ईमेल म्हणजे भन्नाट! मित्रकंपनी काय फॉरवर्ड करेल काही सांगता येत नाही. 98% फॉरवर्ड तर मी न बघता डायरेक्ट डिलीट करतो. पण कधी-कधी अत्यंत वाचनीय, परिणामकारक असे काही या फॉरवर्डस् मध्ये वाचायला मिळते. आज मला आलेले हा असाच एक ‘वाचलाच पाहिजे’ या सदरातला एक फॉरवर्ड. IIM बंगळुरू मधील एका प्राध्यापकमहोदयांनी दिलेले हे सुंदर लेक्चर. स्पर्धा किती अनपेक्षीत [...]
Continue reading...Wednesday, November 11, 2009
*सध्या फिरत असलेला हा ईमेल. ‘हेच बरोबर’ किंवा ‘हेच चूक’ असे आम्ही म्हणणार नाही. ‘We are just pointing towards some facts’ अशी आमची सोपी-सपक, मराठमोळी भूमिका आहे. बाकी तुम्ही जाणकार आहातच.
Continue reading...Tuesday, August 18, 2009
एक कानाला गोड पण वळायला अवघड वाक्य आहे - ‘Every penny saved is twice a penny earned’…खरे आहे की नाही? एक हजार रुपये कमवायला तुम्हाला त्यात किती एफर्टस् घालावे लागतात? तितकेच गमवायला मात्र काही लागणार नाही – ‘लाईफस्टाईल’ मॉलमध्ये एक चक्कर मारा किंवा ‘अॅडलॅब्ज’ला एक भेट द्या…तुम्हाला काहीही प्रयत्न करावे लागणार नाहीत आणि वर चांगली [...]
Continue reading...Wednesday, July 29, 2009
आम्हा मित्रांना खायचा भारी नाद. हा नाद खाखा-खाण्याचा मात्र नाही. एकदम चवीने खाल्यावर आचाऱ्याला त्या समाधानाची पावती दिल्याशिवाय हॉटेलातून पाय निघवत नाही अशी गत. ‘सारेगमप’मधल्या वाडकरांना चांगल्या गाण्यात जशी ‘जवारी’ वगैरे सापडली तसा एक मस्त अनुभव परवा पुण्याच्या ‘संजीवनी’ नावाच्या एका साध्या आणि छोट्या खानावळीत आला. आडवळणाचा-आडबाजूचा एखादा वडापाववाला, एखादा भेळवाला किंवा एखादा चिकन-रश्शावाला जसा बेष्टच [...]
Continue reading...Thursday, July 2, 2009
मायकेल जॅक्सनचे गेल्या आठवड्यात निधन झाले आणि मन उगाच हळहळले. मी काही मायकेलचा भक्त नाही किंवा त्याचा कधी डायहार्ड फॅनही नव्हतो. कॉलेजात असतांना त्याची किंचित क्रेझ होती पण ती किंचितच. एकतर कॉलेजच्या काळात फार अॅक्सेस नव्हता. कोपऱ्यावरच्या कॅसेटवाल्याकडून कॅसेट ‘तयार’ करून घ्यायचे ते दिवस. त्यामुळे त्याची एक-दोन गाणी कधी ऐकायला मिळायची. दुसरी आणि फार मोठी [...]
Continue reading...Thursday, June 25, 2009
फायरफॉक्स हे एक अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे. नेट-सर्फींग करण्याची आपली पद्धतच या फायरफॉक्सने बदलली. त्यातही त्याचे अॅड-ऑन म्हणजे एकदम जबरी. अॅड-ऑनचे एक-एक शस्त्र घेता घेता, या साध्या दिसणाऱ्या फायरफॉक्सचा एकदम कायापालट होऊन जातो. अॅड-ऑन्सची संख्या प्रचंड आहे. मागाल त्या गरजेसाठी अॅड-ऑन्स उपलब्ध आहेत. त्यातले टॉप ५ काढणे म्हणजे महाकठीण काम. खाली असलेली लिस्ट त्यातल्या त्यात [...]
Continue reading...Thursday, June 11, 2009
शहरातल्या रहाटगाडग्यात आपली स्वतःची सॅनिटी टिकवून ठेवणं जाम अवघड. आठवड्यातले नऊही दिवस काम करून जनतेच्या शिव्या खाणारा एखादा पंतप्रधान परवडला पण कशात काही नसतांना आपलं लाईफसुद्धा सरळ-सरळ तीन भागात विभागलं जातं – घरातली कामे, ऑफिसातली कामे आणि बाहेरची कामे. मी बाबांना कित्येकदा म्हणतो की तुमचं आयुष्य म्हणजे कामाची यादी झालंय निव्वळ…चैन, मौज-मजा केल्यावर पश्चात्ताप-दग्ध होणारी [...]
Continue reading...Wednesday, May 20, 2009
सध्या मी एका विशिष्ट मानसिक अवस्थेतून जात आहे. म्हणजे कसे की अशावेळी नेहमी चमचमीत आवडणारा मी तुमीभा म्हणजे तुप-मीठ-भात खातो; तब्येत आणि मन अशावेळी थोडं हळुवार असतं म्हणून मग धाडधाड रॉक सोडून ईगल्सचं ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ किंवा रहमानचं ‘तू ही रे’ ऐकतो. तर कधी-कधी मूड असा असतो की रात्री उशीरा एखादा मस्त हॉलीवुड किंवा स्टायलीश कोरियन [...]
Continue reading...Wednesday, April 29, 2009
अमेरिकेमधून प्रसिद्ध होणारे ‘टाईम’ हे मासिक त्याच्या दर्जाबाबत जितके प्रसिद्ध आहे तितकेच ते त्यात प्रसिद्ध होणाऱ्या ‘Person of the Year’ किंवा ‘Most Influential Person of the Year’ यासारख्या याद्यांमुळेही चर्चेत असते. प्रत्येक वर्षी हा बहुमान कोण मिळवणार याबद्दल जगभरात कुतूहल असते. काही दिवसांपुर्वी यावर्षीची ‘Most Influential Person of the Year’ यादी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा [...]
Continue reading...Tuesday, April 21, 2009
रविवार. दात घासणे – रंगोली. आंघोळ. नाश्ता – रामायण / महाभारत (आई-बाबा-आजी-पाहुणे वगैरे सगळ्यांसोबत – कंपलसरी). मोठ्यांची पांगापांग. स्पेस सिटी सिग्मा – मित्रांसोबतच. खेळ, टाईमपास. जेवण – मूक-बधिरांच्या बातम्या संपायची वाट. लोळणे – छायागीत. लोळणे (Continued…) – भारतीय भाषांमधील चित्रपट (एकदा तर ‘राशोमोन’ मला येथेच गावला होता. इथे सापडलेले दुसरे रत्न म्हणजे कमल हसनचा ‘महानदी’) झोप. रसना घेतांना – संतवाणी. खेळ किंवा अशोक सराफ-लक्ष्या. आसेतुहिमाचल-भारतातल्या तमाम बालगोपाळांचा रविवारचा [...]
Continue reading...Saturday, April 18, 2009
काही उत्पादने इतकी यशस्वी होतात की त्यांच्या श्रेणीची ते व्याख्या पार बदलून तरी टाकतात किंवा उत्पादनांची अक्षरशः एक नवीन श्रेणी / प्रकार तयार करतात. यासंदर्भात मला चटकन आठवणारा प्रॉडक्ट म्हणजे – निरमा! निरमा हे नाव घराघरात इतके पोहोचले की किराणा दुकानात ‘व्हीलचा निरमा द्या’ असे कानावर येऊ लागले…! आज ‘5 प्रभावशाली’ या सिरीजमध्ये सॉफ्टवेअर्स/वेब सर्विसेस आणि [...]
Continue reading...Thursday, April 16, 2009
शहरी, धकाधकीच्या जीवनात आपण ज्या गोष्टी गमावतो, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. ‘काही मिळो न मिळो पण रात्री शांत झोप लागली पाहीजे’ असा आपला अॅटीट्यूड असतांनाही सगळ्यात दुर्मिळ होते ती झोपच…मग दुसऱ्या दिवशी निरुत्साह, दिवसभर जांभया, अंगात कणकण, डोळे जळजळणे यासारख्या गोष्टी हटकून वाट्याला येतात. मग त्यादिवशी लगेच आपण उपायही चालु करतो – कडक [...]
Continue reading...
Wednesday, February 3, 2010
1 Comment