Fantastic Five » Fantastic Tips

वेदना
प्रत्येकाच्या उरात असतो

एक बाण रुतलेला,

प्रत्येकाच्या मनात असते

ठसठसणारी वेदना…

वेदनेचा पार नाही,

बाणाची धार नाही,

दुखावलेला असतो पण

एक हळवा कोपरा…

कुणी शोधू जाते वेदनांचा उपाय

कुणी गाठू पाहते त्या वेदनांचा गाव

कुणी जाऊ पाहते दूर दूर पण

अडकून राहती मनीच्या तळवटात…

असेच असते साऱ्यांचे

परी वाटते एकट्याचे

घावाचे वारकरी ते

बुडूनी जाती डोहात…

डोहात बुडाल्या साऱ्यांना

पाव्याचे लागे पिसे

सुरलयीवर झुलता झुलता

कृष्णसखा तो निर्मळ हसे…

सांगे मग कृष्ण तो,

माया डोहाची अपार

बुडालो की थांबलो

न लागे कोणास थांग…

वेदना हा शाप नाही

वेदना वरदान नाही

जगणेच असते वेदना

दुसरे तिसरे काही नाही…

No related posts.

बाधित
“सर, ती जागा घेऊ नका. बाधित आहे ती.”

“छे छे… मी नाही असल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवत. आणि असल्या भाकड गोष्टींवर विश्‍वास ठेवून इतक्‍या कमी रेटमध्ये हाती पडणारी मोक्‍याची जागा काही मी घालवणार नाही.’

“रागावू नका. पण आमचं सांगायचं काम होतं, ते आम्ही केलं. नंतर म्हणू नका, की यांनी असली जागा आमच्या गळ्यात मारली.’

“काही म्हणणार नाही मी. तुम्ही व्यवहार पूर्ण करून टाका. कधी एकदा त्या फ्लॅटमध्ये राहायला जातोय, असं झालंय मला.’

“ठीक आहे. जशी तुमची इच्छा.’

प्रसाद आणि एजंटमध्ये चर्चा सुरू होती. प्रसादला तो पॉश एरियातला पॉश फ्लॅट मनापासून आवडला होता. चौथ्या मजल्यावरचा ड्युप्लेक्‍स फ्लॅट. टेरेस. अगदी मस्त, हवेशीर आणि पॉश! त्याच्या टेरेसमधून मस्त रात्र, गार हवा आणि चंद्र अनुभवता येणार होता. मित्रांचा अड्डा जमवता येणार होता. मुख्य म्हणजे फ्लॅट उगवतीच्या दिशेला नव्हता. त्यामुळे घरात थेट सूर्यकिरणंही येत नव्हती आणि उजेडामुळे झोपमोड होणार नव्हती. थोडक्‍यात, तो फ्लॅट त्याला हवा तसा होता आणि किंमतही कमी होती. त्यामुळे मालकाचं मन बदलण्याआधी व्यवहार पूर्ण करण्याची त्याला घाई झाली होती आणि एजंट ही नसती खुसपटं काढत होता. काय तर म्हणे बाधीत जागा. खरंतर जागा वगैरे काही बाधित नव्हती, तो मालकच सरकलेला आहे, असं प्रसादला वाटत होतं. काय त्याचे डोळे, काय त्याचे केस… सगळं जरा विचित्रच होतं. त्या मालकाला मानसोपचारांची गरज होती; पण जाऊ दे. घराचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांना हे शहाणपण सुचू दे. आधीच सुचलं, तर फ्लॅट हातचा जायचा, त्याच्या मनात स्वार्थी विचार डोकावला.

प्रसाद बॅचलर होता आणि साताऱ्याला असणारे आई-बाबा लग्नासाठी त्याच्या मागे लागले होते. आज ना उद्या ते करायचंच होतं. त्यामुळेच त्यानं फ्लॅट शोध मोहीम हाती घेतली होती आणि अचानकच हा उत्तम फ्लॅट त्याच्या हाती लागला होता. तो, आई आणि बाबा असं छोटंसं कुटुंब. घरची परिस्थिती ठीकठाक; पण उपजतच हुशार असलेला प्रसाद शहराकडे वळला आणि एक एक पायरी मोठ्या कष्टानं पार करत पुढे चालला होता. असो, तर प्रसादनं तेच घर घेण्याचं निश्‍चित केलं. विशेष म्हणजे त्या घराच्या मालकानंही प्रसादशी बोलण्याचा प्रयत्न केला होता; पण प्रसादनं त्यांनाही उडवून लावलं.

त्यानं सारा व्यवहार पूर्ण केला आणि तो त्या फ्लॅटमध्ये राहायलाही गेला. अगदी आनंदात होता तो. घरी आई-बाबांनाही कळवलं. तेही लवकरच त्याचं नवं घर पाहायला, काही दिवस राहायला येणार होते. नव्या घराची मित्रांना पार्टीही देऊन झाली. एक आठवडा झाला. सगळं काही मस्त चाललं होतं. प्रसाद त्या जुन्या घर मालकाला आणि एजंटला मनातल्या मनात हसत होता. पुढच्या वेळी तो एजंट भेटल्यास, त्या मालकाला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्याचा सल्लाही तो देणार होता. अर्थात त्या घरात राहायला आल्यापासून प्रसादला स्वतःमध्ये काही बदल घडत असल्याचं जाणवत होतं; पण ते खूप पॉझिटिव्ह होते. पॉश वस्तीतल्या पॉश घरात राहायला लागल्यानंतर घडतील तेवढे! तो आता स्वतःची नीट काळजी घेऊ लागला होता. कपड्यांबाबत चुझी झाला होता. वागण्यात थोडा आखडूपणा आणि थोडा डौल आला होता. शनिवार रविवारी एकदम फॅशनेबल कपडे घालू लागला होता. पण हे बदल आज ना उद्या होणारच होते. तरुण लग्नाळू होता तो! ते बाधित वगैरे म्हणतात, त्यातलं त्याला काही जाणवलंही नव्हतं.

होता होता महिना सरला. आणि तो एजंट अचानकच अवतरला. रविवारचा दिवस होता तो. रात्रभर धिंगाणा घालून प्रसाद दिवसभर डाराडूर झोपला होता. त्याला उशीरानं जाग आली. अंधार पडला होता. तसा तो अजूनही आळसावलेलाच होता; पण उठून आवरावं, जरा भटकून यावं, थोडी पोटपूजाही करावी, असा विचार करून तो पलंगावरून उठला. बेसिनसमोर दात घासत उभा राहिला आणि बेल वाजली. त्यानं दार उघडलं, तर समोर एजंट उभा होता. एजंट प्रसादला पाहून आणि प्रसाद त्या एजंटला पाहून दचकलाच.

“”तुम्ही? आत्ता? काय विशेष?” प्रसादनं विचारलं.

“”काही नाही. म्हटलं, तुमचं कसं चाललंय ते पाहावं…”

“”त्यात काय पाहायचं ? मस्त चाललंय माझं. या आत या.”

“”पण तुम्ही हे काय करताय आत्ता ?”

“”काय म्हणजे ? दिसत नाही, दात घासतोय… थांबा जरा. आलोच तोंड धुवून…”

प्रसाद आत गेला आणि एजंट अचंब्यानं घर पाहू लागला.

“”बोला, काय म्हणताय ? कसं चाललंय तुमचं काम ?”

“”आमचं चालूच आहे ? काल तुम्ही दिसला नाही पालखीला…”

“”पालखी ? हां… जाऊ द्या हो. नाही जमलं मला…. शनिवार होता काल…”

“”आहो पण पालखी चुकवलीत?”

“”जाऊ द्या हो… किती वेळ तुम्ही तेच ते विचारणार आहात. काल शनिवार होता आणि आमची मस्त पार्टी होती. ती एंजॉय करायची, की तुमच्या त्या पालखीबिलखीला यायचं? असल्या भाकड गोष्टींवर विश्‍वास नाही ठेवत मी…’”

“”प्रसादराव… काय बोलताय काय तुम्ही… आहो…”

“”तुम्ही कशाला घाबरता. मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. जरा डोळे उघडून पाहा आजूबाजूला, जग कुठे चाललंय आणि आपण कुठे आहोत…”

“”म्हणजे तुम्ही कोणतीच गोष्ट मानत नाही…”

“”जे मला पटतं, तेच मी मानतो. शनिवारची रात्र धिंगाणा घालायची असते, तो मी घालतो. उगाचच या पालखी वगैरे भाकड गोष्टींमध्ये वेळ कशाला घालवायचा ?”

“”काय बोलताय काय तुम्ही ? आहो आपण कोण आहोत, याचा तरी विचार करा…”

“”काही गरज नाही विचार करण्याची. त्या सुद्धा भाकड कथाच आहेत शेवटी…”

“”काय ? तुम्ही आपलं अस्तित्वही नाकारता आहात…”

“”नाहीतर काय ? उगाचच अस्तित्वात नसलेल्या गोष्टी का स्वीकारयच्या ?”

“”तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही काय बोलताय ते ?”

“”न यायला काय झालंय… तुमचं बोलणं झालं असेल, तर सांगा. मला अजून आवरायचं आहे. मस्त शॉवर घ्यायचा आहे… आज क्‍लबवर जायचं ठरलंय आम्हा मित्रांचं.”

“”आंघोळ ? मी आलो तेव्हा तुम्ही दात घासत होता…”

“”आता यात काही चुकीचं आहे का ? दात घासणं आणि आंघोळ करणं यात वावगं काय आहे ? उगाच चारचौघात बोलाल, तर लोक वेड्यात काढतील तुम्हाला…”

“”वावगं नाही ? आपला संबंध काय या गोष्टींशी ?”

“”तुमचा नसेल संबंध स्वच्छतेशी; पण माझा आहे आणि प्रियाला भेटायला जाताना मला नाही आवडत असं पारोसं जायला…”

“”प्रिया ? कोण ही प्रिया ?”

“”तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी ? तो माझा खासगी प्रश्‍न आहे. तुम्ही टळा पाहू आता… मला उशीर होतोय…”

प्रसादनं एजंटला बाहेर काढलं; पण एजंट मात्र त्याच्या मागावरच राहिला. दोन रात्रीत त्यानं साऱ्या गोष्टी टिपल्या आणि त्याची खात्रीच झाली, की प्रसादला त्या घरानं झपाटलं आहे…

आता मात्र तो थांबला नाही. त्यानंच निर्णय घेतले आणि प्रसादच्या आई-बाबांना बोलावून घेतलं. सोबत चार-पाच जणांनाही घेऊन यायला सांगितलं.

“”काय हो, झालं काय असं ?” प्रसादच्या बाबांनी विचारलं

“”तुम्हीच पाहा आणि खात्री करा…”

त्यानुसार प्रसादचे आई-बाबाही लगेच आले. ते प्रसादच्या घरी राहिले आणि दुसऱ्याच दिवशी घाबरेघुबरे होऊन एजंटकडे धावले…

“”आहो, हा असा काय वागतोय ? आमच्यासमोर दात घासत होता. आंघोळीला जातो म्हणाला. रात्री कुठला क्‍लब की काय तिकडे गेला. आणि आज त्याच्या प्रिया नावाच्या मैत्रिणीला घेऊन येणार आहे… आहो, ती मनुष्य आहे हो… भुतानं कधी मनुष्याशी लग्न केलं आहे का ? सगळंच विपरीत. आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहायची समाजात. तरी मी सांगत होते, त्याला शहरात नका पाठवू. बिघडला ना आता तो… आपण भूत आहोत, हेही विसरून गेलाय. नाहीतर दात घासणं, आंघोळी करणं, कसले कसले स्प्रे फवारणं याचा काही उपयोग असतो का आपल्याला. ज्यांना शरीर आहे, त्यांना ठीक आहे ते… आपल्याला काय ? पाणीही भिंतीवर पडणार आणि स्प्रेचा फवाराही भिंतीवरच उडणार… आणि त्या मुलीला कसा भेटतो, ते वेताळच जाणे.”

“”वेताळ काय जाणे… परवा तो पालखीलाही आला नव्हता वेताळाच्या…” एजंट म्हणाला.

“”काय सांगता… आता काय करायचं हो. तुम्हीच सांगा काहीतरी. मार्ग काढायलाच हवा आता…”

“”माझ्या ओळखीचा एक मांत्रिक आहे इथं. वेताळबाबांचा साक्षात्कार झालाय त्याला. त्यांच्या मंदिराचाच पुजारी आहे तो. तेच काहीतरी मार्ग काढतील. तुम्ही फक्त तुमच्या चिरंजीवांना तिथपर्यंत न्यायची व्यवस्था करा…”

“”ते करतो आम्ही; पण हे असं कसं झालं हो… त्याला इतक्‍या चांगल्या हडळी सांगून येत होत्या… आता ही बातमी पसरली तर… पुढचं अवघडच होईल हो. आम्हाला एक मुलगीही आहे. तिचं कसं जुळावं… मनुष्याच्या नादी लागलेल्या भावाच्या बहिणीला कोण पत्करेल…”

“”तुम्ही नका काळजी करू. ही गोष्ट आपल्या बाहेर जाणार नाही. तुम्ही फक्त आज रात्री वेताळबाबांच्या मंदिरात या.”

प्रसादच्या आई-बाबांनी मग त्याची समजूत काढून, लग्नाचा मुहूर्त शोधण्याच्या आमिषानं आणि लग्न आपल्याच पद्धतीनं लागेल या अटीवर त्याला तयार केलं, त्याची समजूत काढली आणि वेताळबाबांच्या मंदिराचा रस्ता धरला.

“”पुजारीबुवा, तुम्हाला यांनी साऱ्या गोष्टी सांगितल्याच असतील. आता तुम्हीच मार्ग काढा…”

“”हं… एकंदर अवघड दिसतंय सगळं. हा ज्या घरात राहात होता, ते घर आहे एका कट्टर नास्तिकाचं. त्यांचा त्यांच्या देवावर विश्‍वास नसतो, तर आपल्यावर कसा असेल ? त्यांनीच झपाटलंय याला. आता त्याचा स्वतःवरच विश्‍वास नाही. त्याला माणूस व्हायचंय आता…”

अखेरीस सुमारे चार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर प्रसाद पुन्हा एकदा माणसात, आपलं भुतांत आला… त्याचं एका हडळीशी लग्नही झालं आणि एक भूत मार्गी लागलं…

“”सच्या… कसल्या गोष्टी सांगतोस रे…”

सचिन, राहूल, अम्या, मंद्या आणि दीपक मस्त अड्डा जमवून बसले होती. भुतांच्या गोष्टीचा विषय निघाल्यावर सच्यानं त्यांना ही मजेशीर गोष्ट सांगवून गप्पांतली रंगत वाढवली…

“”नाहीतर काय… दरवेळी तुमचं तेच काहीतरी भितीदायक, म्हटलं जरा बदल करावा.”

“”बरोबर आहे. मजा आली…” साऱ्यांनी एका सुरात अनुमोदन दिलं…

“”मग… चला यावर होऊन जाऊ दे एक एक…”

“”अम्या… चल रे उठ…”

“”अम्या, अरे अम्या… अम्या कुठे गेला रे ?”

“”इथं तर होता. असेल बघ. नाहीतर टॉयलेटला गेला असेल.”

“”अबे, बराच वेळ झाला. पडला बिडला नाही ना… मंद्या त्याला पाहून ये जरा…”

“”अरे इथं नाहीये…”

“”गेलाय कुठं?”

“”मित्रांनो… मी आहे. इथंच आहे. सच्या, थॅंक्‍यू. तुझ्या त्या कथेमुळे माझे डोळे उघडले. जे आपलं नाही, त्याला मोह धरू नये आणि आपलं जपून ठेवावं हे समजलं… इतके दिवस मी तुमच्यात राहिलो. तुम्हीही मला आपलं मानलंत. धन्यवाद ! सच्या तुझ्या गोष्टीतल्या प्रसादसारखीच माझी गत झाली होती. माणूस नसताना मी स्वतःला माणूस समजून बसलो होतो. स्वतःची भूतयोनीच विसरून गेलो होतो. घाबरू नका. मी मित्रच आहे तुमचा. यापुढे कधी गरज भासली, तर हाक मारा मी आहेच…”

कथेला भलतंच वळण मिळालं होतं. त्या कथेमुळे एकाला दिशा सापडली होती आणि इतरांची दशा बिघडली होती…

No related posts.

बाप ज्ञानेश्वर
नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा झाला. त्यानिमित्तानं ही शब्दांजली…

खरंतर त्या शब्दप्रभूला या अोळी वाहणं म्हणजे सोन्याच्या राशीवर मातिची चिमूट उधळणं. पण मातीची का असेना, त्यामागे भावना स्वच्छ आहेत, ही त्यातल्या त्यात अभिमानाची गोष्ट…

श्री ज्ञानदेवार्पणमस्तु…

जाहला अंधार, लोपला दिनकर

रात्र ही भयाण दाटूनी आली

मन हे व्याकूळ सापडेना सूर

करावे काय आकळेना

भेटलास दू, दिले आत्मभान

पाहूनी प्रकाश शांतावलो

समाधी बैसोनि श्रांतविसी देवा

मनासी देसी आत्मप्रबोध

मनाचे भेद केलेस दूर

द्वैतातुनी अद्वैती नेलेस बा

कसा होऊ तुझा बापा उतराई

माऊली झालास ज्ञानदेवा

उधळीशी प्रेम, देसी साक्षात्कार

मज पामराला दावी प्रकाश

किती गाऊ आता, वर्णू किती गुण

मती तोकडी ती पडते आहे…

No related posts.

या पैशाचे काय करावे - ४ खूणगाठी
एक कानाला गोड पण वळायला अवघड वाक्य आहे - ‘Every penny saved is twice a penny earned’…खरे आहे की नाही? एक हजार रुपये कमवायला तुम्हाला त्यात किती एफर्टस् घालावे लागतात? तितकेच गमवायला मात्र काही लागणार नाही – ‘लाईफस्टाईल’ मॉलमध्ये एक चक्कर मारा किंवा ‘अॅडलॅब्ज’ला एक भेट द्या…तुम्हाला काहीही प्रयत्न करावे लागणार नाहीत आणि वर चांगली करमणूकसुद्धा होईल.

‘बचत करायला हवी,’ हा सर्वमान्य फंडा आहे. तुमचे-माझे वडील तेच सांगत होते पण आपल्याला हे कधीही जमले नाही. आजच्या रिसेशनच्या काळात मात्र या वाक्याला अगदी जीवन-मरणाचा अर्थ प्राप्त झाला आहे. या पोस्टमध्ये मी आज तुम्हाला पर्सनल फायनान्सची सर्वात मुलभूत तत्त्वे सांगणार आहे. मी काही वॉरेन बफे नाही पण जे मला इकडून-तिकडून कळाले ते माझ्या प्रिय मित्रांना सांगण्याचा हा प्रयत्न.

१. आर्थिक नोंदवही ठेवा

तुम्हाला वेळ कमी असेल तर पुढचे नियम वाचायची गरजच नाही. मला समजलेल्या सगळ्या नियमांमध्ये हा नियम म्हणजे अगदी गायत्री मंत्र! हा एक नियम पाळला तरी पुरे.

तुम्ही प्रत्येक दिवशी केलेला, प्रत्येत खर्च हा कागदावर उतरलाच पाहिजे. त्याची नोंद ही झालीच पाहीजे. हे करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्या खर्चाचा पॅटर्न आपल्याला लक्षात येतो. आपला जास्त खर्च कुठल्या गोष्टींवर होतो? तो किती होतो? अनावश्यक खर्च कुठे झाला? यासारख्या गोष्टी महिन्याच्या शेवटी तुम्हाला सहजपणे कळतील.

कागदी नोंदवही ठेवणे अवघड वाटत असेल तर मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर तुम्ही खर्चाच्या नोंदी करू शकता. मोबाईल तर नेहमी आपल्यासोबत असतो. त्यावर तुम्हाला नोंदी ठेवणे अगदी सोपे जाईल. ‘मनीमॅनेजर’ नावाचे एक छान अॅप्लीकेशन तुम्हाला या नोंदी ठेवण्यास वापरता येईल. यात खर्चाचे प्रकार, त्याखाली दिवसवार नोंदी करायची सोय, खर्चाचे स्टॅटिस्टिक्स, हे सगळे ईमेलवर पाठवण्याची सोय वगैरे गोष्टी आहेत.

हे अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

याशिवाय कॉम्प्युटरवर खर्चाच्या नोंदी करण्यासाठी तुम्ही ही एक्सेल शीटही डाऊनलोड करून वापरू शकता.

२. कॉन्टेन्जन्सी फंड

बऱ्याच घटना या अगदी अभावित असतात. त्या कुणाला सांगून घडत नाहीत. कुठल्यातरी कारणासाठी अचानक पैशाची आवश्यकता भासणे, मोठे आजारपण, अपघात, नोकरी जाणे वगैरे. अशा गोष्टींना तोंड देण्यासाठी आपली आर्थिक तयारी असलीच पाहीजे. अशा वेळी ही रक्कम कॅशमध्ये असली पाहिजे आणि ती २४ तास ATM द्वारे उपलब्ध असली पाहिजे.

कॉन्टेन्जंन्सी फंड असतो तो यासाठी.

हा फंड किती असावा हे ज्याने-त्याने ठरवले पाहिजे. पण एक साधा नियम असा की तुमच्या खर्चाच्या किंवा उत्पन्नाच्या तीनपट रक्कम कॅशमध्ये, ATM मध्ये हवी. ही तुमची ‘मिनीमम बॅलन्स अमाऊंट’. तिला इमर्जन्सी नसताना हात लावायचा नाही.

उदाहरणार्थ: तुमचे निश्चित उत्पन्न (पगार+इतर) महिना रु. ३०,००० आहे आणि तुमचा महिन्याचा खर्च सरासरी रु. २०,००० आहे (हप्ते आणि इतर खर्च धरून), तर तुमचा कॉन्टेन्जंन्सी फंड हा किमान रु. ६०,००० किंवा आयडियली रु. ९०,००० असलाच पाहिजे.

या कॉन्टेन्जंन्सी फंडसाठी ATM ची सुविधा असलेले एक वेगळेच बँक अकाऊंट असलेले बेष्ट.

३. इन्श्युरन्स

‘वेळ सांगून येत नसते,’ हे वाक्य मोजून कंटाळा येईल इतक्या वेळेस तुम्ही ऐकले असेल. पण खरंच, वेळ सांगून येत नसते. अशा वेळांसाठी इन्श्युरन्स मस्ट! तुम्ही तो काढलाच असणार, असे मी गृहीत धरतो. महत्त्व असलेल्या, पैशांचा स्रोत असलेल्या प्रत्येक माणसाचा-वस्तूचा विमा उतरवलाच पाहिजे. यात मग जीवन, अपघात, आरोग्य, वाहन वगैरे सगळ्या प्रकारचे विमे आले.

तुम्ही कमावणारे असाल आणि तरीसुद्धा वरील विमे न उतरवलेल्या करंट्यांपैकी एक असाल तर ‘जानी, बेष्ट डे वॉज यष्टर्डे! अभ्भी के अभ्भी जाव और विमे लेके आव’.

4. गुंतवणूक

पैसा हा नुसता लोणचे घालून ठेवल्यासारखा ठेवला की त्याची किंमत कमी-कमी होत जाते. आजचे लाख रुपये आणि १० वर्षांनंतरचे लाख रुपये यांच्या त्या-त्या वेळी असणाऱ्या किंमतीत फरक आहे. भविष्यकाळाची तरतूद ही गुंतवणुकीद्वारेच होऊ शकते.

गुंतवणूक करण्यासाठी जमीन, घर, सोने, शेअर्स, फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड यासारखे अनेक पर्याय प्रत्येकाच्या गरज, सोय, कालावधी आणि रिस्क घ्यायची आर्थिक क्षमता यानुसार बदलतील. डोळसपणे स्वतः नीट विचार करून हे निर्णय घ्यावेत. त्याशिवाय कॉन्टेन्जन्सी फंड, विमा आणि आपला महिन्याचा खर्च याची तरतूद आधी करून मग उरलेल्या रकमेचा गुंतवणूकीसाठी विचार करावा.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूक आणि विमा यात गल्लत करू नका. या दोन पूर्ण वेगळ्या आणि तितक्याच आवश्यक गोष्टी आहेत.

याशिवाय तुम्ही कुठले आर्थिक नियम पाळता का? कळवा कॉंमेंटस् मध्ये.

No related posts.

अक्षर सुधारण्यासाठी…(Tips)
नमस्कार मित्रांनो…

अशी काही भाग्यवान माणसं असतात की ज्यांचं अक्षर मुळातच सुंदर असतं. काही लोकांचं अक्षर अतिशय गिचमिड असतं; तर काही लोकांचं अक्षर हे प्रत्यॆकवेळी वेगळं येतं. ज्यांना आपलं अक्षर सुधारावं असं वाटतंय, त्यांच्यासाठी आज या अक्षर सुधारण्यासाठीच्या पाच फॅन्टास्टिक टिप्स.

अक्षर सुधारायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यासाठी कॅलीग्राफी यायला पाहिजे का? मुळीच नाही. काही सोप्या गोष्टी जरी तुम्ही केल्यात तरी तुमचं अक्षर सुधारलेलं तुम्हाला आढळेल.

सगळ्यात आधी अशा पेनची निवड करा की ज्याचा वापर करून तुम्हाला लिहायला आवडेल. मग ते फाऊंटन पेन असो वा बॉलपेन असो वा जेल पेन. योग्य त्या पेनची निवड ही एक महत्त्वाची पायरी आहे. आणि हो… महागडं पेन म्हणजे चांगलं पेन असं नाही. ज्या पेननी लिहिताना तुम्ही अगदी सहजपणे न अडखळता लिहू शकाल असं पेन तुम्ही निवडू शकता.

या नंतर अर्थात तुम्ही ज्या कागदावर अथवा वहिवर प्रॅक्टिस करणार आहात त्या कागदाची अथवा वहीची निवड. या कागदावर आखलेल्या लाईन्स जास्त डार्क असू नयेत. कागद हा शाई फुटणारा नसावा आणि या लाईन्स अशा आखलेल्या असाव्यात की तुम्हाला लिहीताना सोपं जाईल. मग त्या डबल लाईन बुक असो किंवा फोरलाईन बुक असो. बाजारात मिळणारे चौकोनी लाईन्स असणारे आलेख पेपर्स किंवा चार्ट पेपर्सही तुम्ही वापरू शकता.

तुमच्या मित्रमंडळींपैकी ज्यांचे हस्ताक्षर तुम्हाला आवडते त्या हस्ताक्षराचा नमुना मदतीला घ्या. जेणेकरून तुम्हाला त्याचा मार्गदर्शक म्हणून उपयोग होईल. अर्थात असा नमूना पाहिजेच असे काही गरजेचे नाही.

आता प्रत्यक्ष लिखाणाला सुरवात करताना तुमचा लिहिण्याचा स्पीड बऱ्यापैकी कमी करा. प्रत्येक अक्षर काढताना त्याच्या वळणाकडे लक्ष द्या. नुसतं सुंदर अक्षर येण्यापेक्षा दोन अक्षरांमध्ये सारखेपणा येणे फार आवश्यक आहे. तुम्ही केलेले लिखाण काळजीपूर्वक बघा. त्यामधली अशी अक्षरं शोधून काढा की ज्यामध्ये सारखेपणा नाही. या अक्षरांच्या वळणांकडे नीट लक्ष द्या. या ठराविक अक्षरांची वळणे घोटवा. त्यांच्या सुरवातीच्या आणि शेवटच्या स्ट्रोक्सकडे लक्ष द्या. यानंतर अक्षरांकडे वळा. दोन अक्षरांच्या स्पेसींगकडे लक्ष द्या. आवश्यक तिथे सुधारणा करा आणि ते शब्द तसेच लिहिण्याची प्रॅक्टिस करा.

एखादे वाक्य ‘टेस्ट सेंटेन्स’ म्हणून निवडा. आणि दर आठवडयात ठराविक दिवशी ते वाक्य लिहित जा. अक्षरलेखनाचा सराव सुरू असताना त्यात होणारी तुमची प्रगती तुम्हाला त्या वाक्याच्या लिखाणातून दिसून येईल. शेवटी सराव हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे.

(बोनस टिप: तुम्ही जर उजव्या हाताने लिहित असाल तर डाव्या हातानी लिहिण्याचाही सराव करा. त्यामुळे लिखाणाकडे आणि अक्षरांच्या वळणांकडे जास्त लक्ष केंद्रीत होते. लिहिण्याचा जास्त विचार केला जातो आणि नकळत अक्षर सुधारण्याला मदत होते.)

No related posts.

करिअर आणि आयुष्याच्या समतोलासाठी…
मी आणि माझं करिअर इथंच सगळं काही संपतं का? माझ्या घरातील सदस्य, मुलं, पत्नी / पती यांना माझ्या आयुष्यात कुठे स्थान आहे. मी करिअरच्या मागे पळतो, जीव ओतून नोकरी करतो…पण हे कोणासाठी? माझ्या एकट्यासाठी? का माझ्या कुटंबासाठी?

असा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारलात? आणि विचारला असाल तर त्याचं उत्तर मिळालंय?

करिअर आणि आयुष्य सांभाळत स्वतः आनंदी राहण्यासाठी आणि आपल्या कुटंबातल्या इतर सदस्यांनाही आनंदी ठेवण्यासाठी हा करिअर आणि संसार यांचा समतोल राखणं फार गरजेचं आहे. नाहीतर वादावादी, चिडचीड, भांडणं सगळं अगदी ठरलेलंच आहे…आणि भांडणं झाल्यावर त्याचं मूळ शोधण्यासाठी सुडोकूचे लेख वाचण्यापेक्षा हा समतोल कसा राखावा यासाठी आज मी काय सांगतोय ते वाचा…

१. सगळ्यात आधी तुमचा प्राधान्यक्रम ठरवा.

तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे याची खालील प्रमाणे यादी तयार करा.

जर माझ्या आयुष्यात एकच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल, तर ती कोणती?

यानंतर यात अजून एक गोष्ट वाढवली, तर ती कोणती असेल?

यानंतर येणारी तिसरी महत्त्वाची गोष्ट कोणती असेल?

आणि चौथी…

या क्रमाने किमान पाच आणि कमाल दहा गोष्टी लिहून काढा. मात्र उत्तर लिहिताना विचार करून आणि प्रामाणिकपणे लिहा. आतापर्यंत जेवढ्या लोकांनी याची उत्तरं लिहिली त्यांची उत्तरं साधारणपणे पुढीलप्रमाणे येतात:

माझी मुलं

माझी पत्नी / पती, माझे आई-वडील

उत्तम करिअर

उत्तम आरोग्य

छंद / आवड

२. गरज नसलेल्या गोष्टी टाळा

वरच्या प्रश्नांची निश्चित उत्तरं तुमच्याजवळ आल्यानंतर कदाचित तुम्हाला कळेल की आपल्या प्राधान्यक्रमावर नसलेल्या बऱ्याच गोष्टींवर आपण वेळ आणि शक्ती वाया घालवत आहोत. त्यानुसार तुमचे वेळापत्रक बदला. जिथे खरंच वेळ देण्याची गरज आहे तिथे हा जास्तीचा वेळ वापरा.

३. खाजगी वेळ राखून ठेवा

एखादे कौटुंबिक काम टाळण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. बऱ्याच वेळा आपण शाळेतल्या पालक-शिक्षक सभेला जाण्याचं टाळतो किंवा पत्नी अथवा पतीबरोबर दवाखान्यात जायचं असलं तर जोपर्यंत स्वतः तिच्या / त्याच्याबरोबर जाणं अपरिहार्य नसतं तोपर्यंत आपण ते टाळतो. आपल्याला जाणवलं नाही तरी या गोष्टींमुळे फार फरक पडतो. तुमची मुलं, पत्नी/पती या जर तुमच्या प्राधान्यक्रमावर असतील तर या गोष्टी टाळू नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा - तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किती तास काम केलं यापेक्षा काम काय दर्जाचं आणि कसं केलं याला अधिक महत्त्व आहे. कुटुंबियांसाठी कायम वेळ राखून ठेवा. कुटुंबियांसोबत आनंदात घालवलेल्या काही क्षणांमुळेसुद्धा तुमचे ऑफिसमधले काम सुधारते. तुमची उत्पादनक्षमताही वाढते आणि समाधानही मिळते.

