्लू किंवा बर्ड फ्लू (H5N1)

१९९७ मध्ये सर्वप्रथम हाँगकाँग आणि चीनच्या काही भागांत आढळून आलेला हा विषाणू नंतर आशियातील अनेक देशांत वेगाने पसरला.

प्रामुख्याने कोंबड्या, कोंबड्याच्या जमातीतील इतर रानटी पक्षी, मांजरी आणि डुकरांमध्ये हे विषाणू आढळून येतात.

मनुष्यजातीसदेखील या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.

सार्स (SARS-Coronavirus)

२००३ मध्ये सर्वप्रथम व्हिएतनाममध्ये सार्सचा (सिव्हिएर अॅक्युट रेस्पायरेटरी सिंड्रोम) विषाणू आढळून आला.

त्यानंतर जगभरात वेगाने पसरलेल्या या विषाणूने सुमारे ७७४ बळी घेतले.

एबोला (Ebola Hemorrhagic Fever Virus)

प्राण्यांमधूनच पसरला जाणाऱ्या या रोगाचे विषाणू सर्वप्रथम १९७६ मध्ये काँगोत आढळले होते.

त्यावेळी या रोगाने सुमारे ८०० लोकांचे बळी घेतले होते.

या रोगात रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबते.

अनिश्चित पर्जन्यमानाच्या क्षेत्रात हा विषाणू झपाट्याने पसरू शकतो.

रिफ्ट व्हॅली फीवर (Rift Valley Fever Virus - RVFV)

१९३१ मध्ये केनियातील मेंढ्यांमध्ये सर्वप्रथम या रोगाचे विषाणू आढळले होते.

त्यानंतर १९९७-९८ मध्ये उत्तर आफ्रिकेतील अनेक देशांत या रोगाचा संसर्ग झाल्याची नोंद आहे.

मनुष्यजातीसदेखील या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.

स्वाईन फ्लू (H1N1)

१९१८ मध्ये सर्वप्रथम या रोगाचे विषाणू आढळून आल्याची नोंद आहे. त्यावेळी हा रोग जगभर पसरला होता.

प्रामुख्याने डुकरांमध्ये या विषाणूंचा संसर्ग होतो त्यामुळे याला स्वाईन फ्लू असे म्हटले जाते.

डुकरांकडून मनुष्यजातीसदेखील या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.

मेक्सिकोत नुकतेच या रोगाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती आढळून आल्या असून काही लोकांचा मृत्यूही झाल्याच्या बातम्या आहेत.

Read:

Ten facts about swine flu

Download:

Swine Flu FAQs

The Deadly Dozen

No related posts.

नोकिया फन फॅक्ट्स (Lists)
मोबाईल फोन म्हटलं की नोकिया हे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. नोकियाच्या फोनचा तिरस्कार करणारेही अनेक सापडतील; पण इतर कंपनीचे दोन-चार हँडसेट्स ट्राय करून ही मंडळी पुन्हा नोकियाकडेच येतात. मोबाईल फोनच्या बाजारातील या अनभिषिक्त सम्राटाबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. किंबहुना ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण फारसा करत नाही. नोकियाबद्दल अशा काही गोष्टी की ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील…

१. नोकिया हे फिनलंडमधील एका नदीचे नाव आहे.

२. नोकियाच्या पहिल्या मोबाईल फोनचे नाव ‘मोबिरा सिनेटर’ असे होते. हा फोन १९८२ मध्ये तयार करण्यात आला होता.

३. नोकियाची सिग्नेचर ट्यून (नोकिया ट्यून) ही स्पॅनिश संगीतकार फ्रान्सिस्को तारेगा याच्या १९०२ मधील एका म्युझिक पीसवरून   प्रेरित आहे.

४. नोकियाचा स्टँडर्ड एसएमएस टोन हा SMS या इंग्लिश कॅरेक्टर्ससाठीचा मोर्स कोड आहे.

५. आतापर्यंत विकले गेलेले नोकिया ३३१० आणि ३३३० एका रेषेत मांडले तर या रेषेची लांबी तब्बल १३ हजार ५०० किलोमीटर एवढी प्रचंड होईल…म्हणजे नोकियाच्या जन्मस्थानापासून (हेलसिंकी, फिनलंड) ते चिलीची राजधानी सँटिअॅगोपर्यंत!

वाचाः 25 Things you didn’t know about Nokia

No related posts.

अशाही मार्केटिंग कॅम्पेन्स…(Lists, Share)
सोशल नेटवर्क्स आणि वेबसाईट्सची ताकद भारतीय कंपन्यांना आता कळू लागली आहे. एकेकाळी केवळ सोपस्कार म्हणून ब्रोशररूपी वेबसाईट करणाऱ्या कंपन्या आता तरुणांना आकर्षित करून गुंतवून ठेवणाऱ्या वेबसाईटकडे वळू लागल्या आहेत. व्हायरल मार्केटिंग, सोशल मीडिया कॅम्पेनिंग असे शब्द आता वारंवार ऐकायला मिळताहेत. सनसिल्क गँग अॉफ गर्ल्सपासून भारतात एक नवा मार्केटिंग ट्रेंड सुरू झाला. सध्या लोकप्रिय असलेल्या अशाच पाच वेबसाईट्स आणि कॅम्पेन्स…

१. कॅडबरी पर्क्सः

टेक इट लाईटली डॉट कॉम नावाने कॅडबरीने पर्क्सची कॅम्पेन सुरू केली आहे. एखाद्या फ्लॅश साईटवर लॉग-इन होताना लोडिंग असे पाहण्याची आपल्याला सवय झालेली असते. पण इथे पर्सेंटेज काऊंट उलटीकडून सुरू होते आणि लोडिंगऐवजी अनलोडिंग असे येते. अनलोडिंगपुढे आजच्या तरुणांना जे-जे प्रश्न आणि टेन्शन्स आहेत त्यांची नावे येत जातात व शेवटी…आता कसं हलकं वाटतंय ना, असा मेसेज देत हातात कॅडबरी पर्क घेतलेली जेनेलिय डिसूझा येते. तुम्हाला कोणतेही सल्ले, टिप्स देण्यासाठी ही साईट केलेलीच नाही असा मेसेजही यासोबत येतो.

(ही कल्पना यापूर्वी किटकॅटने वापरली असून त्यांनी द फर्स्ट वर्ल्ड वाईड वेबसाईट व्हेअर नथिंग हॅपन्स डॉट कॉम नावाने मार्केटिंग केले आहे.)

२. टाटा स्कायः

तरुण आणि डेटिंग हे समीकरण कायम जोडले जाते. अॅडल्ट फ्रेंड फाईंडर सारख्या डेटिंग साईट्स त्यामुळेच प्रचंड लोकप्रिय आहेत. Word’s Sexiest Women, Top 10 tips to please your girlfriend, Hot Models अशा लिंक्स दिसल्या की त्यावर धडाधड क्लिक गेल्याच म्हणून समजा…(तुम्हीही फसलात!). या प्रवृत्तीचा फायदा घेत टाटा स्कायने अॅडल्ट दोस्त डॉट कॉम या साईटवरून आपल्या एका फीचरची जाहिरात केली. या फीचरबद्दल मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊनच पाहा…

३. मॅगी नूडल्सः

टू मिनट नूडल्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या मॅगी नूडल्सला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी सुरू केलेल्या मार्केटिंगने त्यांनी जनतेची नाडी बरोबर पकडली आहे. मॅगी नूडल्स ही अशी गोष्ट आहे की जी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि मॅगीबरोबर प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. मलाही आठवते - आम्ही कॉलेजमध्ये असताना एकत्र अभ्यास करायचो आणि रात्री अडीच-तीनच्या सुमारास प्रचंड भूक लागायची. त्यावेळी केलेली मॅगी आम्ही कधीही विसरू शकत नाही. ‘असे क्षण पुन्हा येणार नाही,’ असं म्हणत आम्ही ती मॅगी खात असू. असेच अनुभव शेअर करण्यासाठी मॅगीने सुरू केलेली मी अॅण्ड मेरी डॉट इन ही वेबसाईट अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.

४. डेल कॉम्प्युटर्सः

टेक युवर अोन पाथ डॉट कॉम या नावाने सुरू केलेल्या वेबसाईटवर डेल कॉम्प्युटर्सने भारतातील आंत्रप्रिन्युअर्सच्या सक्सेस स्टोरीज मांडल्या आहेत. टीव्ही, प्रिंट आणि अॉनलाईन या तिन्ही माध्यमांचा वापर करून डेलने आपल्या उत्पादनांचे जोरदार मार्केटिंग सुरू केले आहे. टेक युवर ओन पाथ या साईटवर तुम्हाला ‘एनआयआयटी’चे सहसंस्थापक पी. राजेंद्रन, भारतातील बीपीओचे जनक रमन रॉय आदींची माहिती दिली आहे. शिवाय आंत्रप्रिन्युअर्ससाठी टिप्सही या साईटमध्ये दिल्या आहेत.

५. अॅक्स डिओडरन्टः

अॅक्स चॉकलेट या ब्रँडसाठी अॅक्सने भारतातील आतापर्यंतची सर्वांत रिस्की अॉनलाईन कॅम्पेन नोव्हेंबर २००८ मध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली. ११ नोव्हेंबर रोजी अॅक्सने रेडिफ, एमएसएन इंडिया, याहू इंडिया आणि झपाक या चारही साईटच्या होमपेजवर केवळ अॅक्स चॉकलेटच्या जाहिराती आणि त्याच्याशी संबंधित मजकूर ठेवला होता. यातील मजकुरावर क्लिक करणाऱ्यास  अॅक्स डार्क टेम्प्टेशन डॉट कॉम या साईटवर रिडायरेक्ट केले जात असे. या साईटवर संबंधित उत्पादनाबद्दल अधिक माहिती, वॉलपेपर्स आणि गेम्सही ठेवले होते.

तुम्हाला आवडलेल्या किंवा माहित असलेल्या अशाच इतर साईट्सच्या लिंक्स जरूर शेअर करा…

No related posts.