ती आणि कृष्ण

Tue, Nov 10, 2009

Fantastic 5, Fantastic Readers

ती आणि कृष्ण

ती पुन्हा पुन्हा विचार करू लागली, काय चुकल माझं ? त्याचं आत्ताचं वागणं खरं होतं की आधीचं ? त्याच ते उत्कट प्रेम खरं होतं, की आत्ताचा अबोला ? अबोला धरलेला तिला सहनच व्हायचा नाही. ती सैरभैर व्हायची. अस्वस्थ आणि व्हायची. अणि आज तर तिच्या मनुनं अबोला धरला होता. त्या डोंगरावर, आकाशाच्या छत्राखाली बसून त्यांनी जी स्वप्न पाहिली होती, त्या स्वप्नांमधे आज फ़क्त तीच उरली होती… तिच्या अवती-भोवती, तिच्या आत फक्त तोच भरून उरला होता… तिच्या श्वासातून तोच तर बोलत होता…
तिला आठवला तो दिवस. बसमधून दोघे घरी येत होते. त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तो म्हटला, “मी तुझ्याशिवाय नाही गं राहू शकत”
आणि आता… सगळं कसं क्षणात बदलतं नाही… आज त्याला असं वाटत होतं, की तो त्यांचं नात नाही handle करू शकत. आणि म्हणून त्यानं दोघांच्या आयुष्याचा निर्णय एकट्यानंच घेतला. असं असतं का ? एक क्षणात सगळं संपतं का ? त्याला कसं जमतं हे सगळं ? मला का नाही तितक्याच सहजपणे हे घेता येत ? तिच्या मनाचा गोंधळ उडाला होता.

……………………

झाले… दोन महीने झाले सगळं संपून…
आता तिचा राग कोणावरही नव्हता… होता तो फक्त त्या कृष्णावर… त्यानं राधेला असं एकटं सोडलं नसतं, तर आज किती तरी राधा आशा विरहात पोळल्या नसत्या…

प्रिया देशमुख

No related posts.

This post was written by:

Sudoku - who has written 45 posts on Fantastic Five.


Contact the author

4 Comments For This Post

  1. Priya ( Author of the Story ) Says:

    Hi friends !!!
    First of all, thanks for giving me opportunity to communicate through FFIVE with all my friends. I am really thankful to FFIVE TEAM.

    Friends, this story is a only a part, and I was thinking to write on this since so many days.
    If my friends want me to write more on this story then please give response. If all my friends are interested then surely I will write something more on this.

    Thanks to All My Friends.

  2. Shantanu Says:

    continue & complete the story plz….

  3. Manini Says:

    Hi प्रिया ,
    सुरुवात छान केली आहेस, पण पूर्ण करण्यासाठी तू बाकीच्यांवर का अवलंबून आहेस ? त्यांना पाहिजे म्हणून लिहित आहेस कि तुझ्या समाधानासाठी ?
    आणि तू जेव्हा पूर्ण करशी तेव्हा तुझ्या मित्रांना नक्कीच आनंद होईल , हो ना ?
    सगळ्यांचीच इच्छा असेल तू पूर्ण करावीस म्हणून !!
    sorry , आपली ओळख नसताना मी जरा जास्त लिहित आहे !!

  4. navneet Says:

    i think mala vatate priya is right……..!

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro