“सर, ती जागा घेऊ नका. बाधित आहे ती.” “छे छे… मी नाही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत. आणि असल्या भाकड गोष्टींवर विश्वास ठेवून इतक्या कमी रेटमध्ये हाती पडणारी मोक्याची जागा काही मी घालवणार नाही.’ “रागावू नका. पण आमचं सांगायचं काम होतं, ते आम्ही केलं. नंतर म्हणू नका, की यांनी असली जागा आमच्या गळ्यात मारली.’ “काही म्हणणार नाही मी. तुम्ही [...]
Continue reading...18. November 2009
नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा झाला. त्यानिमित्तानं ही शब्दांजली… खरंतर त्या शब्दप्रभूला या अोळी वाहणं म्हणजे सोन्याच्या राशीवर मातिची चिमूट उधळणं. पण मातीची का असेना, त्यामागे भावना स्वच्छ आहेत, ही त्यातल्या त्यात अभिमानाची गोष्ट… श्री ज्ञानदेवार्पणमस्तु… जाहला अंधार, लोपला दिनकर रात्र ही भयाण दाटूनी आली मन हे व्याकूळ सापडेना सूर करावे काय आकळेना भेटलास दू, दिले आत्मभान पाहूनी प्रकाश शांतावलो समाधी बैसोनि [...]
Continue reading...22. July 2009
कॉलेजच्या शेवटच्या सेमेस्टरमधली ती प्रचंड धावपळ अजूनही अाठवतेय. प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करण्यापूर्वीची ती घाई-गडबड, रिपोर्टमधले दोन सेक्शन्स माझ्याकडे आणि इतर सेक्शन्स पार्टनरकडे असल्याने प्रिंट्स काढताना प्रचंड गोंधळ उडाला होता. अख्खा प्रोजेक्ट रिपोर्ट एका फ्लॉपीवर बसत नव्हता म्हणून त्याचे दोन भाग करण्याचा हा उद्योग करावा लागला होता. प्रिंटरकडे गेल्यानंतर एकाच फ्लॉपीतील फाईल ओपन होत होती. दुसरी [...]
Continue reading...7. July 2009
जगातली सात आश्चर्ये म्हणा किंवा रिओ दि जानेरो सारखे नयनरम्य शहर म्हणा - या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जाऊन यावे असं तुम्हा-आम्हा सर्वांनाच वाटत असतं. पण ते शक्य होतंच असं नाही. अनेक ठिकाणी आपण जाऊन येतो; पण तरीही आणखी एखादा दिवस असता तर हे ही पाहून झालं असतं, अशी हुरहूर लागून राहते. बऱ्याच वेळा एखाद्या [...]
Continue reading...30. May 2009
एखादी नवी वस्तू घेताना आपण चारचौघांकडे त्या वस्तूची विचारणा करतो. कोणत्या कंपनीची वस्तू चांगली आहे, वॉरंटी/गॅरंटी किती आहे, वस्तू कशी आहे आदी गोष्टींची चौकशी करतो. आजकाल अनेक जण इंटरनेटवर थोडासा रिसर्च करून ठरवतात आणि मगच ती वस्तू घ्यायला जातात. यावरून ग्राहक जरा जागरूक होण्यास सुरवात झालीये, असे म्हणावयास हरकत नाही. केवळ जाहिरात बघून एखादी वस्तू [...]
Continue reading...20. May 2009
सध्या मी एका विशिष्ट मानसिक अवस्थेतून जात आहे. म्हणजे कसे की अशावेळी नेहमी चमचमीत आवडणारा मी तुमीभा म्हणजे तुप-मीठ-भात खातो; तब्येत आणि मन अशावेळी थोडं हळुवार असतं म्हणून मग धाडधाड रॉक सोडून ईगल्सचं ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ किंवा रहमानचं ‘तू ही रे’ ऐकतो. तर कधी-कधी मूड असा असतो की रात्री उशीरा एखादा मस्त हॉलीवुड किंवा स्टायलीश कोरियन [...]
Continue reading...7. May 2009
सध्याच्या मंदीच्या वातावरणात प्रत्येकालाच ताण-तणावाला सामोरं जावं लागत आहे. संसारातील जबाबदाऱ्या आणि नोकरी, व्यवसायातील व्यावधानं सांभाळता-सांभाळता प्रचंड ओढाताण होते. प्रचंड कष्टाने जोपासलेली नोकरी एका फटक्यात जाऊ शकते, याचे भान ठेवत नोकरी टिकवण्यासाठी अंगावर पडेल ते काम करताना शरीराची होणारी झीजही दुर्लक्षित होऊ शकते. पण एक लक्षात ठेवा, शरीराकडे कधीही दुर्लक्ष करू नका. मंदी असो वा [...]
Continue reading...28. April 2009
मेक्सिकोतून जगभर पसरत चाललेल्या ‘स्वाईन फ्लू’ने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह सर्वांचीच झोप उडवली आहे. ‘एव्हियन फ्लू’ किंवा ‘बर्ड फ्लू’ पसरवणाऱ्या H5N1 गटातील H1N1 विषाणू ‘स्वाईन फ्लू’ पसरवतात. १९१८ मध्येही जगभरात H1N1 या विषाणूंचा प्रसार झाल्याची नोंद आढळते. या विषाणूंमुळे पसरणाऱ्या रोगावर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार करता येत नाहीत, असे स्पष्टीकरण खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच दिले आहे. त्यामुळे हा [...]
Continue reading...24. April 2009
मोबाईल फोन म्हटलं की नोकिया हे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. नोकियाच्या फोनचा तिरस्कार करणारेही अनेक सापडतील; पण इतर कंपनीचे दोन-चार हँडसेट्स ट्राय करून ही मंडळी पुन्हा नोकियाकडेच येतात. मोबाईल फोनच्या बाजारातील या अनभिषिक्त सम्राटाबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. किंबहुना ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण फारसा करत नाही. नोकियाबद्दल अशा काही गोष्टी की ज्या [...]
Continue reading...22. April 2009
सोशल नेटवर्क्स आणि वेबसाईट्सची ताकद भारतीय कंपन्यांना आता कळू लागली आहे. एकेकाळी केवळ सोपस्कार म्हणून ब्रोशररूपी वेबसाईट करणाऱ्या कंपन्या आता तरुणांना आकर्षित करून गुंतवून ठेवणाऱ्या वेबसाईटकडे वळू लागल्या आहेत. व्हायरल मार्केटिंग, सोशल मीडिया कॅम्पेनिंग असे शब्द आता वारंवार ऐकायला मिळताहेत. सनसिल्क गँग अॉफ गर्ल्सपासून भारतात एक नवा मार्केटिंग ट्रेंड सुरू झाला. सध्या लोकप्रिय असलेल्या अशाच [...]
Continue reading...21. April 2009
रविवार. दात घासणे – रंगोली. आंघोळ. नाश्ता – रामायण / महाभारत (आई-बाबा-आजी-पाहुणे वगैरे सगळ्यांसोबत – कंपलसरी). मोठ्यांची पांगापांग. स्पेस सिटी सिग्मा – मित्रांसोबतच. खेळ, टाईमपास. जेवण – मूक-बधिरांच्या बातम्या संपायची वाट. लोळणे – छायागीत. लोळणे (Continued…) – भारतीय भाषांमधील चित्रपट (एकदा तर ‘राशोमोन’ मला येथेच गावला होता. इथे सापडलेले दुसरे रत्न म्हणजे कमल हसनचा ‘महानदी’) झोप. रसना घेतांना – संतवाणी. खेळ किंवा अशोक सराफ-लक्ष्या. आसेतुहिमाचल-भारतातल्या तमाम बालगोपाळांचा रविवारचा [...]
Continue reading...18. April 2009
काही उत्पादने इतकी यशस्वी होतात की त्यांच्या श्रेणीची ते व्याख्या पार बदलून तरी टाकतात किंवा उत्पादनांची अक्षरशः एक नवीन श्रेणी / प्रकार तयार करतात. यासंदर्भात मला चटकन आठवणारा प्रॉडक्ट म्हणजे – निरमा! निरमा हे नाव घराघरात इतके पोहोचले की किराणा दुकानात ‘व्हीलचा निरमा द्या’ असे कानावर येऊ लागले…! आज ‘5 प्रभावशाली’ या सिरीजमध्ये सॉफ्टवेअर्स/वेब सर्विसेस आणि [...]
Continue reading...
21. November 2009
1 Comment