चित्रकला शिकण्यासाठी पाच बेसिक टिप्स (Tips)

Tue, Jun 2, 2009

Fantastic Tips

चित्रकला शिकण्यासाठी पाच बेसिक टिप्स (Tips)

मित्रहो नमस्कार,

तुमच्यापैकी काही जण व्यवसायाने चित्रकार असतील; तर काही उत्तम चित्रकार असतील. पण छंद किंवा आवड म्हणून चित्रकला जोपासणारे किंवा जोपासू इच्छिणारे अनेक जण असतील. खरं सांगतो, चित्रकला हा अतिशय आनंद देणारा असा छंद आहे. तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट तुम्ही कागदावर साकार करू शकता. हा छंद महागडा तर मुळीच नाही. फक्त एक कागद आणि पेन्सिल किंवा पेन या दोनच गोष्टी असल्या तरी पुरे. काही बेसिक माहिती असली तर तुम्ही तुमचा हा छंद चांगल्यापैकी वाढवू शकता. चित्रकला ही आवड, छंद म्हणून जोपासणाऱ्या मित्रांसाठी या काही खास टिप्स..

  • चित्रकला शिकताना सुरवातीला विविध आकारांचा सराव करणे फार गरजेचे आहे. उदा. गोल, अर्धगोल, आडव्या उभ्या तिरप्या रेषा इत्यादी. या बेसिक आकारांपासूनच अवघड आकार तयार होतात. हे आकार अधिकाधिक अचूक काढण्यावर भर ठेवा.
  • वर सांगितल्याप्रमाणे या सर्व बेसिक आकारांपासूनच तुमच्या चित्राचा पुढचा भाग आकाराला येत असल्यामुळे हे सर्व आकार जास्तीत जास्त फिक्कट (Light) (पेन्सिलवर कमीत कमी दाब देऊन) काढण्याची प्रॅक्टीस करा. या प्रकारे ड्रॉईंग करता येणे फार गरजेचे आहे.
  • हे बेसिक आकार काढताना काही अडचणी आल्या, किंवा आकार बरोबर येत नाहीयेत असं जाणवले तर शेप टेम्पलेट्सचा वापर करा. अशा टेम्पेट्स मार्केटमध्ये ड्रॉइंग मटेरियल मिळणाऱ्या दुकानात उपलब्ध आहेत.
  • मनुष्याकृती किंवा फिगर डॉईंग करताना अधिक सरावाची गरज भासते. अशा वेळी नाक, कान, ओठ अशा तुलनेने सोप्या आकारांपेक्षा हाताचा पंजा, ड्रेपरी इत्यादी अवघड आकारांचा सराव करण्याकडे भर द्या. अशा प्रकारचा सराव कराल तितका कमी आहे. त्यामुळे या सरावाला कोणत्याही प्रकारची मोजपट्टी लाऊ नका.
  • सरावासाठी शक्य असेल तितक्या चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा वापर करा. त्यामुळे डॉइंगपण चांगले होते आणि वैतागही येत नाही. (उदा. जर तुम्ही वापरत असलेल्या खोडरबरामुळे कागद फाटत असेल किंवा नीट खोडले जात नसेल तर तुम्ही वैतागणारच.) शक्य असेल तर डॉईंगसाठी क्लच पेन्सीलचा वापर करा. साध्या पेन्सीलीला वारंवार टोक करण्याचा त्रास वाचतो.

शेवटी कितीही झालं तरी चित्रकला ही व्यवसाय म्हणून स्विकारणं आणि छंद म्हणून जोपासणं यात फारच फरक आहे. वर दिलेल्या टिप्स या फक्त छंद म्हणून चित्रकला जोपासणाऱ्यांसाठी आहेत. त्यांचा नक्की फायदा होईल असा विश्वास आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

No related posts.

, ,

This post was written by:

Grid - who has written 29 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro