Archive | Fantastic Tips RSS feed for this section

वेदना

29. December 2009

1 Comment

प्रत्येकाच्या उरात असतो एक बाण रुतलेला, प्रत्येकाच्या मनात असते ठसठसणारी वेदना… वेदनेचा पार नाही, बाणाची धार नाही, दुखावलेला असतो पण एक हळवा कोपरा… कुणी शोधू जाते वेदनांचा उपाय कुणी गाठू पाहते त्या वेदनांचा गाव कुणी जाऊ पाहते दूर दूर पण अडकून राहती मनीच्या तळवटात… असेच असते साऱ्यांचे परी वाटते एकट्याचे घावाचे वारकरी ते बुडूनी जाती डोहात… डोहात बुडाल्या साऱ्यांना पाव्याचे लागे पिसे सुरलयीवर झुलता झुलता कृष्णसखा तो निर्मळ हसे… सांगे मग कृष्ण तो, माया डोहाची अपार बुडालो [...]

Continue reading...

बाधित

21. November 2009

1 Comment

“सर, ती जागा घेऊ नका. बाधित आहे ती.” “छे छे… मी नाही असल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवत. आणि असल्या भाकड गोष्टींवर विश्‍वास ठेवून इतक्‍या कमी रेटमध्ये हाती पडणारी मोक्‍याची जागा काही मी घालवणार नाही.’ “रागावू नका. पण आमचं सांगायचं काम होतं, ते आम्ही केलं. नंतर म्हणू नका, की यांनी असली जागा आमच्या गळ्यात मारली.’ “काही म्हणणार नाही मी. तुम्ही [...]

Continue reading...

बाप ज्ञानेश्वर

18. November 2009

2 Comments

बाप ज्ञानेश्वर

नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा झाला. त्यानिमित्तानं ही शब्दांजली… खरंतर त्या शब्दप्रभूला या अोळी वाहणं म्हणजे सोन्याच्या राशीवर मातिची चिमूट उधळणं. पण मातीची का असेना, त्यामागे भावना स्वच्छ आहेत, ही त्यातल्या त्यात अभिमानाची गोष्ट… श्री ज्ञानदेवार्पणमस्तु… जाहला अंधार, लोपला दिनकर रात्र ही भयाण दाटूनी आली मन हे व्याकूळ सापडेना सूर करावे काय आकळेना भेटलास दू, दिले आत्मभान पाहूनी प्रकाश शांतावलो समाधी बैसोनि [...]

Continue reading...

या पैशाचे काय करावे - ४ खूणगाठी

18. August 2009

0 Comments

या पैशाचे काय करावे - ४ खूणगाठी

एक कानाला गोड पण वळायला अवघड वाक्य आहे - ‘Every penny saved is twice a penny earned’…खरे आहे की नाही? एक हजार रुपये कमवायला तुम्हाला त्यात किती एफर्टस् घालावे लागतात? तितकेच गमवायला मात्र काही लागणार नाही – ‘लाईफस्टाईल’ मॉलमध्ये एक चक्कर मारा किंवा ‘अॅडलॅब्ज’ला एक भेट द्या…तुम्हाला काहीही प्रयत्न करावे लागणार नाहीत आणि वर चांगली [...]

Continue reading...

अक्षर सुधारण्यासाठी…(Tips)

21. July 2009

1 Comment

अक्षर सुधारण्यासाठी…(Tips)

नमस्कार मित्रांनो… अशी काही भाग्यवान माणसं असतात की ज्यांचं अक्षर मुळातच सुंदर असतं. काही लोकांचं अक्षर अतिशय गिचमिड असतं; तर काही लोकांचं अक्षर हे प्रत्यॆकवेळी वेगळं येतं. ज्यांना आपलं अक्षर सुधारावं असं वाटतंय, त्यांच्यासाठी आज या अक्षर सुधारण्यासाठीच्या पाच फॅन्टास्टिक टिप्स. अक्षर सुधारायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यासाठी कॅलीग्राफी यायला पाहिजे का? मुळीच नाही. काही सोप्या गोष्टी [...]

Continue reading...

करिअर आणि आयुष्याच्या समतोलासाठी…

3. June 2009

4 Comments

करिअर आणि आयुष्याच्या समतोलासाठी…

मी आणि माझं करिअर इथंच सगळं काही संपतं का? माझ्या घरातील सदस्य, मुलं, पत्नी / पती यांना माझ्या आयुष्यात कुठे स्थान आहे. मी करिअरच्या मागे पळतो, जीव ओतून नोकरी करतो…पण हे कोणासाठी? माझ्या एकट्यासाठी? का माझ्या कुटंबासाठी? असा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारलात? आणि विचारला असाल तर त्याचं उत्तर मिळालंय? करिअर आणि आयुष्य सांभाळत स्वतः आनंदी राहण्यासाठी [...]

