मध्यंतरी कांचननं बोक्या सातबंडेविषयी आवाज उठवला. त्याला बहुतेक मराठी ब्लाॅगर्सनं प्रतिसाद दिला. ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी झालेली असतेच. आम्हीही हा त्रास भोगलाय. त्यामुळेच कांचनचा मुद्दा सकाळनं पुढे नेला तेव्हा बरं वाटलं. येत्या चार सप्टेंबरला सकाळच्या कार्यालयात एका विशेष व्हिडिअो काॅन्फरन्सचं आयोजन करण्यात आलंय, त्या व्हीसीला ब्लाॅगर्सशी चर्चा करण्यासाठी काॅपीराईट आणि इंटेलेक्चुअल प्राॅपर्टी [...]
Continue reading...13. August 2010
परवा पंधरा ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आणि मला आतापासूनच जिलबीचे वेध लागलेत. मस्त केशरी रंगाची गोड जिलबी! माझ्या खाद्ययात्रेत जिलबी अगदी महत्त्वाची आहे. लग्नातली जिलबीही मी चापून खातो, डायबेटिस असलेल्यांसाठी पाकात न सोडलेली फक्त तळलेली जिलबी असते ना, तीही सुरेख लागते. आम्ही तीही सोडत नाही, यावरून काय ते ओळखा. मी अगदी लहान म्हणजे दोन-अडीच वर्षांचा [...]
Continue reading...21. December 2009
शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहात असतो, कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो, आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो, डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो… शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं, कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं, हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं, बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं… सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून [...]
Continue reading...29. August 2009
लेखकः विनायक बहुचर्चित ‘गंध’ हा चित्रपट दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवांतून गाजल्यानंतर सर्वसामान्य प्रेक्षकांपुढे येण्यासाठी ‘गंध’ला बराच वेळ लागला. या चित्रपटाने सर्वसामान्य प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या किंवा कसे, हे येत्या काही दिवसांत कळेल. या चित्रपटाने माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही यावर मी लिहित आहे. कदाचित माझ्या या लिखाणातून हा चित्रपट कसा आहे, याचा [...]
Continue reading...28. August 2009
नमस्कार मित्रांनो, ‘फँटास्टिक फाईव्ह’च्या वाचकांना आपले लिखाण आमच्यापर्यंत पाठविण्याचे आव्हान केल्यानंतर आमच्याकडे आलेल्या पहिल्या कथेचे स्वागत. मृत्युंजय या आमच्या नियमित वाचकाने एक रोमांचक कथा आपल्यासाठी पाठवली आहे. ती कथा आम्ही आज प्रसिद्ध करत आहोत. तुम्हीही तुमचे लेख, कथा, टिप्स, लिस्ट्स या साईटसाठी पाठवू शकता. तुमच्या लेखांच्या प्रतिक्षेत… कळावे आपले, फँटास्टिक फाईव्ह. — अद्भूत लेखकः मृत्युंजय “प्रसाद?” कॅफेच्या बाहेरून एक [...]
Continue reading...19. August 2009
अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे आयुष्य जगणाऱ्या आणि नाकासमोर चालणाऱ्या मंदार देशपांडेला एके दिवशी एक पत्रं येतं आणि त्याचं आयुष्याला कलाटणी मिळते. त्याच्या जीवश्च-कंठश्च मित्रांच्या मदतीने त्या पत्ररूपी संकटाचा सामना करायला तो निघतो. पत्रातील संदेश, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती, त्यातून मिळत गेलेली गुप्त माहिती, त्याचे लावलेले अर्थ, जीवावर बेतणाऱ्या प्रसंग आणि मानिसक थकवा आणणाऱ्या या प्रवासाचे [...]
Continue reading...19. August 2009
अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे आयुष्य जगणाऱ्या आणि नाकासमोर चालणाऱ्या मंदार देशपांडेला एके दिवशी एक पत्रं येतं आणि त्याचं आयुष्याला कलाटणी मिळते. त्याच्या जीवश्च-कंठश्च मित्रांच्या मदतीने त्या पत्ररूपी संकटाचा सामना करायला तो निघतो. पत्रातील संदेश, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती, त्यातून मिळत गेलेली गुप्त माहिती, त्याचे लावलेले अर्थ, जीवावर बेतणाऱ्या प्रसंग आणि मानिसक थकवा आणणाऱ्या या प्रवासाचे [...]
Continue reading...21. July 2009
नमस्कार मित्रांनो… अशी काही भाग्यवान माणसं असतात की ज्यांचं अक्षर मुळातच सुंदर असतं. काही लोकांचं अक्षर अतिशय गिचमिड असतं; तर काही लोकांचं अक्षर हे प्रत्यॆकवेळी वेगळं येतं. ज्यांना आपलं अक्षर सुधारावं असं वाटतंय, त्यांच्यासाठी आज या अक्षर सुधारण्यासाठीच्या पाच फॅन्टास्टिक टिप्स. अक्षर सुधारायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यासाठी कॅलीग्राफी यायला पाहिजे का? मुळीच नाही. काही सोप्या गोष्टी [...]
Continue reading...7. July 2009
जगातली सात आश्चर्ये म्हणा किंवा रिओ दि जानेरो सारखे नयनरम्य शहर म्हणा - या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जाऊन यावे असं तुम्हा-आम्हा सर्वांनाच वाटत असतं. पण ते शक्य होतंच असं नाही. अनेक ठिकाणी आपण जाऊन येतो; पण तरीही आणखी एखादा दिवस असता तर हे ही पाहून झालं असतं, अशी हुरहूर लागून राहते. बऱ्याच वेळा एखाद्या [...]
Continue reading...2. June 2009
मित्रहो नमस्कार, तुमच्यापैकी काही जण व्यवसायाने चित्रकार असतील; तर काही उत्तम चित्रकार असतील. पण छंद किंवा आवड म्हणून चित्रकला जोपासणारे किंवा जोपासू इच्छिणारे अनेक जण असतील. खरं सांगतो, चित्रकला हा अतिशय आनंद देणारा असा छंद आहे. तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट तुम्ही कागदावर साकार करू शकता. हा छंद महागडा तर मुळीच नाही. फक्त एक कागद आणि पेन्सिल [...]
Continue reading...30. May 2009
एखादी नवी वस्तू घेताना आपण चारचौघांकडे त्या वस्तूची विचारणा करतो. कोणत्या कंपनीची वस्तू चांगली आहे, वॉरंटी/गॅरंटी किती आहे, वस्तू कशी आहे आदी गोष्टींची चौकशी करतो. आजकाल अनेक जण इंटरनेटवर थोडासा रिसर्च करून ठरवतात आणि मगच ती वस्तू घ्यायला जातात. यावरून ग्राहक जरा जागरूक होण्यास सुरवात झालीये, असे म्हणावयास हरकत नाही. केवळ जाहिरात बघून एखादी वस्तू [...]
Continue reading...23. May 2009
‘अॉर्कुट’चा वापर करून आपल्याकडे अनेक गुन्हे घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांची ‘मोडस अॉपरेंडी’ जाणून घेणं प्रचंड आव्हानात्मक आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईलमधील माहितीचा किंवा तिच्या स्टेटस मेसेजेसचा गुन्हेगार कसा वापर करेल, याचा अंदाज लावणं अत्यंत कठीण आहे. आपल्याकडे आता ‘फेसबुक’चाही वापर हळू-हळू वाढत आहे. कोणतीही सोशल नेटवर्किंग सेवा वापरताना स्वतःला काही मर्यादा [...]
Continue reading...20. May 2009
सध्या मी एका विशिष्ट मानसिक अवस्थेतून जात आहे. म्हणजे कसे की अशावेळी नेहमी चमचमीत आवडणारा मी तुमीभा म्हणजे तुप-मीठ-भात खातो; तब्येत आणि मन अशावेळी थोडं हळुवार असतं म्हणून मग धाडधाड रॉक सोडून ईगल्सचं ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ किंवा रहमानचं ‘तू ही रे’ ऐकतो. तर कधी-कधी मूड असा असतो की रात्री उशीरा एखादा मस्त हॉलीवुड किंवा स्टायलीश कोरियन [...]
Continue reading...7. May 2009
सध्याच्या मंदीच्या वातावरणात प्रत्येकालाच ताण-तणावाला सामोरं जावं लागत आहे. संसारातील जबाबदाऱ्या आणि नोकरी, व्यवसायातील व्यावधानं सांभाळता-सांभाळता प्रचंड ओढाताण होते. प्रचंड कष्टाने जोपासलेली नोकरी एका फटक्यात जाऊ शकते, याचे भान ठेवत नोकरी टिकवण्यासाठी अंगावर पडेल ते काम करताना शरीराची होणारी झीजही दुर्लक्षित होऊ शकते. पण एक लक्षात ठेवा, शरीराकडे कधीही दुर्लक्ष करू नका. मंदी असो वा [...]
Continue reading...
25. August 2010
1 Comment