४. मदत स्विकारा

एका मित्राने दुसऱ्या मित्राला अडचणीच्या वेळी केलेली ती मदत ही संकल्पना विसरून जा. मदत ही केवळ पैशांच्या स्वरुपात करता येते, असेही नाही. तुमची मुलगी अथवा मुलगा किंवा पत्नी अथवा पती जर तुमच्या एकाद्या कामात सहभागी होऊ इच्छित असतील तर ती इच्छा मदत म्हणून स्विकारा. तुमच्या कामात त्यांचाही सहभाग असू द्या. पतीने पत्नीला भांडी घासायला किंवा कपडे वाळत टाकायला मदत केली तर बिघडत काही नाही. याचप्रमाणे पत्नीही पतीच्या कामात मदत करू शकते. नुसत्या विचारांचं शेअरिंग उपयोगाचं नाही; कामाचंही शेअरिंग होणं तितकंच गरजेचं आहे. तुमचा मुलगा अथवा मुलगी जरी लहान असेल आणि त्यांच्या मदतीमुळे तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागणार असेल, तर तो सहन करा. मी आई किंवा बाबाला मदत केल्याचा कोण आनंद त्या चिमुरड्यांना मिळत असतो, हे लक्षात घ्या. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

५. आनंदी रहा-आनंदी ठेवा

मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे प्रचंड संपत्ती आहे, माझी आज्ञा झेलायला नोकर-चाकर आहेत…पण मी आनंदी नसेन तर माझे कुटंबियही आनंदी नसतील, हे कायम लक्षात ठेवा. आनंदी राहण्यासाठी एखादा छंद जोपासा. तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांनाही त्यांचे छंद जोपासायला प्रोत्साहन द्या. गाणी गा, गाणी ऐका, एखादा खेळ शिका, एखादी कला शिका…छंद या गटात मोडेल, असं काहीही करा; पण आयुष्यातील थोडा वेळ छंदासाठी ठेवा. रिलॅक्सेशनसाठी हे फार गरजेचं आहे. तुम्ही रिलॅक्स असलात म्हणजे तुमच्या मनावर कोणताही ताण नसला तरच तुम्ही आनंदी राहाल आणि तुम्ही आनंदी असलात की तुमचे कुटंबही आनंदी राहिल.

No related posts.

चित्रकला शिकण्यासाठी पाच बेसिक टिप्स (Tips)
मित्रहो नमस्कार,

तुमच्यापैकी काही जण व्यवसायाने चित्रकार असतील; तर काही उत्तम चित्रकार असतील. पण छंद किंवा आवड म्हणून चित्रकला जोपासणारे किंवा जोपासू इच्छिणारे अनेक जण असतील. खरं सांगतो, चित्रकला हा अतिशय आनंद देणारा असा छंद आहे. तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट तुम्ही कागदावर साकार करू शकता. हा छंद महागडा तर मुळीच नाही. फक्त एक कागद आणि पेन्सिल किंवा पेन या दोनच गोष्टी असल्या तरी पुरे. काही बेसिक माहिती असली तर तुम्ही तुमचा हा छंद चांगल्यापैकी वाढवू शकता.  चित्रकला ही आवड, छंद म्हणून जोपासणाऱ्या मित्रांसाठी या काही खास टिप्स..

चित्रकला शिकताना सुरवातीला विविध आकारांचा सराव करणे फार गरजेचे आहे. उदा. गोल, अर्धगोल, आडव्या उभ्या तिरप्या रेषा इत्यादी. या बेसिक आकारांपासूनच अवघड आकार तयार होतात. हे आकार अधिकाधिक अचूक काढण्यावर भर ठेवा.

वर सांगितल्याप्रमाणे या सर्व बेसिक आकारांपासूनच तुमच्या चित्राचा पुढचा भाग आकाराला येत असल्यामुळे हे सर्व आकार जास्तीत जास्त फिक्कट (Light) (पेन्सिलवर कमीत कमी दाब देऊन) काढण्याची प्रॅक्टीस करा.  या प्रकारे ड्रॉईंग करता येणे फार गरजेचे आहे.

हे बेसिक आकार काढताना काही अडचणी आल्या, किंवा आकार बरोबर येत नाहीयेत असं जाणवले तर शेप टेम्पलेट्सचा वापर करा. अशा टेम्पेट्स मार्केटमध्ये ड्रॉइंग मटेरियल मिळणाऱ्या दुकानात उपलब्ध आहेत.

मनुष्याकृती किंवा फिगर डॉईंग करताना अधिक सरावाची गरज भासते. अशा वेळी नाक, कान, ओठ अशा तुलनेने सोप्या आकारांपेक्षा हाताचा पंजा, ड्रेपरी इत्यादी अवघड आकारांचा सराव करण्याकडे भर द्या. अशा प्रकारचा सराव कराल तितका कमी आहे. त्यामुळे या सरावाला कोणत्याही प्रकारची मोजपट्टी लाऊ नका.

सरावासाठी शक्य असेल तितक्या चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा वापर करा. त्यामुळे डॉइंगपण चांगले होते आणि वैतागही येत नाही. (उदा. जर तुम्ही वापरत असलेल्या खोडरबरामुळे कागद फाटत असेल किंवा नीट खोडले जात नसेल तर तुम्ही वैतागणारच.) शक्य असेल तर डॉईंगसाठी क्लच पेन्सीलचा वापर करा. साध्या पेन्सीलीला वारंवार टोक करण्याचा त्रास वाचतो.

शेवटी कितीही झालं तरी चित्रकला ही व्यवसाय म्हणून स्विकारणं आणि छंद म्हणून जोपासणं यात फारच फरक आहे. वर दिलेल्या टिप्स या फक्त छंद म्हणून चित्रकला जोपासणाऱ्यांसाठी आहेत. त्यांचा नक्की फायदा होईल असा विश्वास आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

No related posts.

‘फेसबुक’वरील प्रायव्हसी राखण्यासाठी ५ टिप्स (Tips)
‘अॉर्कुट’चा वापर करून आपल्याकडे अनेक गुन्हे घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांची ‘मोडस अॉपरेंडी’ जाणून घेणं प्रचंड आव्हानात्मक आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईलमधील माहितीचा किंवा तिच्या स्टेटस मेसेजेसचा गुन्हेगार कसा वापर करेल, याचा अंदाज लावणं अत्यंत कठीण आहे. आपल्याकडे आता ‘फेसबुक’चाही वापर हळू-हळू वाढत आहे. कोणतीही सोशल नेटवर्किंग सेवा वापरताना स्वतःला काही मर्यादा घालून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आपण शेअर करत असलेली माहिती एखाद्या गुन्हेगाराच्या हाती लागू नये, यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी. तुम्ही ‘फेसबुक’ वापरत असाल तर पुढे दिलेल्या पाच महत्त्वाच्या प्रायव्हसी टिप्स फॉलो कराः

१. सर्च सेटिंग्ज

‘फेसबुक’च्या फ्रेंड सर्चमधून तुमचे मित्र तुम्हाला शोधू शकतात. अर्थात, तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्याशिवाय त्यांना तुमची संपूर्ण माहिती पाहायला मिळणार नाही; पण तुम्हाला कोणी शोधू नये याकरता तुम्ही ‘फेसबुक’च्या फ्रेंड सर्च फीचरमधून गायब होऊ शकता. Search Privacy Settings Page वर जाऊन ‘सर्च व्हिजिबिलिटी’ मधील तुम्हाला पाहिजे तो अॉप्शन (एव्हरीवन, अोन्ली फ्रेंड्स, इ.) सिलेक्ट करून सेव्ह चेंजेसवर क्लिक करा.

तुमचे ‘फेसबुक’ प्रोफाईल विविध सर्च इंजिनमधून देखील सर्च करता येऊ शकते. तुम्हाला ही सुविधा नको असल्यास याच पेजवरील Public Search Listing सेटिंग ‘अनचेक’ करा. तुमची प्रायव्हसी राखण्यासाठी तुम्ही या सेटिंगचा वापर करू शकता.

२. फोटो प्रायव्हसीः

‘फेसबुक’वर तुम्ही अपलोड केलेले सर्वच्या सर्व फोटो सगळ्यांनीच पाहावे असे नसतात. काही क्षण तुम्हाला तुमच्या अगदी जवळच्या मित्रांसोबतच शेअर करायचे असतात. यासाठी Photos Privacy Page वर जाऊन तुम्ही अपलोड केलेल्या विविध अल्बमसाठी या सेटिंग्ज बदलू शकता. उदा. एखादा अल्मब सर्वांसाठी असेल; तर एखादा अल्बम तुमच्या फ्रेंड लिस्टमधील मित्र किंवा अगदी तुम्ही म्हणाल तेच मित्र पाहू शकतील. केवळ एखाद्या मित्रापासून हे क्षण लपवायचे असतील तरीदेखील लपवता येतील.

३. प्रोफाईल आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनः

तुम्ही बिझनेस वाढवण्यासाठी किंवा कॉन्टॅक्ट्स वाढवण्यासाठी ‘फेसबुक’चा वापर करत असला तरी घराचा पत्ता किंवा मोबाईल नंबर वगैरेंसारखी महत्त्वाची माहिती ‘फेसबुक’वर असणाऱ्या सर्वांना देण्याच्या फंदात पडू नका. अशा माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे Profile Privacy Page वर जाऊन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनवर क्लिक करा. इथे तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीच्या सेटिंग्ज बदलू शकता.

४. फ्रेंड्स व्हिजिबिलिटीः

तुमच्या फ्रेंडलिस्टमधील काही मित्रांना इतरांसोबत त्यांची आयडेंटिटी शेअर करण्याची इच्छा नसू शकते; किंवा तुम्हाला फ्रेंड म्हणून अॅड करणाऱ्यांना कदाचित तुमच्या फ्रेंड लिस्टमधील काही निवडक मित्र-मैत्रिणींचं काय चाललंय, हे जाणून घेण्याचीच अधिक इच्छा असू शकते. अशा मित्र-मैत्रिणींची प्रायव्हसी राखण्यासाठी Profile Privacy Page वरील बेसिक सेटिंग्जमध्ये जाऊन फ्रेंड्सवर क्लिक करा. तुमची फ्रेंड लिस्ट कोण-कोण पाहू शकतं, याच्या सेटिंग्ज तुम्ही येथून बदलू शकता.

५. अॅप्लिकेशन प्रायव्हसीः

तुम्ही अनेक फेसबुक अॅप्लिकेशन वापरत असाल. अॅप्लिकेशन वापरून केलेल्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीचा अपडेट तुमच्या फ्रेंडलिस्टमधील सगळ्या मित्रांना जातो. उदा. Have sex! नावाच्या अॅप्लिकेशनचा अपडेट असा जातोः

XYZ is having Sex! Click here to see more or try it yourself!

Have Sex! हे अॅप्लिकेशन गमतीसाठी असलं तरी असा मेसेज जाणं म्हणजे जरा…

असो. तर एखादं अॅप्लिकेशन वापरल्यानंतर त्याचे अपडेट्स पाठवायचे किंवा नाही याच्या सेटिंग्ज तुम्ही Applications page वर जाऊन बदलू शकता.

No related posts.

असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठीचे रंग (Tips)
कल्पना करा.. रणरणतं उन…घामाच्या धारा… तहान लागलेली आणि तुमच्या समोरून पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे कपडे घातलेली माणसं येताहेत… कसं वाटेल तुम्हाला.. विचारही नको. मात्र आता अशा वेळी निळ्याशार रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती तुमच्या समोर आली तर किती बरं वाटेल… नुसत्या रंगाच्या वापरानेही आपण हा उन्हाळा सुसह्य करू शकतो. त्यासाठी या फॅन्टास्टिक फाईव्ह टिप्स

कडक उन्हात जाताना शक्यतो पांढरा किंवा लाईट कलरच्या कपड्यांचा वापर करा. पांढरा रंग हा सगळ्यात जास्त सूर्यकिरणे म्हणजेच उष्णता परावर्तित करतो.

काळा रंग हा सूर्यकिरणे शोषून घेत असल्याने या रंगाच्या कपड्यांचा वापर उन्हाळ्यात शक्यतो टाळा. मात्र दिवशी भरपूर वारा असेल त्यादिवशी काळ्या रंगाचे सैलसर कपडे घालायला हरकत नाही. कारण काळा रंग ज्या वेगाने उष्णता शोषून घेतो त्यापेक्षा अधिक वेगाने वाऱ्यामुळे ती नाहिशी होते.

लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग उत्तेजक रंग आहेत. शुद्ध मराठीत सांगायचे तर या रंगांकडे बघितल्यावर रक्त खवळते. म्हणजेच हे उष्ण रंग आहेत. काही जणांचा रक्तदाबही लाल रंगाकडे सतत बघितल्याने वाढतो. अशा रंगाचे कपडे शक्यतो टाळावेत.

भर उन्हाळ्यात तुम्हाला थंडगार निळ्याशार पाण्यात डुंबायला मिळालं तर…? निळा रंग हा शांततेचं प्रतिक आहे. या रंगाकडे बघितल्यावर मन शांत होतं. त्यामुळे उन्हाळ्यात या रंगाचे कपडे अवश्य घालावेत.

आता थंडगार वाळ्याचं सरबत डोळ्यापुढे आणा. साधारणपणे उन्हाळ्यात असं आढळते की आपण ऑरेंज सरबतापेक्षा वाळ्याचं सरबत अधिक पसंत करतो. यात थंडपणा हा वाळ्याचा गुणधर्म मानला तरी हिरव्या रंगाचाही त्यात तेवढाच वाटा आहे. हिरवा रंग हा निसर्गात जागोजागी आढळणारा रंग आहे. हा रंग शांत रंग आहे आणि चैतन्याचं प्रतिक मानलेला आहे. आणि या रंगामुळेही मन शांत होते…त्यामुळे या रंगाचा वापरही उन्हाळ्यात करायला हरकत नाही.

No related posts.

घरासाठी रंगसंगती ठरवताना…(Tips)
बऱ्याचवेळा आपण आपल्या घराला रंग देण्याचे काम काढतो. आणि मग ढिगभर रंगांच्या शेड्स असलेली कार्डस् घेतो… काही आपल्या हातात काही सौभाग्यवतींच्या हातात, काही घरातील इतर मंडळींच्या हातात…  आणि कलर सिलेक्शनच्या कार्यक्रमाचा मासळी बाजार कधी होतो ते लक्षातही येत नाही. एवढं होऊन प्रत्येकवेळी एकमत होईलच असंही नाही… मग गट पडतात, किचनच्या रंगाची जबाबदारी स्वाभाविकपणे  सौभाग्यवतींकडे जाते… इतर खोल्यांच्या रंगाबद्दल कोणाचंच एकमत होत नाही. आणि एकमत झालंच तरी प्रत्येकवेळी ही निवड बरोबरच असेलच असेही नाही. हा प्रसंग टाळण्यासाठीच हा शब्दप्रपंच…

रंगांनाही स्वतःचा स्वभाव असतो. लाल रंग हा जोश निर्माण करणारा, व्हायब्रंट (मराठी शब्द माहित नाही. क्षमा करा) कलर आहे. हा रंग रक्त उसळवणारा आहे लालभडक रंगाकडे अधिक काळ बघितलं तर रक्तदाबही वाढतो असं म्हणतात. असंही म्हणतात की लाल रंगामुळे भुकेची भावना जागृत होते. त्यामुळे बऱ्याचवेळा हॉटेल्समध्ये लालभडक करी लाल रंगाची कलरस्कीम वापरलेली दिसते. त्याच्या विरुद्ध म्हणजे निळा रंग… अत्यंत थंड प्रवृत्तीचा आणि मनाला शांती देणारा रंग. साधारणपणे ज्या खोलीत आपण रिलॅक्स होणार असतो त्याठिकाणासाठी अगदी योग्य. पांढरा रंग हा पावित्र्य आणि स्वच्छता दर्शवतो त्यामुळे बहुतेक रुग्णालयांत पांढऱ्या रंगाचा वापर दिसतो. तसंच येलो कलर उत्साहाची भावना निर्माण करतो. अशा रंगाच्या खोलीत आपल्याला आनंदी उत्साही वाटते.

अशी ही रंगांमागील सायकॉलॉजी. एखाद्या रंगातून निर्माण होणाऱ्या भावना त्या रंगाचा स्वभाव या गोष्टी माहित असतील तर ही निवड बऱ्यापैकी सोपी होते.

घरातल्या खोल्यासाठी रंगाची निवड करण्यासाठी या पाच महत्त्वाच्या टिप्स.

१. काही वेळेला खोलीसाठी रंग सिलेक्ट करणं हे आपला आवडता रंग सिलेक्ट करण्याइतकं सोपं असतं. पण काही वेळा फारच अवघड. बऱ्याच वेळा तुम्ही सिलेक्ट केलेला रंग तुमच्या खोलीच्या डिझाईनशी किंवा थीमशी मॅच होत नाही. त्यामुळे सगळ्यात सोपा उपाय म्हणजे खोलीत असलेले फर्निचर किंवा इतर वस्तूंच्या रंगाचा विचार करा आणि त्याच्याशी मिळताजुळता रंग सिलेक्ट करा. त्यामुळे बऱ्याच वेळा खोलीला डिझायनर टच येतो.

२. रंग सिलेक्ट केल्यावरही एकदम सगळी खोली रंगवण्यापेक्षा भिंतीचा एखादा भाग त्या रंगाने रंगवा. दोन ते तीन दिवस त्या रंगाकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा रंग तुम्हाला आवडतो आहे की नाही.

३. डार्क रंगाच्या वापरामुळे खोली लहान वाटते तर ब्राईट रंगाच्या वापरामुळे खोलीचे आकारमान वाढल्याचा भास होतो. त्यामुळे खोली लहान असेल तर भिंती व फर्निचर दोन्हीसाठी उजळ रंगाचा वापर करा.

४. पहिल्यांदाच खोलीसाठी रंग सिलेक्ट करत असाल तर चार किंवा पाच रंगंच शॉर्टलिस्ट करून त्यातूनच सिलेक्शन करा. त्यामुळे नंतर होणारा गोंधळ आणि त्यामुळे वाया जाणारा वेळ दोन्हीही टाळता येतं. जितकं कमी तितकं चांगलं, ही म्हण इथे बरोबर लागू पडते.

५. तुमचे घर रंगवणे म्हणजे फक्त घराच्या भिंती रंगवल्या म्हणजे झाले असं नाही. त्याखोलीत इतर रंगीत गोष्टींचा कलात्मकतेने केलेला वापर घराच्या सौंदर्यत भर घालतो हेही लक्षात ठेवा. त्यामुळे त्या खोलीत रंगकामाच्या आधी तुम्ही काय काय ठेवणार आहेत, त्यांचे रंग कसे आहेत किंवा असतील याचाही विचार करा. रंगांची सायकॉलॉजीही महत्त्वाची. बेडरूमला पिवळा आणि स्टडी मध्ये ब्लू रंगाचा वापर केलात तर निगेटिव्ह इफेक्ट हा होणारच.

(Click on images to enlarge)

आणि सगळ्यात महत्त्वाचं…तुम्ही कुठलाही रंग सिलेक्ट करा कितीही वेळा सिलेक्शन बदला… वादावादी होऊ देत…या सगळ्या प्रक्रियेचा आनंद घ्या आणि मजा करा!

No related posts.