Fantastic Five » Grid

आर्य व द्रविड संस्कृती (History of Arts #2)
This entry is part 2 of 2 in the series History of Arts

नमस्कार मित्रांनो,

या आधीच्या भागात आपण मोहोंजोदाडो संस्कृतीची माहिती घेतली. आज आपण माहिती घेणार आहोत ती आर्य आणि द्रविड संस्कृतीची. मोहोंजोदाडो संस्कृतीचा विनाश आणि आर्यांचे भारतात आगमन या दोन कालखंडांच्या मधल्या काळातील इतिहासाची फारशी माहिती मिळत नाहीये. त्यामुळे आपण थेट आर्य आणि द्रविड संस्कृतीकडे वळूयात.

असं म्हणतात की, साधारणपणे इ.स. पूर्व १५०० च्या सुमारास आर्य लोक भारतात येऊन इथे स्थायिक झाले आणि हळू-हळू गंगा आणि यमुनेच्या परिसरात पसरले. त्या काळी भारतात द्रविड वंशाचे लोक होते. या द्रविडांशी आर्यांना झगडावे लागले. या लढ्यात आर्यांचा विजय झाला असला तरी कालांतराने त्यांनी द्रविड संस्कृतीशी जुळवून घेतले.  त्यांचे द्रविडांशी व्यावहारिक संबंध निर्माण झाले. याच आर्य आणि द्रविड संस्कृतींच्या मिश्रणातूनच हिंदू धर्माचा उगम झाला. याच काळात वर्णव्यवस्था अस्तित्वात आली. हा एक महत्त्वाचा बदल मानला जातो. कर्मविपाक (अर्थात या जन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात मिळणे किंवा गेल्या जन्मात केलेल्या कर्मांचे फळ या जन्मात मिळणे) आणि पुनर्जन्म हे दोन सिद्धांत या काळात अस्तित्वाला आले. यावरच हिंदू धर्माचा पाया रचला गेला.

नव्याने उदयास आलेल्या या संस्कृतीचे विशेष असे कोणतेच कलावशेष अस्तित्वात नाहीत. त्यामुळे तत्कालीन भारताविषयी मुख्यत्त्वेकरून वेद आणि उपनिषदे यांवरून अंदाज बांधावे लागतात. या सनातन ग्रंथांमध्ये अतिशय भव्य इमारती आणि महालांची वर्णने आलेली आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी कोणतीही वास्तू आज अस्तित्त्वात नाही. यावरून प्राच्यविद्येचे अभ्यासक असा अंदाज बांधतात की तत्कालीन इमारती चिखल, वासे, आणि लाकूड यांपासून बनविलेल्या असाव्यात त्यामुळे त्या काळाच्या प्रवाहात नष्ट झाल्या असाव्यात. द्रविडांची घरे ही प्रामुख्याने लाकडाची होती. त्यांना ‘टोरा’ असे म्हणत. घुमटाच्या आकाराच्या या घरांवरून उत्तरकालीन कलावंतांना प्रार्थनामंदीरांच्या आकाराची कल्पना सुचली असावी, असे म्हणतात.

(संदर्भ- कलादर्पण)

No related posts.

भारतीय कलेचा इतिहास (History of Arts #1)
This entry is part 1 of 2 in the series History of Arts

नमस्कार मित्रांनो,

आतापर्यंत आपण रंगांची, डिझाईनची, कलेच्या मूलतत्वांची माहिती विविध मालिकांतून घेतली. ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवताना काही ठिकाणी कलेच्या इतिहासाचा किंवा प्राचीन काळातील कलेचा उल्लेख करावा लागला. त्यामुळे पुढच्या लेखमालेचा विषय ‘कलेचा इतिहास’ असाच का असू नये, असं वाटलं आणि मग या विषयाची उजळणी सुरू केली. कॉलेजमध्ये शिकताना भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन भिन्न संस्कृतींचा समावेश अभ्यासक्रमात होता. प्रत्येक कलाप्रेमीला या दोन्ही संस्कृतींची थोडक्यात ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे. सुरवातीला आपण भारतीय कलेच्या इतिहासाची माहिती घेऊ. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे ही लेखमाला म्हणजे मी शिकलेल्या किंवा अभ्यासलेल्या विषयाची ‘उजळणी’ आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आठवतील, असं नाही. त्यामुळे एखादा विषयाची अचूक माहिती तुमच्याकडे असेल तर जरूर कळवा. शेवटी Knowledge Sharing होणं हाच मुख्य उद्देश यामागे आहे. चला तर मग आजपासून भारतीय कलेच्या इतिहासाचा मागोवा घेऊयात… (लिखाणाच्या ओघात ज्या पाश्चिमात्य संस्कतींचा उल्लेख होणार आहे त्यांची माहिती आपण पाश्चिमात्य कलेचा इतिहासाचा अभ्यास करताना घेणार आहोत.)

मोहोंजोदाडो संस्कृती

जेव्हा आपण भारतीय कलेचा इतिहास असं म्हणतो तेव्हा डोळ्यापुढे येते ती मोहोंजोदाडो संस्कृती. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या आणि भरभराटीला आलेल्या मोहोंजोदाडो संस्कृतीपासून भारताच्या सांस्कृतिक इतिहासाला प्रारंभ झाला असं म्हणता येईल.

मात्र या संस्कृतीचा शोध मात्र ब्रिटीशांना मोठ्या गमतीदारपणे लागला. 1856 सालची गोष्ट. आजच्या पाकिस्तानातील एका भागात रावी नदीच्या दक्षिणेला ब्रिटीश रेल्वेचे ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी काम करत असलेल्या मजुरांना हडप्पा या गावाच्या बाहेर काही विटा आढळल्या आणि त्यांनी त्याचा वापर ट्रॅकच्या कामासाठी करायला सुरवात केली. जेव्हा त्यांनी आणखी विटांसाठी शोध घेतला तेव्हा त्यांना जमिनीखाली चौकोनी आणि आयताकृती आकाराची नक्षीकाम आणि कुठल्यातरी अगम्य भाषेत कोरिवकाम केलेल्या मुद्रा किंवा नाणी सापडली. तेथे काम करत असलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्याने ती नाणी ‘आर्कीओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेचा संचालक सर अलेक्झांडर कनिंगहॅम याच्याकडे पाठवली. जेव्हा सर कनिंगहॅमने या ठिकणाला भेट दिली तेव्हा आपण एका प्राचीन संस्कृतीने युक्त अशा पुरातन शहरावर उभे आहोत, हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही आणि मोहोंजोदाडो संस्कृतीचा शोध लागला.

या संस्कृतीचा शोध लागल्यापासून जवळजवळ ६५ वर्षांनंतर म्हणजे इ.स. १९२२ साली येथे उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून असं सिद्ध झालं की इजिप्त, मेसोपोटेमिया आणि अन्य देशांतील प्राचीन संस्कृतींची समकालीन अशी समृद्ध संस्कृती एकेकाळी भारतात अस्तित्वात होती. मोहोंजोदाडो येथे सापडलेल्या मोहरा, मूर्ती, भांडी इत्यादी गोष्टींवर सुमेरियन संस्कृतीची छाप आढळून येते. यावरून मोहोंडोदाडो येथील लोकांचा सुमेरियाशी काहीतरी व्यापारी संबंध असले पाहिजेत असं इतिहासाचे अभ्यासक म्हणतात. येथील लोक कोणत्या वंशाचे होते हे सांगणं कठीण असलं तरी हे लोक मूळ सुमेरियन वंशाचे असावेत आणि इ. स. पूर्व २५०० वर्षांच्या सुमारास ते सिंधू नदीच्या खोऱ्यात वसले असावेत असा अंदाज आहे. ही संस्कृती उत्तरेला सतलजपासून पश्चिमेला बलुचिस्तानपर्यंत पसरली होती.

सिंधू नदीकाठच्या मोहोंजोदाडो आणि पंजाबातल्या (सध्याच्या पाकिस्तानमधील) हडप्पा येथे झालेल्या खोदकामातून जो अवषेश मिळाले त्यांच्यावरून एका समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडते. या संस्कृतीच्या काळात स्थापत्यशास्त्रामध्ये मोठी कामगिरी केली गेली. या संस्कृतीच्या लोकांना सुनियोजित (Planned) इमारती बांधण्याचा छंद होता. येथील उत्खननात आढळलेल्या पक्क्या विटांच्या इमारती, पक्की गटारे, सार्वजनिक स्नानगृहे इत्यादींची योजनापूर्ण आखणी मोठी विलक्षण आहे. उत्खननात आढळलेले एक स्नानगृह तर ३९ फूट लांब आणि २३ फूट रुंद आहे. याला आपण स्नानगृहापेक्षा जलतरण तलाव (Swimming Tank) म्हटलं तरी चालेल! यामध्ये पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या केलेल्या असून पाणी भरण्याची आणि काढून टाकण्याची अतिशय सुंदर योजना इथे आढळते.

बांधकामाच्या उत्कृष्ट नमुन्यांव्यतिरिक्त इतरही अनेक कलात्मक अवशेष इथे आढळले आहे. त्यामध्ये नाणी, मोहरा, मातीची खेळणी, मातीची भांडी, दागदागिने आणि धातूच्या मूर्तींचा समावेश आहे.

खाली दिलेले छायाचित्र बघा. ही एक बैलाचे चित्र असलेली मोहोर आहे. बैलाचे रेखाटन हे इजिप्त किंवा असिरिया येथील कोणत्याही कोरीव शिल्पाइतकेच जोरकस आणि आकर्षक आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच मोहरा येथे उत्खननात सापडल्या आहेत.

आता हे दुसरे छायाचित्र पाहा. ही एक काश्यात ओतलेली नर्तिकेची मूर्ती आहे. आणि मुख्य म्हणजे ती कमालीची नाजूक आहे. या मूर्तीची उंची अवधी साडेचार इंच आहे. येथे इजिप्शियन शिल्पांमध्ये आढळणारे रेखीव रेखाटन नाही किंवा ग्रीक शिल्पांमध्ये आढळणारा मानवी शरीराचा अभ्यासही आढळत नाही. पण ज्या कोणी कलाकाराने ही मूर्ती तयार केली आहे त्याने ती तयार करताना या नर्तिकेचे वेगवान रेखाटन करून त्यात जिंवंतपणा ओतण्याचा प्रयत्न केला आहे, हे नक्की.

ज्याप्रमाणे या संस्कृतीच्या कालखंडात वास्तूकला किंवा शिल्पकला ही प्रगत होती त्याचप्रमाणे चित्रकलाही तेवढीच प्रगत होती. इथे झालेल्या उत्खननात जी नेहमीच्या वापराची भांडी सापडली त्यांवर अतिशय आकर्षक नक्षीकाम किंवा डिझाईन आढळून आले. यात प्रामुख्याने भौमितिक आकारांचा वापर दिसून येतो.

अशा या समृद्ध संस्कृतीच्या विनाशाचे कारण मात्र कळू शकलेले नाही. एक मात्र निश्चितपणे सांगता येईल की इ.स. पूर्व ३००० वर्षांच्या सुमारास जर इतकी समृद्ध संस्कृती अस्तित्वात असेल तर ती त्यापूर्वीच्या कित्येक शतकांपासून विकासाचा मार्ग आक्रमत असली पाहिजे.

Click on images for larger view.

No related posts.

छायाप्रकाश किंवा शेड अँड लाईट (Shade & light) (Fundamentals of Art #7)
This entry is part 7 of 7 in the series Fundamentals of Art

नमस्कार मंडळी,

बऱ्याच वेळा एखाद्या चित्रपटाच्या परिक्षणात आपण वाचतो की, अमुक-अमुक चित्रपटात छायाप्रकाशाचा अतिशय नयनरम्य खेळ बघायला मिळेल किंवा अतिशय सुंदर छायाचित्रण या चित्रपटात बघायला मिळते. छायाप्रकाशाचा खेळ म्हणजे नक्की काय, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल. याचं उत्तर अगदी सोपं आहे. समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर छायाप्रकाश म्हणजे सावल्यांचा खेळ आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर कलाकृतीत किंवा चित्रकृतीत नाट्य निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली प्रकाशयोजना. अशा योजनेमुळे  टू-डायमेन्शनल चित्रामध्ये त्रिमितीचा किंवा खोलीचा भास निर्माण करता येतो. फार लांब कशाला जायचं…आजकाल घराचं इंटिरियर करतानाही विशिष्ट प्रकारची प्रकाशयोजना केलेली आढळते. तर, आपण जास्त खोलात न जाता थोडक्यात या विषयाची माहिती घेऊ.

प्रकाशाशिवाय आपल्याला कोणतीही वस्तू दिसत नाही. प्रकाशामुळेच आपल्याला रंगज्ञानही होते. जेथे प्रकाश नसतो तिथे अंधार असतो हा निसर्गनियम आहे. साधारणपणे प्रकाश हा सूर्य, चंद्र, अग्नी, वीज यांपासून मिळतो. या विविध प्रकारच्या स्रोतांपासून मिळणारा प्रकाश कमी-अधिक असतो. असा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडला की आपल्या वस्तूचा आकार, घनता याची जाणीव होते किंवा त्या वस्तूचा त्रिमितीय आकार आपल्याला कळतो. उदाहरण म्हणून आपण एखादी गोल वस्तू घेऊ. ज्या बाजूने प्रकाश पडतो आहे ती बाजू उजळ दिसते तर त्याची विरूद्ध बाजू ही गडद किंवा डार्क दिसते. मात्र आकार गोल असल्याने आपल्याला एक बाजू एकदम उजळ आणि दुसरी एकदम गडद असं दिसत नाही. आपल्याला त्यामध्ये ग्रेडेशन दिसते किंवा प्रखर भागाकडून गडद भागाकडे जाताना गडदपणा वाढताना दिसतो. एखादा पांढरा चेंडू समोर ठेऊन बघा म्हणजे तुम्हाला याचा अंदाज येईल. याऐवजी एखादा चौकोनी ठोकळा समोर ठेवला असेल तर प्रकाशाच्या समोर असलेली बाजू उजळ तर त्याच्या शेजारची बाजू गडद आणि त्याच्या मागची बाजू ही आणखी गडद अशा तीनच शेड्स दिसतात.

ज्या प्रकारच्या प्रकाशामुळे आपल्याला या छायाप्रकाशाचे ज्ञान होते त्या प्रकाशाचे विविध प्रकार कोणते ते बघू.

हायलाईट (Highlight)- वस्तूवर ज्याठिकाणी सगळ्यात प्रखर किंवा तीव्र प्रकाश असेल तो भाग.

लाईट (Light) – वस्तूवर दिसत असलेला प्रकाशाचा भाग.

हाफ टोन (Half Tone) किंवा मध्यम प्रकाश – शॅडो आणि लाईट यांच्या एकत्रीकरणाने तयार झालेला भाग. हा भाग हळूहळू शॅडोमध्ये मिसळत जातो.

परावर्तित प्रकाश (Reflected Light)- जवळ जवळ असलेल्या वस्तूवरून जो प्रकाश परावर्तित होऊन त्या वस्तूवर पडतो त्याला परावर्तित प्रकाश म्हणतात. उदा. लाल रंगाच्या चेंडूशेजारी पिवळा चेंडू ठेवला असेल तर लाल चेंडूवर विशिष्ट ठिकाणी पिवळा प्रकाश तर पिवळ्या चेंडूवर विशिष्ट ठिकाणी लाल प्रकाश दिसतो. यालाच परावर्तित प्रकाश म्हणतात.

पडछाया (Cast Shadow)- जमिनीवरील एखाद्या वस्तूवर एका बाजूने प्रकाश पडला असता प्रकाशाच्या विरूद्ध दिशेला जमिनीवर त्या वस्तूची सावली पडलेली आपल्याला दिसते. प्रकाशाच्या तीव्रतेनुसार व दिशेनुसार ही सावली कमी-अधिक डार्क व कमी-अधिक अंतरावर असते यालाच पडछाया किंवा Cast Shadow असं म्हणतात.

छाया (Shade)- एखाद्या वस्तूच्या प्रकाशमान असलेल्या भागाच्या विरुद्ध भाग म्हणजे त्या वस्तूवरील छाया किंवा Shade होय.

या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला रोजच्या आयुष्यात बघत असतो. पण आता त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अभ्यासपूर्ण आणि अधिक व्यापक होईल, ही अपेक्षा.

No related posts.

िडझाईन अथवा सौंदर्याकृतीची तत्त्वे (Fundamentals of Art #6)
This entry is part 6 of 7 in the series Fundamentals of Art

आपण आतापर्यंत बघितले की कलेच्या कुठल्याही आविष्काराला काही निश्चित तंत्र किंवा पद्धत अथवा नियम असतात. या तंत्रांचे किंवा नियमांचे पालन करून जी सौंदर्याकृती निर्माण होते तिला सौंदर्याकृती किंवा डिझाईन असं म्हणतात. ही तत्त्वे कोणती ते आता बघू…

१. पुनरावृत्ती (Repetition) :

याप्रकारात तुम्ही जो फॉर्म किंवा आकार घेऊन डिझाईन तयार करू इच्छिता त्या फॉर्मची पुनरावृत्ती केलेली असते. यामध्ये त्या आकाराची गती कायम ठेवणे अपेक्षित असते. यामध्येही दोन उपप्रकार आहेत.

नियमित पुनरावृत्तीः यामध्ये ज्या आकाराची पुनरावृत्ती करणार त्या आकाराची एकसारखी, ठराविक ठिकाणी, ठराविक अंतरावर पुनरावृत्ती केलेली असते. याप्रकारच्या डिझाईनचे उदाहरण म्हणजे साडीची बॉर्डर किंवा गॅलरीच्या कठड्यांचे डिझाईन.

अनियमित पुनरावृत्ती: आपण ज्याप्रमाणे नियमित पुनरावृत्तीचे उदाहरण बघितले त्याच्या बरोबर उलट हा प्रकार. म्हणजे फॉर्म तोच; मात्र त्याची लांबी, रूंदी कमी जास्त होत असत. तसेच कमी-अधिक अंतरावर कुठेही त्या आकाराची पुनरावृत्ती केलेली असते.

२. बदल (Interchange):

डिझाईन करताना लक्षात ठेवण्याचा हा एक महत्त्वाचा घटक. एखादा विशिष्ट आकार घेऊन डिझाईन तयार करताना त्यात स्थिती, आकारमान आणि आकार या तीन घटकांमध्ये आपण बदल करू शकतो. डिझाईन इलेमेंट किंवा फॉर्म अथवा आकाराच्या दिशेचा बदल करणे (एक सुलट तर एक उलट) हा झाला स्थितीतील बदल. एक वस्तू किंवा फॉर्म मोठ्या आकाराचा तर एक छोट्या आकाराचा वापरणे हा झाला आकारमानातला बदल. आणि या दोन्ही प्रकारांच्या आकारांची पुनरावृत्ती करणे हा झाला आकारातला बदल.

३. विस्तार (Radiation):

तुम्ही लहानपणी शाळेत असताना काढलेला सूर्य आठवा. एक गोल आणि भोवताली त्यापासून निघालेली किरणे. हा ही एक विस्ताराचा प्रकार आहे. या विस्तारामध्ये बिंदूपासून, केंद्रबिंदूपासून, आंसेपासून, पायापासून आणि वक्ररेषा असे पाच मुलभूत प्रकार आहेत. खाली दिलेली आकृती बघा म्हणजे समजायला सोपे जाईल. विस्ताराची माहिती असणे ही चांगले डिझाईन तयार करण्यासाठीची आवश्यक गोष्ट आहे.

४. प्रमाण (Proportion):

कुठल्याही वस्तूला एक ठरलेला बाह्याकार (Outline) असतो. जर डिझाईनमध्ये विविध आकार किंवा फॉर्म असतील तर त्या विविध घटकांचा एकमेकांशी त्यांच्या पार्श्वभूमीशी (Background), छायाप्रकाश (Shadow-light), रंग, रेषा इत्यादी माध्यमांतून जो परस्परसंबंध किंवा संवाद तयार होतो त्याला प्रमाण किंवा Proportion  म्हणतात. अगदी सोपे उदाहरण द्यायचे तर एखाद्या माणसाचे नाक किंवा कान प्रमाणापेक्षा लहान किंवा मोठे असेल तर आपण चेहऱ्याच्या आकाराच्या मानाने प्रपोर्शन चुकले आहे, आहे असे म्हणतो. हेच प्रपोर्शनचे महत्त्व.

५. तोल (Balance):

कुठल्याही चित्रकृतीचा किंवा डिझाईनचा तोल हा रंग, आकार, रेषा यांच्या साह्याने सावरलेला असतो किंवा सावरता येतो. पाहणाऱ्याची नजर अथवा दृष्टी चित्रकृतीच्या सगळ्या भागांवरून सारखी फिरण्यासाठी हा तोल साधावा लागतो.

६. ताल (Rhythm):

यालाच लय असंही म्हणतात. ठराविक अंतराने, एकाच दिशेने उलट-सुलट वळणे घेत जाणारी वक्ररेषा  किंवा अगदी सोपं उदाहरण म्हणजे सापाचे सरपटणे किंवा उदबत्तीच्या धुराचा गतीमान मार्ग हे लय दर्शवितात. चित्राकृती अथवा डिझाईनमधले घटक अथवा फॉर्म, छायाभेद (Contrast), रंग, पोत (Texture)  यांच्या पुनरावृत्तीने (Repetition) जी रचना होते ती म्हणजे लय अथवा ताल होय.

आज इथेच थांबतो. परत लवकरच भेटू.

No related posts.

िडझाईन म्हणजे नेमकं काय? (Fundamentals of Art #5)
This entry is part 5 of 7 in the series Fundamentals of Art

नमस्कार मित्रांनो,

मी तुम्हाला मागच्या लेखात म्हणालो खरं की आपण पुढच्या लेखात सौंदर्य आणि रचनाकृतीची तत्त्वांची माहिती घेऊ; पण त्याआधी मला असं जाणवलं की चित्रकला आणि डिझाईन यांच्यात थोडी गफलत होतीये. ती दूर झाल्याशिवाय या विषयाला हात घालण्यात काही मजा नाही. त्यामुळे आज थोडं डिझाईनवर लिहितो.

कुठलीही कला घ्या. तिचे एक निश्चित तंत्र असते. मग ते नृत्य असो की चित्रकला. अशा तंत्राच्या साह्याने जी कलाकृती तयार केली जाते तिलाच सौंदर्याकृती म्हणतात. यात वापरलेल्या सगळ्या आकारांना नियम असतात. हे नियम म्हणजेच कलेची मूलतत्वे किंवा Fundamentals of Art. कलाकृतीच्या सौंदर्यात या मूलतत्त्वांमुळे वाढ होते. एक गोष्ट इथे स्पष्ट करणे गरजेची आहे - ती म्हणजे डिझाईन म्हणजे चित्रकला नव्हे. डिझाईन तयार करताना कलाकाराला चित्रातल्याप्रमाणे कल्पनेच्या भराऱ्या मारता येत नाहीत. या आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे डिझाईनमध्ये भौमितीक आकार किंवा निसर्गात आढळणाऱ्या नैसर्गिक आकारांचा वापर केलेला आढळतो. डिझाईनचा उपयोग मुख्यत्वे करून शोभेसाठी किंवा सजावटीसाठी केला जातो. तुमच्यापैकी कोणी इंटिरियर डिझायनर असेल तर त्यांनी ही गोष्ट अनुभवली असेल.

दररोजच्या वापरातील वस्तू सुशोभित करण्याची ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आढळते. थोडासं कलेच्या इतिहासात डोकावून बघितलं तर अगदी प्राचीन काळी मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनात वापरायच्या गोष्टी डिझाईनच्या साह्याने सुशोभित केलेल्या आढळल्या आहेत. मोहोंजोदाडो येथे उत्खननात आढळलेले मातीचे भांडे काय किंवा प्राचीन ग्रीस मध्ये वापरले जाणारे मातीचे भांडे काय ही डिझाईनच्या वापराचीच उदाहरणे आहेत.

आपल्या भारतीय इतिहासात डोकावले तर अशा प्रकारच्या फार डिझाईनचा फार मोठा खजिना तुम्हाला आढळून येईल. तुमच्या-माझ्या पूर्वजांनी तर अगदी केस विंचरायची फणी, अडकित्ता, कंगवा अशा गोष्टींपासून ते पार पाळणा, पलंग, पेट्या, घराच्या जाळ्या, खिडक्या, दरवाजे इथपर्यंत सर्वंच गोष्टी सुंदर अशा डिझाईनने सुशोभित केलेल्या तुम्ही बघितल्या असतील. जर बघितल्या नसतील तर पुण्यातल्या केळकर म्युझियमला नक्की भेट द्या. आपल्या पूर्वजांचा कलेचा वारसा इथे उत्तम प्रकारे जतन केलेला तुम्हाला आढळेल.

आपल्या भारतीय कलावंतांनी अक्षरशः कुठलीही वस्तू सुशोभित करायची सोडलेली नाही. आजही एखाद्या खेड्यात गेलात तर तिथे सुंदर डिझाईनच्या अनेक गोष्टी बघायला मिळतील. राजस्थानातील छोटी गावं म्हणजे तर अशा डिझाईन्सचा खजिनाच आहे. नक्षीकाम किंवा कलाकुसर हे भारतीय लोकजीवनाचा फार पूर्वीपासून अविभाज्य अंग बनले आहे. मात्र याचा थोडा अभ्यास केला पाहिजे. राजस्थानी डिझाईनची शैली वेगळी. मुगल साम्राज्यातली शैली वेगळी. महाराष्ट्रातली शैली वेगळी. राजपूत शैली वेगळी. पुढे वेळ मिळाला तर आपण या सगळ्या शैलींची जरूर माहिती घेऊ. पण तुम्हाला शक्य असेल तर इंटरनेटच्या साह्याने तुम्हाला या विविध शैलींची उदाहरणे जरूर बघा. फार लांब कशाला जायला हवं. तुमच्या- माझ्या घरी आपण ज्या

रांगोळ्या बघतो त्या म्हणजे डिझाईनचे उत्तम उदाहरण आहेत. ही रांगोळ्यांची डिझाईनही प्रांत बदलतो तशी बदललेली तुम्हाला आढळतील.

डिझाईन शिकण्यासाठी निसर्गाचा अभ्यासही अत्यंत गरजेचा आहे. निसर्गातील अनेक फुले, फळे, लता-वेली, पाने, पशू-पक्षी इत्यादी गोष्टी म्हणजे डिझाईनचे बहुमोल भांडार आहे. पण हा खजिना लुटण्याचेही एक तंत्र आहे. डिझाईनमध्ये वस्तूचे रेखाटन वास्तवदर्शी म्हणेजे निसर्गाच जशी ती वस्तू आपल्याला दिसते तसे करायचे नसते. तर त्या वस्तूच्या आकाराचे नक्षीत रुपांतर करायचे असते. वस्तूतील अनावश्यक गोष्टींना काट मारून साधे सरळ असे रेखाटन किंवा डिझाईन तयार करण्यासाठी डिझायनरचा कस लागतो आणि मग त्यापासून सौंदर्याकृती निर्माण होते. या सौंदर्याकृतीच्या रचनेची तत्त्वे आपण पुढच्या भागात बघू.

तोपर्यंत प्रतिक्रिया देण्यास विसरू नका.

No related posts.

संकल्पचित्र निर्मिती (Fundamentals of Art #4)
This entry is part 4 of 7 in the series Fundamentals of Art

नमस्कार मित्रांनो,

आतापर्यंत आपण रंग, रेषा आकार या चित्रकृतीसाठी लागणाऱ्या काही एलिमेंट्सची माहिती घेतली. यातीलच पुढचा; मात्र थोडा वेगळा भाग म्हणजे कॉम्पोझिशन (Composition). याला डिझाईन किंवा संकल्पचित्र असंही म्हटलं जातं.

एक गोष्ट इथे मुद्दाम सांगतो, की ही जी माहिती आपण घेतो आहोत ही अगदी बेसिक माहिती आहे. कला महाविद्यालयाच्या प्रथम (Foundation) वर्षाला ही शिकवली जाते. पण ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याने इथे सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतोय.

वेगवेगळे आकार, रेषा (यालाच पूर्वी अलंकार असेही म्हणायचे) आणि रंग यांच्या साह्याने एखादा कलाकार किंवा चित्रकार एखादा विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेऊन बघणाऱ्यांच्या डोळ्यांना आनंद देणारी, सुखद वाटणारी कलाकृती निर्माण करतो. या कलाकृतीला संकल्पचित्र म्हणतात. कल्पना किंवा भावना यांना संकल्पचित्रात खूप महत्त्व असते. साधारणपणे संकल्पचित्राचे चार प्रकार मानले जातात.

नैसर्गिक (Natural): निसर्गात आढळणाऱ्या विविध आकारांचा (उदा. पाने, फुले, पक्षी, झाडे, फळे इ.) वापर या प्रकारच्या चित्रात केलेला आढळतो. म्हणजे अगदी पानासारखं पान आणि फुलासारखं फुल असं नाही तर, हे नैसर्गिक आकार डोळ्यापुढे ठेऊन त्यांच्या साह्याने सुसंबद्ध असा आकार किंवा Form तयार करून या प्रकारचे संकल्पचित्र केले जाते. यामध्ये मूळ आकारापासून फार फारकत घेतलेली नसते आणि रंगही शक्यतो निसर्गात असल्याप्रमाणेच वापरतात. त्यामुळे रंगसंगतीचा विचार दुय्यम समजला जातो.

भूमितीय (Geometrical): नैसर्गिक आकारांचे भूमितीय आकारात रुपांतर करून किंवा भूमितीय उपकरणांच्या साह्याने तयार केलेल्या आकारांच्या मांडणीला भूमितीय संकल्पचित्र असं म्हणतात. यामध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, आयत, अर्धगोल अशा विविध भूमितीय आकारांचा वापर केलेला आढळतो. अत्यंत आकर्षक अशा रंगसंगतीचा वापर करून अतिशय मनोवेधक, सुंदर संकल्पचित्र यापासून तयार करता येते.

अलंकारिक (Decorative): निसर्गात आढळणाऱ्या विविध आकारांना कल्पनेची जोड देऊन, गतिमान रेषांचा वापर करून केलेल्या आकारांच्या मांडणीला अलंकारिक संकल्पचित्र म्हणतात. या प्रकारचे उदाहरण म्हणजे मेंदीच्या डिझाईनचे किंवा जुन्या काळातल्या राजपूत किंवा मुघल शैलीच्या चित्रांचे घेता येईल.

अमूर्त (Abstract):  या प्रकारची निश्चित अशी व्याख्या करता येणे अवघड आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांना न जाणवणारा गोष्ट म्हणजे अमूर्त. अशा अमूर्त गोष्टीचा आपण जो आकार ठरवू त्याला अमूर्त आकार असे म्हणता येईल. (Abstract art uses a visual language of form, color and line to create a composition which may exist with a degree of independence from visual references in the world.) अमूर्त संकल्पचित्र म्हणजे नैसर्गिक, भूमितीय, अलंकारिक  यापैकी कोणताही आकार न वापरता वेगळाच आकार वापरून जेव्हा चित्रकार त्याच्या कल्पनाविलासाने, त्याला ते आकार जसे भावतील त्याप्रमाणे चित्रात त्यांची रचना करतो तेव्हा त्या संकल्पचित्राला अमूर्त संकल्पचित्र असे म्हणतात. यामध्ये रचना किंवा कॉम्पोझिशन आणि रंगसंगती यांना विशेष महत्त्व आहे.

हे झाले संकल्पचित्राचे चार प्रमुख प्रकार. संकल्पचित्राची रचना करताना समतोल, ताल, रेषेची गतिमानता आणि विस्तार, आकारांची-रंगांची पुनरावृत्ती, प्रमाण किंवा प्रपोर्शन या तत्वांचा योग्य वापर करणे गरजेचे असते. या तत्वांची माहिती आपण पुढील काही भागांत घेणारच आहोत. आज इथेच थांबतो. लवकरत भेटू. तोपर्यंत प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

No related posts.

कन्फेशन्स ऑफ ए शॉपाहोलिक
नमस्कार मंडळी…

कालचीच घटना. सहकुटुंब एका मोठ्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेलो होतो. आतापर्यंतचा अनुभव असा की, अशा ठिकाणी खरेदीसाठी गेलो की अनावश्यक (असं आता वाटतंय) खरेदी झालीच म्हणून समजा… पण काल प्रथमच आश्चर्य घडलं आणि मी चक्क काहीही अनावश्यक खरेदी न करता बाहेर पडलो. इथे मुद्दाम ‘मी’ असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे माझी अर्धांगिनी पैसे खर्च करण्यापेक्षा साठवण्याच्या मागे जास्त असते. तर, काल मी कोणतीही अनावश्यक खरेदी केली नाही, ही गोष्ट तेव्हा माझ्या लक्षात आली नाही. घरी गेल्यावर बायकोने लक्षात आणून दिल्यावर माझं मलाच आश्चर्य वाटलं. रात्री झोपेचं खोबरं झालंच, पण रात्रीच्या अंधारात बऱ्याच गोष्टींवर प्रकाशही पडला. हे घडलं तरी कसं? हे तुमच्याबरोबर शेअर करावसं वाटलं, म्हणून आजचं हे लेखन. पण त्यासाठी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जायला हवं.

आमचं कुटुंब मध्यमवर्गीय. चौकोनी. आई, बाबा, मी आणि धाकटा भाऊ. आई-वडील दोघेही उत्तम कंपन्यांत नोकरी करणारे. त्यामुळे कधीही कुठलीही गोष्ट कमी पडली नाही. पण एखादी गोष्ट घेताना एवढी महागाची गोष्ट कशाला घ्यायची? ही त्यापेक्षा स्वस्त गोष्ट घेतली म्हणून काय बिघडलं, हा विचार हमखास होत असे. पुढे कॉलेज सुरू झालं आणि संपलंही. तिथेही याचीच पुनरावृत्ती. त्यामुळे आपल्या आई-बाबांनी आपल्याला कधीच महागाची वस्तू आणून दिलेली नाही, हे कुठेतरी मनात राहिलं असावं. मित्रांकडे व्हिडिओ गेम्स होत्या पण मला आणि भावाला मात्र व्हिडिओ गेम कधीही खेळायला मिळाले नाही. खेळण्यासाठी कार मिळाल्या; पण त्या रिमोट कंट्रोलवाल्या नव्हत्या. घरात रंगीत टिव्ही पण होता पण तोही २१ इंची; पंचवीस इंची नव्हता.

कॉलेज लाईफ संपलं आणि एका उत्तम कंपनीत नोकरी सुरू झाली. सुरवातीला काही वर्ष बेताचाच पगार होता. यथावकाश त्यात वाढ होत गेली. लग्न झालं. बायकोदेखील नोकरी करणारी. त्यामुळे पगारात नुसती बेरीजच होत गेली. आई-बाबांनी कधीच क्रेडिट कार्ड घेतलं नव्हतं. त्याचा बदला म्हणून म्हणा पण दोन क्रेडीट कार्डही आली. होता-होता प्रमोशन झालं.. दुपटीने पगार वाढला. परदेशवारी झाली. क्रेडीट कार्डची संख्या आणि त्यावरचं क्रेडिट लिमिटही दुप्पट झालं. एकंदरीतच काय तर आठ तासाची नोकरी सोडली (इथेही कष्ट असे नव्हतेच; कारण नेहमीचं सिस्टीमॅटिक काम. आपण नाही केलं, तरी दुसरं कोणीतरी करणारं असतंच!) तर बाकी काही कष्ट न पडता भरपूर पैसा हातात येऊ लागला.

सर्वसाधारणपणे जे आपल्याला आपल्या लहानपणी मिळालं नाही, ते आपण आपल्या मुलांना कमी पडू द्यायचं नाही असं मनात असल्यानं मुलीसाठी पहिल्यापासूनच सगळं काही आणण्याची हौस पुरवत गेलो. तिला खेळता येत नाही, हे माहित असूनही रिमोटच्या कारची खरेदी झाली. स्वतःसाठीही भरपूर खरेदी केली. नवीन घड्याळ आलं की लगेच बदललं. नवीन कुठला मोबाईल दिसला की घेतला, हे असं सुरू होतं. बायको सारखी सांगत होती की, ही उधळपट्टी करू नका. त्यापेक्षा आपण कुठेतरी पैसे गुंतवू… पण त्यावर आमचं उत्तर - मी कमावलेल्या पैशांचा मलाच उपभोग घेता आला नाही तर त्याचा काय उपयोग? आणि आत्ता धडधाकट असताना उपभोग घ्यायचा नाही, तर मग काय म्हातारपणी घ्यायचा? यावर बिच्चारी बायको काय बोलणार?

असो. तर तुम्हाला यावरून माझ्या लाईफस्टाईलचा अंदाज आला असेल. पण नोकरी म्हणजे शेवटी रूटीन. कंटाळा आला…म्हटलं एखादा बाहेरचा जॉब करूयात. आमच्या ऑफिसमधल्या एका सहकाऱ्यांच्या ओळखीने एक कन्सल्टिंगचं काम घेतलं. इंटरेस्टिंग काम होता. पण जस जसं काम पुढे-पुढे जायला लागलं तसं कामाचा ताणही वाढायला लागला. कधी कधी त्रासही व्हायला लागला. रात्रीची जागरणं व्हायला लागली. कधी-कधी पहाटे लवकर उठून काम करायला लागलं. शेवटी काम उत्तमरित्या पूर्ण झालं. ठरल्याप्रमाणे मोबदलाही मिळाला. आणि त्या आनंदात आम्ही कुटुंबिय खरेदीला गेलो…

(इथे फ्लॅशबॅक संपला….)

ठरल्याप्रमाणे ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या घेतल्या आणि सवयीने माझी पावले इलेक्ट्रॉनिक्स सेक्शनकडे वळली. एक काम झालं नव्हतं तर मला बॅकअपसाठी एक टेराबाईट एक्स्टर्नल युएसबी हार्डडिस्कची गरज भासायला लागली. (मजा आहे ना? सगळं मिळून डॉक्युमेंट्सची साईज जेमतेम पाच ते सहा जीबी असेल). एका हार्डडिस्कची निवड केली…किंमत होती ७८०० रुपये (फक्त!).

… आणि इथून पुढे जे घडलं ते नवलंच. मनात विचार आला, च्यायला ही हार्डडिस्क घेण्यापेक्षा आठ जीबीचा पेनड्राईव्ह घेतला तर काय बिघडलं? आपलं काम तर होतंय. लागलं तर हार्डडिस्क नंतर घेता येईल. आणि ७८०० रुपये म्हणजे मुलीची एका वर्षाची फी झाली. हा विचार करताच मी निर्णय बदलला. आठशे रुपयांचा आठ जीबीचा पेनड्राईव्ह घेतला आणि बाहेर पडलो.

जेव्हा बायकोने ही गोष्ट लक्षात आणून दिली तेव्हा समजलं की बाहेरचं काम करताना जे काही कष्ट झाले त्याचंच रुपांतर हा विचार मनात येण्यात झालं. कष्टाच्या पैशाचं मोल कशाला म्हणतात, ते काल मला खऱ्या अर्थाने कळालं असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि मग काय विचारता आतापर्यंत केलेले सगळे अनावश्यक खर्च आणि ते केले नसते तर किती पैसै वाचले असते हे सगळं डोळ्यांसमोरून फिरायला लागलं. कुठे तोंड लपवावं हे ही कळेनासं झालं. चेष्टेचा भाग सोडा, पण असा विचार करायला सुरवात होणं ही एका चांगल्या गोष्टीची सुरवात म्हणायला काहीच हरकत नसावी नाही का? एखादी गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्यागोष्टीचा आपल्याला खरंच गरज आहे का केवळ चैनीपोटी आपण ती गोष्ट घेतोय आणि त्या वस्तूच्या किंमतीत आपल्याला गरजेची कोणती वस्तू येते, एवढा विचार जरी प्रत्येकाने केला तरी या लिखाणाचं सार्थक होईल….

कृपया तुमचीही मतं नोंदवा..

(Confessions of a Shopaholic हा याच विषयावर आधारित एक हॉलिवूडपट. गेल्या मार्चमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट जमल्यास नक्की पाहा.)

No related posts.

आकार किंवा फॉर्म (Fundamentals of Art #3)
This entry is part 3 of 7 in the series Fundamentals of Art

नमस्कार मंडळी,

आजचा विषय वरवर सोपा वाटला तरी तो समजायला मात्र तितकासा सोपा नाही. याचे एक कारण मराठी भाषाही असू शकेल, कारण बरेच अवघड शब्द आज वापरायला लागणार आहेत. अर्थात गरज भासेल तिथे इंग्रजीचा आधार घेऊच. चला तर मग, आज आपण आकार किंवा फॉर्म म्हणजे काय याची माहिती घेऊ.

कसं बरं सांगू? आकार ही संकल्पना थोडी काल्पनिक आहे, असं म्हणालात तरी हरकत नाही… कारण तुम्हाला माहित आहे की, शब्दाला आकार नसतो. पण कवी हा त्याच्या मनातील कल्पनांच्या साह्याने त्या शब्दांना किंवा कवितेला आकार देतो. आवाज किंवा सूर यांनाही आकार नसतो. पण जेव्हा पं. भीमसेन जोशींसारखा शास्त्रीय संगीत गाणारा गायक षड्ज लावतो तेव्हा त्या सूराला किंवा आवाजालाही एक आकार प्राप्त होतो. या सगळ्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. प्रत्येकाला त्यातून सारखाच आकार किंवा फॉर्म दिसेल असं नाही. तो प्रत्येकाला वेगळाही दिसू शकतो.

व्हिज्युअल आर्टच्या बाबतीत विचार करताना मात्र हा आकार दृश्य स्वरूपात प्रकट होतो. उदाहरणार्थ चित्रकार हे रंग आणि रेषेच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनेला आकार देतात. वेगवेगळ्या प्रकारच्या रेषांच्या मिश्रणाने चित्रकार वेगवेगळे आकार तयार करतात. रेषांना विशिष्ट आकार देऊन त्या आकारांद्वारे चित्रकार स्वतःच्या कल्पना व भावना चित्रात उतरवत असतो. वास्तूरचनाकार दगड, विटा, सिमेंट यांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पना साकार करतात.

या आकारांना विशिष्ट स्थान मिळाले किंवा या आकारांची विशिष्ट पद्धतीने रचना केली की, त्यांच्यातून विविध अर्थ प्रकट होऊ लागतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, जेव्हा चित्रातील अनेक आकारांमध्ये एक विशिष्ट परस्परसंबंध साधला जातो तेव्हा ते चित्र आपल्याशी बोलू लागते. अशा विविध आकारांची कौशल्यपूर्ण योजना करून अपेक्षित परिणाम साधणे, हीच चित्रकाराची खरी कसोटी असते. अर्थात हे अर्थही बऱ्याचवेळा व्यक्तीसापेक्ष असतात. या आकारांना रंगांची जोड मिळाली की, ते आकार अक्षरशः बोलू लागतात. त्यामुळे एखाद्या चित्रकृतीत आपले लक्ष आकार व रंग यांच्यावर खिळून राहते आणि त्यातून भावना निर्माण होते.

चित्रामध्ये या आकारांचा समतोल असणे फार महत्त्वाचे असते. समतोलाचे प्रकार आपण पुढच्या भागात बघू. उत्तम चित्रकृती त्यालाच म्हणतात की, ज्या चित्रात असे काही काम्पोझिशन केलेली असते की पाहणाऱ्याची दृष्टी ही संपूर्ण चित्रावर फिरते…चित्राचा एखादा भाग किंवा आकार इतर आकारांच्या मानाने अधिक उठावदार किंवा लक्षवेधक झाला तर पाहणाऱ्याचे लक्ष तिथेच खिळून राहते व चित्रातल्या बाकीच्या आकारांकडे दुर्लक्ष होते. परिणामी अपेक्षित परिणाम साधण्यात ते चित्र कमी पडते.

आकार म्हणजे व्याप्ती. मग ती द्विमितीय असो किंवा त्रिमीतीय असो. आकारामुळे त्या जागेला मर्यादा पडतात. या मर्यादा किंवा मर्यादा घालणाऱ्या बाह्यरेषा (Outline) म्हणजेच आकार. या आकाराचे ज्ञान आपल्याला त्याची लांबी, रुंदी, जाडी, खोली, दिशा यामुळे होते. एखादी वस्तू ही तीन फूट लांब, दीड फूट रूंद दोन फूट जाड असल्याचे सांगितल्यावर आपल्याला त्या वस्तूचा आकार कळतो.

या आकारांच्या साह्यानेच आपण चित्राची निर्मिती करतो, द्विमिती किंवा त्रिमितीचा भास निर्माण करतो. यांच्या साह्यानेच संकल्पचित्राची निर्मिती होते. संकल्पचित्र म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते, हेही आपण पुढच्या काही भागात बघू. बस्स. आज इथेच थांबतो… लवकरच भेटू… आणि हो, प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

No related posts.

रेषांचे प्रकार (Fundamentals of Art #2)
This entry is part 2 of 7 in the series Fundamentals of Art

नमस्कार दोस्तांनो,

डिझाईन एलिमेंट्सपैकी पहिले महत्त्वाचे एलिमेंट म्हणजेच रेषा किंवा लाईन. आजच्या या पोस्टमध्ये आपण रेषेविषयची माहिती घेऊ. सुरवात थोडी बाळबोध वाटणे शक्य आहे, पण ती टाळताही येत नाहीये.

रेषा म्हणजे काय?

रेषेची निर्मिती ही बिंदूंपासून होते. अनेक बिंदू एकापुढे एक मांडले की त्यापासून रेषा अथवा लाईन तयार होते. रेषा ही मुख्यत्वे आकार दाखवते. रेषेमुळेच आपल्याला खोली, लांबी यांचे ज्ञान होते. आकाराशिवाय कोणत्याही प्रकारच्या चित्रकृतीची निर्मिती होत नसल्याने रेषा हा चित्रकृतीचा आविभाज्य घटक आहे. आपला रेषेकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी साधा असतो. रेषेकडे आपण साधी रेषा किंवा लाईन म्हणून बघतो. पण रेषेलाही सौदर्य असते. तिच्यापासून भावनाही निर्माण होतात. कोणत्या प्रकारे रेषा काढली आहे त्याप्रकारे तिच्यापासून भावाविष्कार होते.

रेषेचे अनेक प्रकार आहेत. बारीक रेषा, जाड किंवा ठळक रेषा, तिरकी रेषा, लंब रेषा, समांतर रेषा, नागमोडी रेषा, वर्तुळाकार रेषा, एकमेकांना छेदणाऱ्या रेषा इ. या सर्व रेषांच्या प्रकारांतून विविध आशय व्यक्त होतात.

बारीक रेषा किंवा नाजूक रेषा- ही रेषा नाजूक किंवा कोमल भाव दर्शविते. (उदा. पद्मपाणी बुद्धाच्या हाताचे रेखाटन, किंवा स्त्रीच्या डोळ्याचे रेखाटन)

ठळक किंवा जाड रेषा – या प्रकारच्या रेषेतून शक्ती किंवा सामर्थ्य व्यक्त करता येते.

उभी रेषा- या प्रकारच्या रेषेतून रूबाब, ताठा व्यक्त होतो. त्याचबरोबर स्थिरपणा, निश्चलपणा, शांतता इत्यादी भावही व्यक्त होतात.

आडवी रेषा किंवा क्षितीज रेषा- ही रेषा म्हणजे जमिनीला समांतर असलेली रेषा. विश्रांती, शांततास निर्जीवता, निश्चलता, निश्चिंतता इत्यादी भाव या रेषेतून व्यक्त होतात.

तिरकी रेषा- या प्रकारच्या रेषांच्या वापराने हालचाल किंवा गती दाखवता येते. ही रेषा म्हणजे चैतन्याचेही प्रतिक मानली जाते. जिवंतपणा, अस्थिरता इत्यादी गोष्टीही या प्रकारच्या रेषेतून दिसतात.

वरच्या बाजूने वाकलेली रेषा- आपण मान खाली कधी घालतो?  जेव्हा आपण निराश होतो किंवा दुःखी असतो तेव्हा किंवा थकलेलो असतो तेव्हा किंवा जेव्हा आपण एखाद्यापुढे आदराने नतमस्तक होतो तेव्हा. अगदी नेहमीच्या पाहण्यातलं उदाहरण म्हणजे एखाद्या वृद्ध माणसाची काठी. या प्रकारच्या रेषेमुळेही दुःख, निराशा, लाचारी, थकवा किंवा नम्रता हे भाव प्रतित होतात.

एकमेकांना छेदणाऱ्या रेषा- एखाद्याच्या घरात लावलेल्या किंवा एखाद्या ऐतिहासिक सिनेमात भिंतीवर लावलेल्या दोन तिरक्या तलवारी आठवतात का? त्या म्हणजे या प्रकारच्या रेषांचे प्रतिक होय. युद्ध, गोंधळ, तिरस्कार, गुंता, संघर्ष इत्यादी गोष्टी या प्रकारच्या रेषेपासून दाखवता येतात.

लयदार रेषा- एखादा दगड शांत पाण्यात टाकल्यावर उठणाऱ्या रेषा किंवा सरपटणारा साप हे या प्रकारच्या रेषेचे उदाहरण म्हणून घेता येईल. अगदी समुद्राच्या लाटा किंवा कारंज्यातून उडणाऱ्या पाण्याच्या रेषा यांचे उदाहरणही घेता येईल. आनंद, उत्साह, खेळकर वृत्ती, तारुण्य, लवचिकपणा, लय इत्यादी गोष्टी या प्रकारच्या रेषांपासून दाखवल्या जातात.

हे झाले रेषेचे विविध प्रकार. या विविध प्रकारच्या रेषांपासून निरनिराळे आकृतीबंध किंवा आकार निर्माण होतात. त्यांची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ.

No related posts.

कलेची मूलतत्त्वे (Fundamentals of Art #1)
This entry is part 1 of 7 in the series Fundamentals of Art

नमस्कार मित्रांनो,

‘कलर्स’ या विषयानंतरची ही दुसरी मालिका. ‘कलर्स’ हा विषय तुमच्यापुढे मांडताना माझीही रिव्हिजन झाली आणि चांगला अभ्यासही झाला. हा विषय मांडताना लक्षात आलं की केवळ रंग हा विषय पुरेसा नाही. चित्रकलेचं किंवा व्हिज्युअल आर्टचं रंग हे एक अंग झालं. मग इतर अंग कोणती, असा विचार मनात आला आणि त्यातून या मालिकेचा विषय सुचला. एखादं चित्र चांगलं की वाईट, हे कसं ठरवायचं? बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की, अमूर्त शैलीत काम करणाऱ्या पाब्लो पिकासोसारख्या चित्रकाराला एवढी प्रसिद्धी का मिळते? त्याच्या चित्रात असं काय आहे की, त्या चित्रांना कोट्यवधी रुपये किंमत यावी? मूर्त (रिएलिस्टिक) आणि अमूर्त (अब्स्ट्रॅक्ट) शैलीत नेमका हाच फरक आहे. चित्रकलेच्या सगळ्या अंगांची - म्हणजे रंग, रंगसंगती, छटा, आकार, रेषा, कॉम्पोझिशन, टेक्शर अादींची माहिती नसेल तर तुम्हाला अमूर्त शैलीतले चित्र उमजणार नाही; म्हणून भावणार नाही. त्याचवेळी एखादं रिएिलस्टिक चित्र तुमच्यासमोर ठेवलं तर ते तुम्हाला चांगलं वाटेल; कारण ते भावण्यासाठी चित्रकलेच्या सगळ्या अंगांची माहिती असणं आवश्यक नसतं.

आणखी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एखाद्या छान हिंदी किंवा मराठी गाण्याचं उदाहरण घेता येईल. एखादं विशिष्ट गाणं आपल्याला का आवडतं? कारण त्यामागे शब्द, संगीत, म्युझिक अॅरेंजमेंट, कोरस, साईड रिदम, गायकाचा आवाज इत्यादी सपोर्टिंग एलिमेंट्स असतात. या साऱ्यांच्या एकत्रित परिणामामुळे ते गाणं आपल्या मनात घर करतं, ओठी बसतं. कुठलीही कला घ्या - जोपर्यंत ती आपल्या मनाला भावत नाही तोपर्यंत ती आपल्याला आवडत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला त्यातल्या एलिमेंट्सची माहिती होत नाही, तोपर्यंत हे भावणं अवघड आहे.

आपण इथे आजपासून चित्रकलेच्या विविध अंगांची, एलिमेंट्सची माहिती घेणार आहोत आणि जमलंच तर थोड्या कलेच्या इतिहासाचीही. मला कॉलेजमध्ये अभ्यासाला असलेला हा विषय सोप्या भाषेत तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्तापर्यंत तरी मराठीत कुठल्या साईटवर ही माहिती उपलब्ध असलेली मला आढळली नाही. तुम्हाला कोणाला माहित असेल तर नक्की कळवा. या चित्रकलेच्या एलिमेंट्सची माहिती मिळाली की, तुम्हासुद्धा कोणत्याही चित्रकृतीचा रसास्वाद घेऊ शकाल. ही एलिमेंट्स फक्त चित्रकलेशी संबंधित आहेत असं नाही, स्थापत्यशास्त्र किंवा वास्तूशास्त्र (Architecture), इंटेरिअर डिझाईन, लँडस्केपिंग इत्यादी बऱ्याच कलांमध्ये ही मूलतत्वे आणि त्यांचे नियम सारखेच असतात.

कुठल्याही व्हिज्युअल आर्टमध्ये खालील एलिमेंट्स महत्त्वाची असतात.

रेषा (Line) व तिचे प्रकार

आकार (Form)

कॉम्पोझिशनचे किंवा रचनेचे प्रकार

प्रमाण (Proportion)

तोल (Balance)

ताल (Rhythm)

प्रकाश (Light), छटा (Shade)

पोत (Texture)

यासोबत भारतीय आणि पाश्चिमात्य कलेच्या इतिहासाचीही आपण अधून-मधून माहिती घेणार आहोत.

पुन्हा लवकरच भेटू…

No related posts.