Continue reading...

चित्रकला शिकण्यासाठी पाच बेसिक टिप्स (Tips)

2. June 2009

0 Comments

चित्रकला शिकण्यासाठी पाच बेसिक टिप्स (Tips)

मित्रहो नमस्कार, तुमच्यापैकी काही जण व्यवसायाने चित्रकार असतील; तर काही उत्तम चित्रकार असतील. पण छंद किंवा आवड म्हणून चित्रकला जोपासणारे किंवा जोपासू इच्छिणारे अनेक जण असतील. खरं सांगतो, चित्रकला हा अतिशय आनंद देणारा असा छंद आहे. तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट तुम्ही कागदावर साकार करू शकता. हा छंद महागडा तर मुळीच नाही. फक्त एक कागद आणि पेन्सिल [...]

Continue reading...

‘फेसबुक’वरील प्रायव्हसी राखण्यासाठी ५ टिप्स (Tips)

23. May 2009

0 Comments

‘अॉर्कुट’चा वापर करून आपल्याकडे अनेक गुन्हे घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांची ‘मोडस अॉपरेंडी’ जाणून घेणं प्रचंड आव्हानात्मक आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईलमधील माहितीचा किंवा तिच्या स्टेटस मेसेजेसचा गुन्हेगार कसा वापर करेल, याचा अंदाज लावणं अत्यंत कठीण आहे. आपल्याकडे आता ‘फेसबुक’चाही वापर हळू-हळू वाढत आहे. कोणतीही सोशल नेटवर्किंग सेवा वापरताना स्वतःला काही मर्यादा [...]

Continue reading...

असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठीचे रंग (Tips)

30. April 2009

0 Comments

कल्पना करा.. रणरणतं उन…घामाच्या धारा… तहान लागलेली आणि तुमच्या समोरून पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे कपडे घातलेली माणसं येताहेत… कसं वाटेल तुम्हाला.. विचारही नको. मात्र आता अशा वेळी निळ्याशार रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती तुमच्या समोर आली तर किती बरं वाटेल… नुसत्या रंगाच्या वापरानेही आपण हा उन्हाळा सुसह्य करू शकतो. त्यासाठी या फॅन्टास्टिक फाईव्ह टिप्स कडक उन्हात जाताना [...]

Continue reading...

घरासाठी रंगसंगती ठरवताना…(Tips)

17. April 2009

3 Comments

बऱ्याचवेळा आपण आपल्या घराला रंग देण्याचे काम काढतो. आणि मग ढिगभर रंगांच्या शेड्स असलेली कार्डस् घेतो… काही आपल्या हातात काही सौभाग्यवतींच्या हातात, काही घरातील इतर मंडळींच्या हातात… आणि कलर सिलेक्शनच्या कार्यक्रमाचा मासळी बाजार कधी होतो ते लक्षातही येत नाही. एवढं होऊन प्रत्येकवेळी एकमत होईलच असंही नाही… मग गट पडतात, किचनच्या रंगाची जबाबदारी स्वाभाविकपणे [...]

Continue reading...

शांत झोपेसाठी…(Tips)

16. April 2009

3 Comments

शहरी, धकाधकीच्या जीवनात आपण ज्या गोष्टी गमावतो, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. ‘काही मिळो न मिळो पण रात्री शांत झोप लागली पाहीजे’ असा आपला अॅटीट्यूड असतांनाही सगळ्यात दुर्मिळ होते ती झोपच…मग दुसऱ्या दिवशी निरुत्साह, दिवसभर जांभया, अंगात कणकण, डोळे जळजळणे यासारख्या गोष्टी हटकून वाट्याला येतात. मग त्यादिवशी लगेच आपण उपायही चालु करतो – कडक [...]

Continue reading...

अॉफिस डेस्क स्वच्छ ठेवण्यासाठी…(Tips)

16. April 2009

1 Comment

आमचं अॉफिस ‘पेपरलेस’ आहे किंवा मी कधीच प्रिंटआऊट काढत नाही अशी शेखी मिरवणाऱ्यांचे डेस्क कायम कागदांनी भरलेले आढळतील. आपण कितीही ‘पेपरलेस’ होण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या डेस्कवर कागद साचतच जातात आणि सहा महिन्यांतर तो ढीग हाताबाहेर जातो. त्यामुळे आलेली कागदपत्रं लगेच हातावेगळी करणे, हा यावरील मुख्य उपाय. आपला डेस्क स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण [...]

Continue reading...
Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro