Archive | Sudoku RSS feed for this section

प्रवास

8. March 2010

3 Comments

ही कथा आहे एका चिमुरड्याची. आई-वडिल एड्‌सने गेले, म्हणून रस्त्यावर सोडलेल्या चिमुरड्याची. आपल्यासोबत असणाऱ्या, एड्‌स असणाऱ्या धाकट्या भावाची काळजी घेणाऱ्या मोठ्या भावाची. गेल्या आठवड्यात मला एकानं ही “वनलाईनर’ सांगितली. एका संस्थेत तो गेला असताना, त्याला समजलं, की एका मोठ्या घरातल्या दोन छोट्यांना रस्त्यावर सोडण्यात आलं होतं. कारण एकच, त्यांचे आई-बाबा, म्हणजे त्या घरातील कर्त्या पुरुषाचा [...]

Continue reading...

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री…

1. January 2010

0 Comments

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लाईट गेले क्षणभरच आणि झाला एकच कल्लोळ हॅपी न्यू इयरचा दणदणाट बाटल्या उघडल्याचे आवाज अन् चिअर्सचा जल्लोश ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रंगला गप्पांचा फड जाग्या झाल्या जुन्या आठवणी आठवले काॅलेजचे दिवस ते लबाड्या करून केलेले नाइटआऊट आणि पै पै जमवून घेतलेल्या बाटल्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रंगली पार्टी, झिंगली सारी प्रजा रस्त्यावरून झोकात फिरताना गाडीची काच खाली करून दिल्या आरोळ्या पोलिस नसल्याचं पाहून हळूच फेकली एक बाटलीही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रस्त्यावरून रमतगमत फिरताना रस्त्याच्या [...]

Continue reading...

वेदना

29. December 2009

1 Comment

प्रत्येकाच्या उरात असतो एक बाण रुतलेला, प्रत्येकाच्या मनात असते ठसठसणारी वेदना… वेदनेचा पार नाही, बाणाची धार नाही, दुखावलेला असतो पण एक हळवा कोपरा… कुणी शोधू जाते वेदनांचा उपाय कुणी गाठू पाहते त्या वेदनांचा गाव कुणी जाऊ पाहते दूर दूर पण अडकून राहती मनीच्या तळवटात… असेच असते साऱ्यांचे परी वाटते एकट्याचे घावाचे वारकरी ते बुडूनी जाती डोहात… डोहात बुडाल्या साऱ्यांना पाव्याचे लागे पिसे सुरलयीवर झुलता झुलता कृष्णसखा तो निर्मळ हसे… सांगे मग कृष्ण तो, माया डोहाची अपार बुडालो [...]

Continue reading...

बाधित

21. November 2009

0 Comments

“सर, ती जागा घेऊ नका. बाधित आहे ती.” “छे छे… मी नाही असल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवत. आणि असल्या भाकड गोष्टींवर विश्‍वास ठेवून इतक्‍या कमी रेटमध्ये हाती पडणारी मोक्‍याची जागा काही मी घालवणार नाही.’ “रागावू नका. पण आमचं सांगायचं काम होतं, ते आम्ही केलं. नंतर म्हणू नका, की यांनी असली जागा आमच्या गळ्यात मारली.’ “काही म्हणणार नाही मी. तुम्ही [...]

Continue reading...

बाप ज्ञानेश्वर

18. November 2009

2 Comments

बाप ज्ञानेश्वर

नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा झाला. त्यानिमित्तानं ही शब्दांजली… खरंतर त्या शब्दप्रभूला या अोळी वाहणं म्हणजे सोन्याच्या राशीवर मातिची चिमूट उधळणं. पण मातीची का असेना, त्यामागे भावना स्वच्छ आहेत, ही त्यातल्या त्यात अभिमानाची गोष्ट… श्री ज्ञानदेवार्पणमस्तु… जाहला अंधार, लोपला दिनकर रात्र ही भयाण दाटूनी आली मन हे व्याकूळ सापडेना सूर करावे काय आकळेना भेटलास दू, दिले आत्मभान पाहूनी प्रकाश शांतावलो समाधी बैसोनि [...]

Continue reading...

कविता स्टेटस मेसेजच्या (Updated)

12. November 2009

2 Comments

काय आहे, काही दिवसांपूर्वी ही एक सवय जडली. आपला स्टेटस मेसेज आपलाच असावा, ही त्यामागची भावना. मग सकाळी जे काही डोक्यात असेल ते खरडून ठेवायला लागलो. कधी दोन अोळी, कधी चार अोळी, कधी सहा अोळी, तर कधी एखादा शेर. मनात येईल तसं लिहिल्यामुळे या अोळींना आधी प्रेम, मग तत्वज्ञान असा कोणताही क्रम नाही. त्या त्या [...]

Continue reading...

सुखी मी आईकला भाईराया

19. October 2009

0 Comments

सुखी मी आईकला भाईराया

माझ्या आयुष्याचा शालू इनीते लखलख तुमी पांघरा बाप लेक माझ्या आयुष्याचा शालू इनीते जरतारीचा घाल शंभरावरी माज्या बापा भावायाला माज्या मायेचा गोतावळा माऊलीचा बाळ माझा ठेवणीची चंद्रकळा दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे यमद्वितीया किंवा भाऊबीज. सासरी गेलेल्या बहिणी आपल्या भावाची या दिवशी आतुरतेनं वाट पाहतात; कारण हा येणारा भाऊच त्यांना माहेरची खुशाली सांगणार असतो. म्हणूनच बहिणी दसऱ्यापासून दिवाळी इस रोज वाट पाहते तुझी रोज सावळ्या [...]

Continue reading...

बळीचं राज्य…

18. October 2009

0 Comments

बळीचं राज्य…

आपला देश, आपली संस्कृती कृतज्ञता मानणाऱ्यांची आहे. आपल्याला अन्न देणाऱ्या, दूधदुभतं देणाऱ्या, शेतावर राबणाऱ्या गाई-बैलांविषयीची कृतज्ञता बलीप्रतिपदेच्या निमित्तानं मानली जाते. आपला देश कृषीप्रधान आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याची ताकद बळीराजात आहे; पण सध्या हाच बळीराजा अवर्षण, कर्ज यासारख्या काही आस्मानी तर काही सुलतानी संकटांमध्ये बुडून गेला आहे. आपल्याला अन्न पुरवणारा बळीराजा दुःखात असेल, तर खरोखरचा [...]

Continue reading...

विष्णुपत्नी नमःस्तुभ्यं।

17. October 2009

1 Comment

विष्णुपत्नी नमःस्तुभ्यं।

आपल्याला लक्ष्मीचा वास हवा असेल, तर घरातील आळस, अस्वच्छता, कलह यांना झाडून घराबाहेर काढायला हवं. घर आरशासारखं स्वच्छ ठेऊन प्रसन्नतेनं राहायला हवं. स्वच्छ, सुंदर आणि मनानं पवित्र असणाऱ्या घरात लक्ष्मी वास करते. रात्रभर जुगार खेळण्यानं ती घरात येत नाही. प्रसन्न चित्तानं श्रम केले, तर ती आपोआपच चालत येते. त्यासाठी गृहलक्ष्मीचंही चित्त प्रसन्न असावं. घरी योग्य [...]

Continue reading...

यक्षरात्री…

16. October 2009

0 Comments

यक्षरात्री…

दिवाळीचा हा सण मांगल्याचा. नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णानं सत्यभामेच्या सहाय्यानं नरकासुराचा वध केला. ही फक्त आख्यायिकाच नाही, तर त्यात एक सुंदर दृष्टांतही आहे. या दिवशी घरातील पुरुषांनी स्त्रीयांच्या सहाय्यानं घरादाराची, आपल्या मनाची स्वच्छता करायची. मनातली सगळी जळमटं स्वच्छ करायची आणि सुविचारांचं मंगल स्नान करून उत्तम विचारांची आतषबाजी करत प्रसन्न मनानं दिवाळीला सामोरं जायचं ! यक्षरात्र… नाव वाचून [...]

Continue reading...

भेट

21. September 2009

0 Comments

भेट

“ओ दादा… कुठं निघालात एवढ्या रात्रीचे?’ अचानक आलेल्या हाकेमुळे शाम तंद्रीतून जागा झाला. रात्री मेसमध्ये जेवण झाल्यानंतर “एक चक्कर टाकून यावी,’ असा विचार करून पाय मोकळे करायला बाहेर पडलेला शाम कोणत्या तंद्रीत गेला होता, देवच जाणे… मोठ्या रस्त्यावरच्या एका नाल्यावर असलेल्या छोट्या पुलाच्या कठड्यावर बसलेल्या त्या गृहस्थांनी हाक मारली असती, तर तो असाच चालत राहिला असता… “काय? [...]

Continue reading...

लव्ह ऍट फर्स्ट साइट!

16. September 2009

9 Comments

लव्ह ऍट फर्स्ट साइट!

ती दोघं म्हणजे मेड फॉर इच अदर! त्याला ती आणि तिला तो! बास याशिवाय दुसरं काही घडूच शकणार नव्हतं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्यांनी एकमेकांना पाहिलं होतं. अगदी त्या क्षणाला त्या दोघांनाही या “मेड फॉर इच अदर’ची जाणीव झाली होती. पहिले काही दिवस चोरटे कटाक्ष, लपूनछपून पाहणे, असे नेहमीचे प्रकार झाल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीमुळे ते एकमेकांशी [...]

Continue reading...
Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro