5 प्रभावशाली - सॉफ्टवेअर्स/वेब सर्विसेस (Lists, 5 Influentials # 1)

Sat, Apr 18, 2009

Fantastic Lists

काही उत्पादने इतकी यशस्वी होतात की त्यांच्या श्रेणीची ते व्याख्या पार बदलून तरी टाकतात किंवा उत्पादनांची अक्षरशः एक नवीन श्रेणी / प्रकार तयार करतात. यासंदर्भात मला चटकन आठवणारा प्रॉडक्ट म्हणजे – निरमा! निरमा हे नाव घराघरात इतके पोहोचले की किराणा दुकानात ‘व्हीलचा निरमा द्या’ असे कानावर येऊ लागले…!

आज ‘5 प्रभावशाली’ या सिरीजमध्ये सॉफ्टवेअर्स/वेब सर्विसेस आणि तत्सम श्रेणीमधील काही क्रांतीकारी उत्पादने आपण बघू. या सर्वात एक समान बाब म्हणजे यांचे स्पर्धक केवळ नावाचे स्पर्धक आहेत. प्रभाव आणि प्रसार याबाबतीत त्यांची मुख्य उत्पादनाशी काही तुलना नाही.

1. मायक्रोसॉफ्ट वर्ड

word-logo

जन्मवर्ष: 1983

श्रेणी: वर्ड प्रोसेसिंग अॅप्लीकेशन

स्पर्धक: ‘ओपन ऑफीस’ मधील वर्ड प्रोसेसिंग अॅप्लीकेशन आणि गूगल, झोहो (Zoho) यांसारखी ऑनलाईन अॅप्लीकेशन्स. यापैकी ऑनलाईन अॅप्लीकेशन्सचा वर्डला जास्त धोका.

जन्मदाता: झेरॉक्स - 1981. मायक्रोसॉफ्टने नंतर त्यात काही बदल करून 1983 मध्ये त्याचे नामकरण ‘मायक्रोसॉफ्ट वर्ड’ केले.

प्रभाव का आणि किती: ऑपरेटींग सिस्टीम्समध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोजची असलेली मक्तेदारी वर्डच्या प्रभावाचे फक्त एक कारण. डॉक्युमेंट एडिटींग, सोपेपणा, इंटरनेट टेक्नॉलॉजीसोबत असलेला समन्वय इ. इ. बाबतीत वर्ड एकतर प्रणेता तरी आहे किंवा अधिक रिलायबल, अधिक सहज आहे. आपल्यापैकीच कित्येकांना ‘वर्डशिवायही काही आहे’ हीच बातमी! थोडक्यात - या श्रेणीत वर्डचा वर्ड अंतिम!

2. मायक्रोसॉफ्ट एक्सेल

excel-logo

जन्मवर्ष: 1985

श्रेणी: स्प्रेडशीट अॅप्लीकेशन

स्पर्धक: ‘ओपन ऑफीस’ मधील स्प्रेडशीट अॅप्लीकेशन आणि गूगल, झोहो (Zoho) यांसारखी ऑनलाईन अॅप्लीकेशन्स. यापैकी ऑनलाईन अॅप्लीकेशन्सचा एक्सेलला जास्त धोका.

जन्मदाता: मायक्रोसॉफ्ट. यात गंमत म्हणजे मायक्रोसॉफ्टने एक्सेल आधी मॅकींतोशसाठी बाजारात आणले. विंडोजसाठी मायक्रोसॉफ्टचेच ‘मल्टीप्लॅन’ नावाचे एक स्प्रेडशीट अॅप्लीकेशन 1982 पासून अस्तित्वात होते. विंडोजसाठी एक्सेल 1987 मध्ये रिलीज करण्यात आले.

प्रभाव का आणि किती: जेम ऑफ अ सॉफ्टवेअर! एक्सेल नेहेमी वापरणाऱ्यांना मी काय आणि का म्हणत आहे हे लगेच लक्षात येईल. कुठल्याही चांगल्या सॉफ्टवेरची असणारी रिलायबलिटी, सोपेपणा आणि क्षमता यासारखी लक्षणे यात ठासून भरली आहेत. एक्सेलंट!

3. फोटोशॉप

photoshop-logo

जन्मवर्ष: 1987

श्रेणी: ईमेज/ग्राफीक्स एडिटींग अॅप्लीकेशन

स्पर्धक: जींप (GIMP), पेंट डॉट नेट Paint.NET). स्पर्धक म्हटल्यापेक्षा फोटोशॉप खिशाला जड (जींप) किंवा डोक्याला अवघड वाटणाऱ्यांठी (पेंट डॉट नेट) असणारे हे पर्याय आहेत.

जन्मदाता: थॉंमस नोल (Thomas Knoll). थॉंमसने पीएचडी करतांना ग्रेस्केल या नावाने हा प्रोग्रॅम लिहीला. नंतर सहा महीन्यांची सुटी घेऊन त्याने त्यात काही सुधारणा केल्या आणि त्याला ईमेज-प्रो असे नाव दिले. सुरुवातीला मॅकींतोशसाठी तयार केलेला हा प्रोग्रॅम 1988 मध्ये अॅडोबीने फोटोशॉप या नावाने विकत घेतला.

प्रभाव का आणि किती: ‘वापरणाऱ्यांच्या जीवनात याचे स्थान किती?’ हा निकष लावला तर या पाचांतही फोटोशॉप निर्विवादपणे 1 नंबरला आहे. वर्ड प्रोफेशनल किंवा एक्सेल प्रोफेशनल तुम्हाला कदाचित कुठेही सापडणार नाहीत. पण फक्त फोटोशॉप वापरून पैसा कमावणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. ईमेज एडिटींग या प्रक्रियेचाच विकास फोटोशॉपबरोबर झाला असे म्हटले तर त्यात किंचीतही अतिशयोक्ती नाही. ‘फोटोशॉप’ हा शब्दच आता क्रियापद म्हणून वापरला जातो यावरून तुम्हाला या प्रभावाची कल्पना येईल.

4. बीटटोरेंट

bittorrent-logo

जन्मवर्ष: 2001

श्रेणी: फाईल-शेअरींग

स्पर्धक: पांडो (Pando)…(?!) खरे म्हणजे या श्रेणीत बीटटोरेंट इतके परिपूर्ण आहे की मी एखाद्या आंडो-पांडोला बीटटोरेंटचा स्पर्धक म्हणून संबोधले तर लोक मला वेड्यात काढतील.

जन्मदाता: ब्राम कोहेन.

प्रभाव का आणि किती: ‘मोठ्या आकाराच्या फाईल्स इंटरनेटवरून ट्रांसफर कशा करायच्या?’ हा प्रश्न सुरूवातीपासूनच एकदम गहन ठरला आहे. उदा. तुमच्याकडे 4 जीबीची एक फाईल आहे. ती मित्राला इंटरनेटवरून पाठवणार कशी? या प्रश्नावर उत्तर म्हणून नॅपस्टर, कझा (Kazaa) अशा टेक्नॉलॉजीज येऊन बंद पडल्या. नैराश्याने नोकरी सोडून बीटटोरेंट तयार करणाऱ्या ब्राम कोहेनने मात्र यांवर कळसाध्याय लिहीला. मुळात बीटटोरेंट हा एक प्रोटोकॉल आहे.  ‘मोठ्या आकाराच्या फाईल्स इंटरनेटवरून ट्रांसफर कशा करायच्या?’ यातल्या ‘कशा?’ याचे उत्तर हा प्रोटोकॉल देतो. याविषयी विस्ताराने पुन्हा कधीतरी. पायरसीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या या टेक्नॉलॉजीला मात्र अगदी भविष्यातही पर्याय नाही.

5. गूगल सर्च

google-logo

जन्मवर्ष: 1996

श्रेणी: सर्च-इंजिन

स्पर्धक: याहू आणि इतर अनेक स्पेशालीस्ट सर्च-इंजिन्स उदा. mp3 साठी फुल्की किंवा स्क्रीमर्.

जन्मदाता: लॅरी पेज आणि सर्जेई ब्रीन. पीएचडीचा प्रोजेक्ट म्हणून 1996 मध्ये गूगल सर्चची सुरूवात झाली (त्यांचा गूगलवरील रिसर्च पेपर वाचा इथे). तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या या प्रोटोटाईप सर्च-इंजिनचे नाव लॅरी-सर्जेईने ‘बॅकरब’ असे ठेवले होते. 2001 मध्ये त्यांनी गूगल कंपनी म्हणून रजिस्टर केली.

प्रभाव का आणि किती: ‘गूगल शोधू शकत नाही अशा गोष्टी कुठल्या?’ असा एक प्रश्न गूगलवरील तुमच्या प्रोफाईलमध्ये विचारला जातो. याची गूगलने सुचवलेली उत्तरे पहा – paradise, love, Atlantis, Spam…! गूगलला एवढा कॉन्फीडन्स कसा? गूगलचे सोडा, तुम्हालाही गूगलबद्दल हा कॉन्फीडन्स आहे की नाही?  हा कॉन्फीडन्स जगातल्या लाखो इंटरनेट युजर्सनादेखील आहे. गूगलचा हा प्रभाव इतका आहे की ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ‘गूगल’ एक क्रियापद म्हणून मानाने समाविष्ट झाला आहे.

No related posts.

,

This post was written by:

Oracle - who has written 16 posts on Fantastic Five.


Contact the author

2 Comments For This Post

  1. Sameer Says:

    Bit torrent answers ‘मोठ्या आकाराच्या फाईल्स इंटरनेटवरून ट्रांसफर कशा करायच्या?’ …
    Well, I don't think it was invented because of the above mentioned reason. Though it does answer that… p2p file sharing is the word which can describe why it was invented… p2p is a must have word in the post….

  2. Oracle Says:

    Thanx Sameer for commenting. Yes, P2P is what BitTorrent and other so many similar technologies are all about. However, The P2P technologies, though a main culprit in piracy, are basically the technologies which allow you to transfer very large files - or that should be what their use should be. Bittorrent takes a somewhat different approach than its predecessors (Napster & Kazaa), making the whole affair a 'social' thing - from many to many - thus allowing a faster transfer which is less taxing on your bandwidth.
    Cheers! Keep Coming!!

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro