Fantastic Five » Etc.

खाद्ययात्रेची संजीवनी
आम्हा मित्रांना खायचा भारी नाद. हा नाद खाखा-खाण्याचा मात्र नाही. एकदम चवीने खाल्यावर आचाऱ्याला त्या समाधानाची पावती दिल्याशिवाय हॉटेलातून पाय निघवत नाही अशी गत. ‘सारेगमप’मधल्या वाडकरांना चांगल्या गाण्यात जशी ‘जवारी’ वगैरे सापडली तसा एक मस्त अनुभव परवा पुण्याच्या ‘संजीवनी’ नावाच्या एका साध्या आणि छोट्या खानावळीत आला.

आडवळणाचा-आडबाजूचा एखादा वडापाववाला, एखादा भेळवाला किंवा एखादा चिकन-रश्शावाला जसा बेष्टच असतो तसं मिस्सळ-पावमध्ये माझ्या मते या ‘संजीवनी’वाल्यांचा हात कुणी धरू शकणार नाही.

कित्येकदा त्या रस्त्यावर जाणे-येणे असूनही हे ‘संजीवनी’ हॉटेल मला बिलकूल माहित नव्हते. टिळक रस्त्यावर स्वारगेटला जाताना, स.प. कॉलेजच्या थोडे पुढे ‘गिरिजा’च्या चौकात उभारल्यावर समोरच तिरक्या दिशेला एका पांढऱ्या घरात हे हॉटेल आहे. कुठेही जाहिरात नाही किंवा नावाची भलीमोठी पाटीही नाही (अगदी ‘संजीवनी’ हे नावसुद्धा मित्र म्हणाला म्हणून – या नावाचा बहुधा कुठेही उल्लेख नाही). बाहेर फक्त एक भावफलक बस्स! ‘अस्सल पुणेरीपणा दुसरं काय!’ असं म्हणावं तर तसंही काही नाही. म्हातारे आई-वडील आणि त्यांचा तरूण मुलगा असे तिघेजण या हॉटेलातले मालक-आचारी-वेटर वगैरे सबकुछ. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही खवचटपणा वगैरे काही नाही.

इथल्या मिसळची महती मी माझ्या एका अभिनव कॉलेजमध्ये शिकलेल्या मित्राकडून आधीच ऐकली होती. त्यामुळे तिथे गेल्यावर काय मागवायचे, हा नेहमीचा प्रश्नच नव्हता.

संजीवनीमध्ये तिथल्या पदार्थांच्याबाबतीत बनवून ठेवणे वगैरे प्रकारच नाही. त्यामुळे प्रत्येक पदार्थ गरमागरम आणि फ्रेश! याला नेहेमीपेक्षा थोडा जास्त वेळ जरी लागला तरी ‘नो प्रॉब्लेम!’ नॉर्मली मी ‘झणझणीत, नाका-डोळ्याला पाणी’ आणणाऱ्या मिसळच्या फार प्रेमात नाही. फक्त तोंडाला पाणी आले तरी पुरे. यामुळे मी सहसा बाहेर मिसळ खाणे टाळतोच.

संजीवनीमधली मिसळ मात्र माझ्यासाठी एक चविष्ट आश्चर्य होते. ‘एक घास – तीन घोट पाणी’ अशी जरी नसली तरी ही मिसळ पार सपकही नव्हती. किंबहुना ‘हर स्वाद सही-सही’. मिसळचे जे ‘सॅंपल’ असते ते तर इतके मस्त होते की बास्स! मित्राने माहिती दिली की गेली ८-१० वर्षे ही सुंदर चव तितकीच आणि त्याच प्रकारे सुंदर आहे. ही कदाचित मिसळ तयार करणाऱ्यांना त्यांच्या कामाची सर्वात मोठी पावती आहे. क्वालिटीच्या या जमान्यात क्वालिटी अशा प्रकारे कायम ठेवणे म्हणजे खरोखर मोठे काम आहे. बरं याची कधी कुठे जाहिरातसुद्धा नसते पण तरीसुद्धा इथे येणारा प्रत्येक खवय्या हा ‘रिपीट कस्टमर’ असतोच असतो.

मिसळ झाल्यावर आम्ही इथली जगप्रसिद्ध ‘ब्रू कॉफी’ मागवली. हीसुद्धा तितकीच अफलातून. कदाचित मिसळ खाता खाता माहोलच असा होतो की आपल्याला समोर आलेली प्रत्येक गोष्ट तितकीच अप्रतिम वाटू लागते. पण मला मात्र त्याक्षणी ती कॉफी अभूतपूर्वच वाटली.

या चवीला आणि एकूण अनुभवाला शंभरपैकी शंभर मार्क!

No related posts.

कोल्हापुरातलं अस्सल ‘रस्सामंडळ’
तांबडा-पांढरा रस्सा आणि घसघशीत मटण. सोबत गरमगरम भाकरी आणि दहीकांदा-लिंबू. तोंडाला पाणी सुटलं नं? नॉन-व्हेज खवय्यांसाठी कोल्हापुरी मटण एकदम फेव्हरीट. कोल्हापुरी मटण थाळी तशी अनेक ठिकाणी आता मिळतेय. पुण्यातल्या सदाशिव पेठेत तर कोल्हापुरात मिळणार नाही, इतकी हॉटेलं झालीत कोल्हापुरी मटणाची. खरं सांगायचं, तर त्यापैकी एखाद्याच हॉटेलत खरंखुरं कोल्हापुरी मटण चाखता येतं. बाकीच्या ठिकाणी चटणीऐवजी तिखट ओतून मटण लालेलाल बनवलं जातं. असो.

पुण्यातल्या कोल्हापुरी मटण हॉटेलांमध्ये आता आणखी एक भर पडलीय आणि तिथं खरेच कोल्हापुरी चवीचं मटण ताट मिळतेय. हे नवं हॉटेल आहे सिंहगड रोडवर आणि नाव आहे, ‘कोल्हापुरी रस्सामंडळ’.

ज्यांना कोल्हापूर माहितीय, त्यांना आठवेल, की कोल्हापुरात हॉटेलात जाऊन मटण खाणाऱ्यांची संख्या अगदीच कमी. त्याऐवजी रस्सामंडळ होतात तिथं. पंचगंगा नदी, रंकाळा किंवा कुठल्याही ग्राऊंडवर, बागेत ही रस्सामंडळं रंगतात. तिथंल्या मटणाची चव भन्नाट. ती हॉटेलांमध्ये नाही मिळणार. आणि म्हणूनच ‘कोल्हापुरी रस्सामंडळ’ हॉटेल वेगळं वाटलं. नावापासून ते तिथं अस्सल कोल्हापुरी रंग-ढंगाचं इंटेरिअर करण्यापासून या हॉटेलनं वेगळेपण जपलंय. कोल्हापुरी फेटा, घोंगडी, काठी आणि तुतारी या हॉटेलच्या दर्शनी भागातच आहे. पंचगंगेच्या काठी रंगलेल्या रस्सामंडळाचं वॉटर कलरमधलं सुरेख पेंटिंगही खवय्यांना सुखावणारं!

‘कोल्हापुरी रस्सामंडळ’मध्ये मटण आणि चिकन ताट मिळते. मटण आणि चिकनमध्ये मसाला ताट आणि फ्राय ताट ही नेहमीची कोल्हापुरी वैशिष्ट्यं आहेतच. शिवाय, दर्दी खवय्यांसाठी मुंडी ताट आणि पाया ताट असे दोन स्वतंत्र प्रकार आहेत. खिमा हा कोल्हापुरी ताटातला लज्जतदार पदार्थ. डोळ्यातनं पाणी येईपर्यंत तांबडा रस्सा भुरकल्यानंतर खिमा जरूर चाखावा. इथं ताटासोबत अंडाकरी येते. ती नको असेल, तर खिमा प्लेट एक्स्ट्रा मिळते.

कोल्हापुरी मटण मसाल्याची चव जीभेला एक हवाहवासा झटका देते. भाकरीसोबत मटणाचा पीस जीभेवर ठेवला की तोंडाला आणखी पाणी नक्की सुटतं, पण उगाच तिखटजाळ लागत नाही. जेवतानाच खूप पाणी प्यावं लागत नाही. पोटात भरपूर अन्न जातं. नेमकं हे अनेक हॉटेलांमध्ये घडत नाही. एका घासाबरोबर एक ग्लास पाणी, कोल्हापुरी मटणाच्या ताटावेळी प्यावं लागतं.

‘कोल्हापुरी रस्सामंडळ’मध्ये मात्र प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावं लागणार नाही. उलट तोंडाला पाणी सुटत राहील…!

इथं शाकाहारींसाठीही मस्त ताटं आहेत. कांद्याची हिरवीगार ताजी पात शाकाहारी ताटाची लज्जत नक्कीच वाढवते. तांबडी आमटी आणि वरणही सोबत आहे. व्हेज-नॉन व्हेजपैकी काहीही ताट मागवणार असाल, तरी सोलकढीला विसरू नका. इथंली सोलकढीही तितकीच टेस्टी आहे.

जेवण पूर्ण होईल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की ‘कोल्हापुरी ताट’ म्हणजे नेमकं काय असतं…!

‘कोल्हापुरी रस्सामंडळ’ ला अशी भेट द्या:

सारसबाग-सिंहगड रोड-राजाराम पुलाचा सिग्नल-विठ्ठल मंदीर-मस्तानी कोल्ड्रिंक हाऊस-कोल्हापुरी रस्सामंडळ.

या मार्गाने आलात तर रस्त्याच्या डाव्या बाजूला हे हॉटेल मिळेल. इथं काही दिवसांपूर्वी कामत हॉटेल होतं.

No related posts.

सांडलेली कॉफी आणि नागमोडी रांग (Reviews Etc.)
गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमधील गोष्ट असेल. दिल्लीतील तीन दिवसांच्या मुक्कामानंतर उरलेल्या कामासाठी  मुंबईला जायचे होते. सकाळी आठचे विमान पकडून साडे नऊ दहापर्यंत मुंबईत पोचणे व ११ वाजताची मिटींग अटेंड करणे, असा प्लॅन होता. सकाळी सव्वा सहाला हॉटेल सोडून साधारण पाऊणेक तासानंतर विमानतळावर पोचलो. जेट एअरवेजचे टर्मिनल पाहून गाडी तिकडे वळवली तेव्हा लक्षात आले की आपण रांगेत १० व्या वगैरे क्रमांकावर आहोत.  ‘पीक अवर्स’मध्ये सगळ्या डोमेस्टिक टर्मिनल्सच्या बाहेर असाच ‘ट्राफिक जाम’ पाहायला मिळतो. तेथून आत जाण्यासाठी केवळ एकच गेट होते. त्यामुळे तिथेही ‘ट्राफिक जाम’. पुढे मोजकेच ‘चेक-इन’ डेस्क्स त्यामुळे पुन्हा एकदा रांग…सकाळची वेळ असल्याने अनेक लोकांनी रांगेतच ब्रेकफास्ट करण्यास सुरवात केली. एका हातात बॅग, दुसऱ्या हातात सँडविच, बगलेत तिकिट आणि त्यात मित्राने आणलेला कॉफीचा कप धरण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे अनेक जण…असे दृष्य पाहावयास मिळत होते. फरशीवर सांडलेली कॉफी चुकवण्यासाठी सरळ असलेली रांग नागमोडी झाली होती. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या इतर प्रवाशांना आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांना अडथळा होत होता. पुढे बॅगेच स्क्रीनिंगसाठी केवळ दोन काऊंटर. त्यामुळे तिथेही रांग. सगळं झाल्यानंतर बससाठी रांग; कारण एकावेळी केवळ दोन बस उभ्या राहू शकतील एवढीच जागा तिथे होती. असो. असा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल.

(Click on images to enlarge)

पण आता दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 1D हे नवे डोमेस्टिक टर्मिनल उद्यापासून म्हणजे १९ एप्रिल २००९ पासून कार्यरत होत आहे. या टर्मिनलवरून किंगफिशर एअरलाईन्स, किंगफिशर रेड आणि इंडिगो एअरलाईन्सची उड्डाणे होतील. किंगफिशर एअरलाईन्सची उड्डाणे यापूर्वी 1A टर्मिनलवरून; तर किंगफिशर रेड आणि इंडिगोची उड्डाणे 1B वरून होत असत. उद्यापासून ही उड्डाणे 1D या नव्या टर्मिनलवरून होतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या नव्या टर्मिनलपर्यंत पोचण्यासाठीदेखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून टर्मिनलमध्ये अनेक नव्या सोयी उपलब्ध करून देण्यास आल्या आहेत. एन्ट्रीसाठी आठ गेट्स, ७२ चेक-इन काऊंटर्स, १४ सिक्युरिटी क्लिअरन्स चॅनेल्स, १४ बोर्डिंग गेट्स आणि बसेससाठी ११ बोर्डिंग पॉईंट्स असा हा सगळा प्रशस्त मामला असणार आहे. तुम्ही अशात या टर्मिनलवरून प्रवास करणार असाल तर ‘फँटास्टिक फाईव्ह’च्या वाचकांसाठी तुमचा अनुभव जरूर शेअर करा. याखेरीज भारतातील आणि परदेशातील विविध विमानतळाचे अनुभवही तुम्ही शेअर करू शकता.

No related posts.